शरावती एक्सप्रेस
Appearance
११०३५/११०३६ शरावती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते म्हैसूर दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी आठवड्यातून दादर व म्हैसूर ह्या स्थानकांदरम्यान धावते व १२१३ किमी अंतर २४ तास व १० मिनिटांमध्ये पूर्ण करते. शिमोगाजवळून वाहणाऱ्या शरावती नदीवरून ह्या गाडीचे नाव दिले गेले आहे. ही गाडी पुणे, सातारा, सांगली, बेळगाव, हुबळी ह्या प्रमुख शहरांमधून धावते.
वेळापत्रक
[संपादन]- ११०३५ शरावती एक्सप्रेस दादररहून गुरुवारी रात्री २१:३० वाजता निघते व म्हैसूरला दुसऱ्या दिवशी रात्री २१:४० वाजता पोचते.
- ११०३६ शरावती एक्सप्रेस म्हैसूरहून रविवारी सकाळी ०६:१५ वाजता निघते व दादरला दुसऱ्या दिवशी सकाळी ०५:४५ वाजता पोचते.
थांबे
[संपादन]- दादर
- कल्याण
- कर्जत
- लोणावळा
- पुणे
- सातारा
- कराड
- सांगली
- मिरज
- दादर
- बेळगाव
- लोंढा
- धारवाड
- हुबळी
- हावेरी
- राणेबेन्नुर
- हरिहर
- दावणगेरे
- चिकजजुर
- बिरुर
- अरसीकेरे
- हासन
- म्हैसूर