स्वातंत्र्यसैनिक
स्वातंत्र्यसैनिक ही एक अशी व्यक्ती असते जी, तिच्यामते अत्याचारी आणि बेकायदेशीर सरकारांविरुद्ध प्रतिकार चळवळीत गुंतलेली असते. या व्यक्ती सरकारला सत्तेवरून दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हिंसक पद्धती वापरू शकते. एका व्यक्तीचा स्वातंत्र्यसैनिक हा दुसऱ्या व्यक्तीचा दहशतवादी असतो, असे अनेकदा म्हणले जाते.[१]
स्वातंत्र्य सैनिक हा क्रूर किंवा अन्यायी सरकारचा विरोध करतो आणि शस्त्रे वापरून, सहसा संघटित गटाचा भाग म्हणून, सरकारविरुद्ध लढतो. या कृतींचे समर्थन करणारे लोक हा शब्द वापरतात.
स्वातंत्र्यसैनिक हे व्यापारी किंवा जुलमी सरकार इत्यादींविरुद्ध सशस्त्र संघर्षात सामील असलेल्या व्यक्ती असू शकतात; त्यांना क्रांतिकारक किंवा बंडखोर असेही संबोधले जाते.[२]
वापर
[संपादन]या व्यक्तीला विशेषतः त्याच्या विरोधकाकडून अतिरेकी म्हणले जाते. त्याच वेळी, एखाद्या च्या विचारसरणीवर अवलंबून प्रचारात या व्यक्तीला सर्व प्रकारे स्वातंत्र्य सेनानी म्हणले जाऊ शकते (उदा. निकाराग्वामधील मार्क्सवादी सँडिनिस्टा नेतृत्वाविरुद्ध लढलेल्या कॉन्ट्रा बंडखोरांना युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून संबोधले होते). एकंदरीत, हा शब्द सामान्यतः अतिशय व्यक्तिनिष्ठ असतो आणि संदर्भित व्यक्ती किंवा घटकाप्रती मोठा पक्षपात दर्शवतो.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ https://dictionary.cambridge.org/dictionary/english/freedom-fighter
- ^ "Definition of freedom fighter | Dictionary.com". www.dictionary.com (इंग्रजी भाषेत). 2022-07-27 रोजी पाहिले.
- ^ "freedom fighter". Wiktionary (इंग्रजी भाषेत). 2022-04-17.