Jump to content

संजुक्ता पाणीग्रही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजुक्ता पाणीग्रही
आयुष्य
जन्म २४ ओगस्ट १९४४
जन्म स्थान बेहरामपूर
संगीत कारकीर्द
कार्य ओडिसी नृत्य
पेशा नर्तिका, गुरू
गौरव
गौरव पद्मश्री (१९७५)
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७६)

संजुक्ता पाणीग्रही (२४ ऑगस्ट, १९४४ - २४ जून, १९९७) या एक भारतीय ओडिसी नृत्यांगना होत्या.

त्यांच्या ओडिसी नृत्यकलेतील योगदानासाठी त्यांना पद्मश्री (१९७५) पुरस्कार मिळाला.[] त्यांना १९७६ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविले गेले.[]

पाणीग्रही ह्यांनी ओडिसी नृत्याचे खूप लहानपणापासूनच सादरीकरण भारताच्या अनेक भागांत तसेच इतर देशांमध्येही केले.[]

सुरुवातीचे आयुष्य

[संपादन]

त्यांचा जन्म बेहरामपूर,जि.गंजम, ओडिसा येथे झाला. त्यांचे आई-वडील शकुंतला आणि अभिराम मिश्रा हे पारंपारिक ब्राम्हण कुटुंबातील होते. []त्यांच्या लहान वयातच त्यांना नृत्याची गोडी लागली होती. त्यांच्या आईने त्यांच्यातील प्रतिभा ओळखली आणि त्यांना प्रोत्साहन दिले.

शिक्षण

[संपादन]

त्यांच्या आईच्या प्रोत्साहनामुळे, त्या चौथ्या वर्षापासून केलुचरण मोहपात्रा ह्यांच्याकडे नृत्य शिक्षणाला सुरुवात केली. बिसुबा मिलन ह्यांनी संजुक्ता ह्यांना सलग तीन वर्षे(१९५०-१९५३) उत्कृष्ट बाल कलाकार म्हणून निवडले. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षी केलेल्या एका सादरीकरणावेळी त्यांनी रंगमंच सोडलाच नाही तर त्यांनी आणखी उत्साहात सादरीकरण चालू ठेवले. आणि त्यावेळी त्यांच्या आईला त्यांना ओरडून रंगमंचावरून खाली बोलवावे लागले. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी कलकत्त्यातील चिल्ड्रन्स लिटील थिएटर येथे आपली कला सादर केली.[]१९५२ साली त्यांना इंटरनॅशनल चिल्ड्रन्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये पहिले पारितोषिक मिळाले. त्यांच्या ह्या यशामुळे त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना चेन्नईमधील कलाक्षेत्र येथे अजून चांगल्या नृत्य शिक्षणासाठी पाठवायचे ठरवले. तिथे त्यांनी रुक्मिणी देवी अरुंडेल ह्यांच्याकडे धडे घेतले. त्या तेथे सहा वर्षे राहिल्या आणि त्यांनी भरतनाट्यम आणि कथकलीमध्ये नृत्यप्राविण्य ही पदवी घेतली. त्यानंतर त्या भारत आणि इतर देशांमध्ये ‘कलाक्षेत्र बॅले ट्रूपच्या’ सदस्या म्हणून फिरल्या. चौदा वर्षाच्या असताना त्या ओडीसाला परत आल्या.राज्य सरकारने त्यांना गुरू हझारीलाल ह्यांच्याकडे भारतीय विद्या भवन,मुंबई येथे कथक शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली. तरीही त्या ते सोडून परत ओडीसाला ओडिसी नृत्यात प्राविण्य मिळवण्यासाठी आल्या.

कारकीर्द

[संपादन]

पहिली काही वर्षे संजुक्ता आणि त्यांच्या पतींसाठी खडतर होती. १९६६ साली जेव्हा संजुक्ता ह्यांच्यासाठी गोष्टी सुरळीत होत होत्या तेव्हा त्यांचे गुरू, केलुचरण मोहपात्रा ह्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी त्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्यावेळी संजुक्ता ह्यांनी एक कार्यक्रम सादर केला. प्रेक्षकांना तो कार्यक्रम खूप आवडला. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. दरम्यान, त्यांचे पती गायकीची तालीम करत होते. त्यानंतर त्या दोघांनी मिळून एकत्र सदरीकारणाला सुरुवात केली आणि पुढील दशकात संजुक्ता-रघुनाथ ह्या दोघांनी मिळून स्वतःसाठी नाव कमावले. त्या दोघांना एकत्रितपणे १९७६ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला. संजुक्ता ह्या गुरू केलुचरण मोहपात्रा ह्यांच्या सर्वोत्तम शिष्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आणि त्यांनी भारतातील सर्व भागांमध्ये प्रवास आणि सादरीकरणे केली.[]

पुरस्कार

[संपादन]
  • पद्मश्री(१९७५)
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार(१९७६)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2017-09-14 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2020-03-28 रोजी पाहिले.
  2. ^ "SNA: Awardeeslist::". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2012-02-17. 2020-03-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  3. ^ "Sanjukta: the danseuse who revived Odissi". web.archive.org. 2000-04-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-28 रोजी पाहिले.
  4. ^ Bhattacharya, Rimli. "Sanjukta Panigrahi: The Revivalist Of Odissi | #IndianWomenInHistory". Feminism In India (इंग्रजी भाषेत). 2020-03-28 रोजी पाहिले.
  5. ^ "Sanjukta Panigrahi : Biography, Life Journey, Awards and Achievements". Who-is-who (इंग्रजी भाषेत). 2020-03-28 रोजी पाहिले.
  6. ^ "WELCOME TO SRJAN". www.srjan.com. 2020-03-28 रोजी पाहिले.