शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
स्वामी स्वरूपानंद सरस्वती (२ सप्टेंबर १९२४ - ११ सप्टेंबर २०२२) हे शंकराचार्य आणि लोकनेते होते. १९८२ मध्ये, ते द्वारका , गुजरातमधील द्वारका शारदा पीठम आणि बद्रीनाथ येथील ज्योतीर मठाचे शंकराचार्य बनले.
जीवन
[संपादन]स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म पोथीराम उपाध्याय यांचा जन्म मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात झाला. यांनी वयाच्या नऊव्या वर्षी घर सोडले आणि धार्मिक तीर्थयात्रा सुरू केल्या. त्यांच्या धार्मिक दौऱ्यांदरम्यान ते काशीला पोहोचले आणि तेथे त्यांनी 'ब्रह्मलेन श्रीस्वामी' करपात्री महाराज यांच्याकडून वेद-वेदांग आणि शास्त्र याचे अध्ययन केले. ज्योतिर्मठाचे शंकराचार्य ब्रह्मानंद सरस्वती (इ.स.१९४१ ते इ.स.१९५३) यांचे ते शिष्य बनले. पुढे ते १९८२ मध्ये द्वारका पीठाचे शंकराचार्य देखील बनले. ११ सप्टेंबर २०२२ रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी सरस्वती यांचे नरसिंगपूर येथे निधन झाले. तपोस्थली परमहंसी गंगा आश्रम झोटेश्वर येथे अखेरचा श्वास घेतला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल , आणि इतरांनी यावेळी शोक व्यक्त केला.
कार्य
[संपादन]समाजाच्या प्रगतीसाठी ते त्यांची मते निर्भयपणे मांडत असत. त्यांनी रामराज्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. ते जन आंदोलनातून पुढे आलेले शंकराचार्य होते.
स्वातंत्र्य लढा
[संपादन]वयाच्या १९ व्या वर्षी ते १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात स्वातंत्र्यसैनिक बनले आणि "क्रांतिकारक साधू" म्हणून ओळखले जायचे. यासाठी त्याला तुरुंगवास भोगावा लागला, नऊ महिने आणि आणखी सहा महिन्यांची शिक्षा झाली होती.[१]
धर्म कार्य
[संपादन]१९५० च्या दशकात काँग्रेसविरोधी लोक आंदोलनात ते आघाडीवर होते. त्यांनी रामराज्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. गोहत्या बंदीच्या आंदोलनात १९५४ ते १९७० या काळात त्यांना तीन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी भारताच्या विविध भागात आश्रम चालवले आहेत. बिहारच्या सिंहभूम जिल्ह्यातील ख्रिश्चन धर्मांतरीत हिंदू मोठ्या प्रमाणात होते. त्यांचा आश्रम अशा हिंदूंना परत हिंदू होण्यास प्रोत्साहन देत असे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बदनामीची मोठी मोहीम चालवली गेली होती. ते म्हणाले होते की आर्थिक फायद्यांसाठी धर्मांतराला परावृत्त केले पाहिजे.[२]
वारसा
[संपादन]शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या पश्चात यांच्या वारसाची घोषणा करण्यात आली. स्वामी अविमुक्तेश्वरानंद ज्योतिषपीठ बद्रीनाथ येथील शंकराचार्य बनले आहेत आणि स्वामी सदानंद द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य घोषीत करण्यात आले आहे.
- ^ "Swami Swaroopanand Saraswati Died: राम मंदिर से लेकर RSS तक... शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती के 10 विवाद!". DNA India (हिंदी भाषेत). 2022-09-12 रोजी पाहिले.
- ^ "'Conversion for Economic Benefits Must be Discouraged'". The New Indian Express. 2022-09-12 रोजी पाहिले.