Jump to content

शरावती एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शरावती एक्सप्रेसचा फलक

११०३५/११०३६ शरावती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते म्हैसूर दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी आठवड्यातून दादरम्हैसूर ह्या स्थानकांदरम्यान धावते व १२१३ किमी अंतर २४ तास व १० मिनिटांमध्ये पूर्ण करते. शिमोगाजवळून वाहणाऱ्या शरावती नदीवरून ह्या गाडीचे नाव दिले गेले आहे. ही गाडी पुणे, सातारा, सांगली, बेळगाव, हुबळी ह्या प्रमुख शहरांमधून धावते.

वेळापत्रक

[संपादन]
  • ११०३५ शरावती एक्सप्रेस दादररहून गुरुवारी रात्री २१:३० वाजता निघते व म्हैसूरला दुसऱ्या दिवशी रात्री २१:४० वाजता पोचते.
  • ११०३६ शरावती एक्सप्रेस म्हैसूरहून रविवारी सकाळी ०६:१५ वाजता निघते व दादरला दुसऱ्या दिवशी सकाळी ०५:४५ वाजता पोचते.

थांबे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]