अनघा केसकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डाॅ. अनघा केसकर या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचा जन्म आणि त्यांचे विवाहापूर्वीचे आयुष्य मुंबईत गेले. लग्नानंतर पुण्याला आणि पतीच्या बदलीच्या निमित्ताने औरंगाबाद आणि कऱ्हाड येथे त्यांचे बरेचसे आयुष्य गेले.

अनघा केसकर या अर्थशास्त्राच्या एम.ए. पीएच.डी. आहेत. ह्यांनी काही काळ सर्व्हे रिसर्च मॅनेजर पदावर, तर काही काळ स्त्री मासिकाच्या कार्यकारी पदावर काम केले. 'छात्र – प्रबोधन' मासिकाच्या इंग्रजी दिवाळी अंकाच्या आणि साहित्य सूची दिवाळी अंकाच्या त्या अतिथी संपादक. होत्या. मासिकांतून व वृत्रपत्रांतून सदर लेखन, स्तंभ लेखन, कथा, ललित लेख, मुलाखती अशी त्यांची साहित्यिक कारकीर्द आहे. अनघा केसकरांनी १३हून अधिक पुस्तके लिहिली असून त्या कथाकथन आणि इतर रंगमंचीय जाहीर कार्यक्रम करतात.. 'पाठिंबा' या सेवाभावी संस्थेतर्फे वैवाहिक समस्यांवर समुपदेशन करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते श्री. भास्कर भावे यांच्या जीवनाविषयी, जीवनविषयक तत्त्वज्ञानाविषयी आणि त्यांच्या शेतीच्या तंत्राविषयी अनघा केसकरांनी एक पुस्तक लिहिले आहे. (ते पुस्तक खालील यादीत नाही.)

पुस्तके[संपादन]

 • अखेर न्याय मिळाला (कादंबरी) : अनघा केसकरांव्या सासऱ्यांनी वालचंदनगर साखर कारखान्याला खंडाने दिलेली अणि कारखान्याला नको असलेली जमीन परत मिळवण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेला लढा या विषयावरची कादंबरी.
 • उःशापित (कादंबरी)
 • गुंता (कादंबरी)
 • गोची (कथासंग्रह)
 • दान (कादंबरी)
 • नामांकित (अनेक नामांकितांची व्यक्तिचित्रणे)
 • निर्वासित
 • भरती ओहोटी (कथासंग्रह)
 • वार (कथासंग्रह)
 • सुखाच्या शोधात ... देश आणि देशांतरे (वैचारिक, अनुभवकथन)
 • सुटका (कादंबरी)