केलुचरण मोहपात्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नृत्यग्राम संस्थेतील शिल्प

केलुचरण मोहपात्रा (जन्म : ८ जानेवारी १९२६; - ७ एप्रिल २००४ ) हे अभिजात भारतीय ओडिसी नर्तक आणि गुरू होते. [१] त्यांनी विसाव्या शतकात ओडिसी नृत्य कलेचे पुनरुज्जीवन केले.[२] पद्मविभूषण हा पुरस्कार मिळवणारे ते ओरिसातील पहिली व्यक्ती आहेत.[३]

प्रारंभीचे आयुष्य[संपादन]

भगवान जगन्नाथाला प्रसन्न करण्यासाठी सादर केला जाणारा गोतीपुआ हा ओरिसातील पारंपरिक नृत्यप्रकार गुरू केलुचरण मोहपात्रा यांनी तरुणपणीच सादर केला. यात स्त्रियांची वेशभूषा करून पुरुष नृत्य करीत असत.

कलेचे पुनरुज्जीवन[संपादन]

नंतरच्या आयुष्यात त्यांनी गोतीपुआ व माहारी या नृत्य प्रकारांत संशोधन केले, व त्यांतून त्यांनी एकूणच ओडिसी नृत्याची पुनर्बांधणी केली.[४]गुरू केलुचरण मोहपात्रा हे तालवाद्यवादनात कुशल होते. मृदंग, पखवाज व तबला ह्यांतील त्यांचे कौशल्य त्यांनी केलेल्या नृत्यरचनांतून दिसून येते. पारंपरिक पट्टचित्रकला प्रकारातही ते प्रवीण होते.

ओडिसी नृत्याचे सादरीकरण

नृत्यसंस्था[संपादन]

गुरू केलुचरण मोहपात्रा, त्यांच्या पत्नी लक्ष्मीप्रिया व मुलगा रतिकांत ह्यांनी सन १९९३मध्ये सृजन ही नृत्यसंस्था स्थापन केली.

सन्मान व पुरस्कार[संपादन]

  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार - इ.स.१९६६
  • पद्मश्री- इ.स.१९७४
  • पद्म भूषण -इ.स. १९८८
  • संगीत नाटक अकादमी फेलोशिप- इ.स.१९९१
  • पद्म विभूषण- इ.स. २०००
  • मध्य प्रदेश शासनाकडून कालिदास सन्मान

संदर्भ[संपादन]

  1. ^ Citaristi, Ileana (2001-01-01). The Making of a Guru: Kelucharan Mohapatra, His Life and Times (इंग्रजी भाषेत). Manohar. ISBN 9788173043697.
  2. ^ Verma, Archana (2011-01-18). Performance and Culture: Narrative, Image and Enactment in India (इंग्रजी भाषेत). Cambridge Scholars Publishing. ISBN 9781443828321.
  3. ^ KISSELGOFFOCT., ANNA (OCT. 19, 2000). "DANCE REVIEW; Sculptural And Sensual, It's Odissi". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ Sangeet Natak (इंग्रजी भाषेत). Sangeet Natak Akademi. 2002.