सदस्य चर्चा:Snehalshekatkar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आपले विकिवर स्वागत आहे.कोलाहल या लेखात मी टंकनदोष काढले आहेत.प्रत्येक लेखास वर्ग टाकावयास हवा. या लेखात मी गणित हा वर्ग टाकला आहे.आपल्या पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा.

--वि. नरसीकर (चर्चा) २०:३९, २ जून २०१४ (IST) आपल्या निमंत्रणाबाबत आभार.मी नागपूरला असतो.येथून पुण्याच्या संघात सहभागी होणे म्हणजे 'उंटावरून शेळ्या हाकलण्याजोगे' आहे असे मला वाटते.आपल्या संघाच्या सर्व सदस्यांना कृपया माझ्या शुभेच्छा कळवाव्यात.आपला विकिपिडियन्सचा संघ भरभराटीस येवो व विकित त्याद्वारे मोलाची भर पडो व पर्यायाने त्याद्वारे मराठीचीही सेवा घडो असे मनापासून कळकळीने वाटते.Reply[reply]

जालशास्त्र[संपादन]

नमस्कार,

आपण येथे जालशास्त्र व तत्संबंधित लेख तयार करून भर घालीत असल्याचे पाहून आनंद झाला. आपणास विषयज्ञान तर आहेच. विकिपीडियाच्या तंत्राबद्दल किंवा नियम/संकेतांबद्दल काहीही शंका किंवा अडचणी असल्या जरूर कळवाव्यात. शक्य तितकी मदत लगेच करण्यास मला आनंदच वाटेल.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २०:२९, ६ जून २०१४ (IST)Reply[reply]

पुणे विकिपीडिया संघ[संपादन]

नमस्कार,

आपल्याविषयी अधिक माहिती मिलाल्यास आनंद होइल.

मी मराठी विकिपीडियावर २००५ सालापासून काम करीत आहे व संपादनांबरोबरच प्रचालक व प्रशासकपदाची जबाबदारी सुद्धा सांभाळत आहे.

संघामध्ये आलात तर खुप आनंदाची गोष्ट असेल

आपल्या निमंत्रणाबद्दल धन्यवाद. मी आता सहसा पुण्यात नसतो त्यामुळे संघात शामिल होणे सध्या अशक्यच वाटते परंतु आपल्या या उपक्रमास शुभेच्छा.

अभय नातू (चर्चा) ०३:२९, ७ जून २०१४ (IST)Reply[reply]

इथे लिहिताना अक्षरावर अर्धचंद्र कसा लिहायचा?[संपादन]

आपण टायपींग साठी येथील अक्षरांतरण वापरत आहात का ? तसे असल्यास ॲ साठी (अक्षर+ शिफ्ट+E) उदा.: ॲक्षॅरॅ शिफ्ट+E kSh+शिफ्ट+E r+शिफ्ट+E म्हणजेच ॲ+क्ष्+शिफ्ट+E+र्+शिफ्ट+E त्याच प्रमाणे ऑ साठी शिफ्ट+O

आपण टायपींगसाठी अक्षरांतरण शिवाय इतर काही प्रणाली वापरत असल्यास कळवणे, एखादे लक्षात न राहणारे देवनागरी अक्षर चिन्ह एखादवेळेसच वापरावयाचे असल्यास संपादन खिडकीच्या वर विशेष वर्ण लिहिलेले दिसेल तेथे देवनागरी निवडावी आणि हवे असलेल्या अक्षरचिन्हावर टिचकी मारावी (ॲ आणि ऑ करता लागणारी चिन्हे संपादन खिडकीच्या खाली सुद्धा आहेत त्यावर टिचकी मारलीत तरीही जमेल अर्थात क्+ॅ जोडले जाणार नाही क+ॅ जोडले जाईल). अक्षरांतरणचा पूर्ण कळफलक येथे पाहण्यास मिळेल

शंका शिल्लक राहील्यास संपर्क साधावा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:१५, ४ जुलै २०१४ (IST)Reply[reply]


pRthvee/pRthvI पृथ्वी kRShNa कृष्ण

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५३, ५ जुलै २०१४ (IST)Reply[reply]


एच इंडेक्स[संपादन]

स्वतःच्याऐवजी संशोधकाचा एच इंडेक्स हा प्रयोग करणे हे अगदी योग्य आहे. तसा विचार मी आधी केला होता, पण तो प्रत्यक्षात उतरवता आला नाही; आता प्रयत्‍न करून पाहीन. आपल्या सूचनेबद्दल आभार!.... (चर्चा) ०८:५९, १६ ऑगस्ट २०१५ (IST)Reply[reply]

होमिओपॅथी[संपादन]

लेखनचक्रातील ज्ञानकोशाचे स्थान

हम्म, मला होमिओपॅथीची कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा अधिक माहिती नाही, त्यामुळे विशीष्ट लेखाबद्दल मतव्यक्त करण्यापेक्षा थोडे जनरलाईज करून लिहितो ते आपण होमिओपॅथी लेखास ताडून पाहू शकाल असे वाटते.

लेखातील माहिती प्रथमत: संबंधीत विषयाचे अभ्यासकांनी दिलेल्यांच्या दृष्टीकोणातून, शक्यतोवर ससंदर्भ समसमीक्षीत (peer reviewed) माहिती आधी त्यांच्या दृष्टीकोणातून समाविष्ट करावी. त्या नंतरचा भाग शक्यतोवर ससंदर्भ समसमीक्षीत (peer reviewed) आक्षेपांचा असावा. अर्थात आक्षेप लगोलगही नोंदवण्यास हरकत नाही. आक्षेप वेगळ्याच परिच्छेदातून नोंदवावेत असे नाही.


अर्थात कोणत्याही ज्ञानकोशीय लेखात शक्यतेवढ्या दृष्टीकोणांचे तर्कसुसंगत समतोल तटस्थपणे (शक्यतो समसमीक्षीत दृष्टीकोनांचे ससंदर्भ प्रतिबींबीत) लेखन व्हावयास हवे हे ओघाने आलेच.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:३८, ३० ऑगस्ट २०१५ (IST)Reply[reply]