आनंदसागर (शेगाव)
Appearance
(आनंदसागर, शेगाव या पानावरून पुनर्निर्देशित)
आनंद सागर हे महाराष्ट्राच्या शेगांव गावातील मनोरंजन केंद्र आहे. हे केंद्र श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे सुमारे ३५० एकर जमिनीवर शेगांव येथे येणाऱ्या भक्तांसाठी आध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेत तसेच स्वस्तात जेवण मिळण्याची सोय आहे. खुल्या थिएटरमध्ये दररोज संध्याकाळी ध्वनिप्रकाश प्रदर्शन होते. येथे मत्यालय आणि छोटी रेल्वेगाडीही आहेत.तसेच तिथे ध्यान मंदिर आहे.
कसे जाल
[संपादन]- विमान: सर्वात जवळचा विमानतळ २९२ किमी अंतरावरील नागपूर हे आहे.
- रेल्वे: शेगांव रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या हावडा-नागपूर-मुंबई मार्गावर स्थित आहे. मुंबई सीएसटी, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई, दिल्ली, चेन्नई, सिकंदराबाद, पुणे, टाटानगर, अहमदाबाद, ओखा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, बिलासपूर, हावडा-कोलकाता, शालीमार-कोलकाता, चंद्रपूर, चेन्नई सेंट्रल पासून निघणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या शेगावला थांबतात. नागपूर-पुणे एक्सप्रेस, नवजीवन एक्स्प्रेस, गोंडवाना एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, ओखा-पुरी एक्स्प्रेस आणि एलटीटी-शालीमार एक्स्प्रेस यांतील काही होत.
- रस्त्याने: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकमधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.
- मुक्काम: सरकारी विश्रामगृहे, शेगाव हे आनंदसागर पासून ३.३ किमी दूर आहे. संत गजानन महाराज संस्थान शेगांव अंतर्गत अतिथीगृह देखील उपलब्ध आहेत.