सदस्य चर्चा:शरद वागळे
विषय जोडा
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ ) 
[संपादन]
.
|
|
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ ) 
[संपादन]
|
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
| |
शरद वागळे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
| शरद वागळे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या १,०१,८९४ लेख आहे व ३६१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपणास विकिपीडियावर लिहून पहाताना अद्याप धाकधूक वाटते ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर | |
| नमस्कार, शरद वागळे
मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल. मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर. कळावे - खबर्या (विकीपत्रिका) |
फाइल नावाबद्दल प्रश्न
[संपादन]नमस्कार,
तुम्ही मराठी टंकलेखन करताना कोणती प्रणाली वापरत आहात? बराहा (किंवा तत्सम) कि तुमच्या ऑपरेटिंग सिस्टममधील अंगभूत प्रणाली?
तुम्ही संचिका चढवताना स्पेसच्या ऐवजी डॅश '-' किंवा इतर कोणतेही अक्षर सुद्धा वापरू शकता. उदा - 'Joseph Arthur Ankrah.png' चे नाव चढवतानाच बदलून 'Joseph-Arthur-Ankrah.png' किंवा 'जोसेफ-आर्थर-अंक्राह.png' असेही चालते.
असे प्रश्न मी कुणाला विचारु शकतो हेहि कळवा.
असे प्रश्न तुम्ही मला जरूर विचारू शकता. शिवाय sankalpdravid, संतोष दहिवळ, शंतनू, कोल्हापुरी ही मंडळी सुद्धा तांत्रिक बाबतीत जाणकार आहेत. प्रश्न चावडीवर टाकलात तर कोणताही सदस्य यास उत्तर देईल.
अधिक प्रश्न असतील तर कळवालच.
अभय नातू (चर्चा) २३:११, २७ ऑगस्ट २०१२ (IST)
- आपले म्हणणे बरोबर आहे. गेल्या काही महिन्यांपासून अंडरस्कोर, टिल्डा (~) इत्यादी अक्षरे मराठी कीबोर्ड वापरून लिहिता येत नाहीत. तसेच सध्याचा अंडरस्कोर _ व पूर्वीचा अंडरस्कोर _ ह्यात देखील फरक आहे. उदा. माहितीचौकट शहर ह्या साच्यात लोकसंख्या_वर्ष हे फील्ड जुन्या अंडरस्कोर ऐवजी लोकसंख्या_वर्ष असे नवीन अंडरस्कोर वापरून लिहिले तर चालत नाही. पंचाईत होत आहे हे खरे आहे. अभय, ह्याच्यावर तोडगा आहे काय? - अभिजीत साठे (चर्चा) ०३:२९, २८ ऑगस्ट २०१२ (IST)
- अभिजीत, शरद,
- तुम्ही मराठी विकिपीडियावरील मराठी टंकलेखनाची सोय वापरत आहात असा अंदाज आहे.
- असे असल्यास येथील ट्रान्सलेटर जावास्क्रिप्टमध्ये योग्य ते बदल करावे लागतील. प्रत्येक कळदाबाने कोणते अक्षर उमटते ते या जावास्क्रिप्टमधून ठरते. त्यात उचित बदल केल्यास पाहिजे तशी अक्षरे उमटवता येतात. यासाठी mediawiki:monobook.js यात हे बदल केल्याचे आठवते आहे पण तद्नंतर हे पान बदललेले आहे. थोडा अभ्यास करुन नेमके बदल कोठे करावे लागतील हे शोधावे लागेल.
- अर्थात, हे बदल सगळ्यांसाठी करण्या आधी आपल्या स्वतः साठी करुन त्यावर प्रयोग करावे व त्यानंतर ते सगळ्यांसाठी promote करता येतील. यासाठी सदस्य:शरद वागळे/monobook.js (किंवा जे पान बदलावे लागते ते) असे पान तयार करावे व त्यात प्रयोग करुन बघावे.
- अधिक माहिती कळेल तशी लिहीतो.
- अभय नातू (चर्चा) ०४:०१, २८ ऑगस्ट २०१२ (IST)
- ता.क. अभिजीतचा (आणि इतरही मंडळींचा सुद्धा) येथील तांत्रिक बाबतींबद्दल अभ्यास आहे हे विसरलोच... :-)
एकाच दुव्याचे दोन परिमाण
[संपादन]मी काल लिहिल्याप्रमाणे मराठी विकिपीडियावरील अंडरस्कोर हा इंग्लिश विकिपीडियावरील अंडरस्कोरपेक्षा वेगळा आहे. काय फरक आहे ते डोळ्यांना नाही दिसत परंतु घोटाळा मात्र होतो. आपला क्वामे न्क्रुमाह हा लेख मी थोडा बदलला आहे. कृपया संपादन तपासून पहा. विकिपीडियावरील इतर भाषांचे दुवे देण्यासाठी संपूर्ण लिंक द्यायची गरज नाही. [[:en:Kwame Nkrumah]] व [http://en.wikipedia.org/wiki/Kwame_Nkrumah] हे दोन दुवे एकच आहेत. - अभिजीत साठे (चर्चा) १८:२६, २९ ऑगस्ट २०१२ (IST)
स्तंभ
[संपादन]स्थंभ नव्हे तर स्तंभ. आता हा शब्द असलेल्या साच्यांचीही नावे आपल्याला बदलावी लागतील. आणि मराठी शब्द सप्टेंबर असा आहे सेप्टेंबर नाही. ...J (चर्चा) ०१:११, १६ सप्टेंबर २०१२ (IST)
मराठी साचा
[संपादन]एखाद्या इंग्रजी साच्याला मराठी पर्याय आहे का तर कुठे पहावे? एखादा विशिष्ट साचा आहे का नाही हे पाहण्यासाठी शोध पानावर येथे जाउन फक्त साचा हा चेकबॉक्स चेक करुन हवा असलेला साचा (किंवा त्याजवळचे नाव) घालावे व शोधा वर क्लिक करावे.
एखादा साचा मराठीत नसल्यास इंग्लिश विकिपीडिया (किंवा इतर भाषेतील विकिपीडिया)वरुन आयात करावा. यासाठी इंग्लिश विकिपीडियावरील साच्याचा सोर्स येथे आणावा व नवीन साचा तयार करुन त्यातील पॅरामीटर्स व इतर गोष्टींचे पाहिजे तसे मराठीकरण करुन घ्यावे.
आज मी 'हक्क' हा नविन साचा sidebar with collapsible list हा इंग्रजी साचा वापरून तयार केला. तो काही कारणास्तव संपादन संरक्षणात गेला.
आता हक्क ह्या साच्याचे नाव कसे बदलता येइल?
हा साचा पाहता तो संरक्षित नसल्याचे आढळले. तुम्हाला संपादन करण्यापासून मज्जाव होत आहे का? असल्यास नेमका एरर मेसेज काय आहे? नाव बदलण्यासाठी मथळ्यातील ताऱ्यावर क्लिक केल्यास स्थानांतरण असे दिसेल. त्यावर क्लिक करुन आपल्याला पाहिजे ते नाव बदलून घ्यावे.
त्यासाठी नविन साचा केल्यास हा 'हक्क' साचा कसा वगळता येइल?
एखादे पान वगळण्यासाठी त्या पानावर {{पानकाढा}} हा साचा घालावा म्हणजे प्रचालकांपैकी कोणी एक ते पान वगळतील.
अभय नातू (चर्चा) ०५:३०, १८ सप्टेंबर २०१२ (IST)
संरक्षित साचा
[संपादन]'बाजूचौकट हक्क' हा sidebar with collapsible lists पासून केलेला साचा संरक्षित का होतो....
हा साचा संरक्षित नाही. सध्या तो कोणालाही संपादित करता येतो. तुम्ही म्हणता ती चौकट येण्याचे कारण बाजूचौकट हक्क या साच्यात अंगभूत असलेला {{pp-template}} हा साचा आहे. हा साचा काढल्यास ही चौकट गायब होते.
....व बरोबर झलक का दाखवित नाही हे माझे दोन प्रश्न आहेत.
झलक न दाखवण्याचे कारण म्हणजे बाजूचौकट हक्क साच्यात अंगभूत असलेला अजून एक साचा (sidebar with collapsible lists) आहे. हा साचा मराठी विकिपीडियावर नाही. तो आधी आणावा लागेल.
'मानवी हक्क' पान का ? काढा
[संपादन]शरदरावजी तुमच्याच जिव्हाळ्याच्या 'मानवी हक्क' या लेखावर {{पानकाढा}} साचा आला आहे. तो बहुधा तुमच्याकडूनच अनवधानाने (साचा via another साचा ) लागला असावा असा अंदाज आहे. इथे बऱ्याच मंडळींना पानकाढा वर्गीकरणात पान आले की डोळ्यावर पट्टी बांधून पाने वगळण्याची सवय आहे. त्यामुळे नुसते पानकाढा न लिहिता {{पानकाढा | कारण = अमुकतमुक कारण}} असे पूर्ण लिहावे. एखाद्या साचातील गोष्ट त्या साचातच दाखवायची आहे पण लेखात अथवा साचातून साचा नको आहे तर <noinclude> {{पानकाढा}} </noinclude> वापरण्याचा पर्याय गरजे नुसार वापरता येऊ शकतो. पान का ? काढा (चर्चा) ०८:३८, २३ सप्टेंबर २०१२ (IST)
सादरीकरणे पाठवता येतील
[संपादन]नमस्कार,
आपण जर येथे marathiwikipedia@gmail.com मेल केलात तर आपणास उपलब्ध असलेली सादरीकरणे पाठवता येतील.
धन्यवाद - राहुल देशमुख १७:३१, २६ सप्टेंबर २०१२ (IST)
पाने वगळा
[संपादन]केवळ प्रचालकांनाच पाने वगळता येतात. माझ्याकडुन देखील अनेकदा चुकीच्या शीर्षकांची पाने तयार झाली आहेत. तुम्हाला कोणती पाने वगळायची आहेत ते कळवा व मी ती पाने वगळेन. - अभिजीत साठे (चर्चा) २०:२०, १ नोव्हेंबर २०१२ (IST)
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.









