वीरभद्र सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वीरभद्र सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
वीरभद्र सिंह

कार्यकाळ
२५ डिसेंबर २०१२ – २७ डिसेंबर २०१७
मागील प्रेम कुमार धुमल
पुढील जयराम ठाकूर
कार्यकाळ
६ मार्च २००३ – ३० डिसेंबर २००७
मागील प्रेम कुमार धुमल
पुढील प्रेम कुमार धुमल
कार्यकाळ
३ डिसेंबर १९९३ – २४ मार्च १९९८
मागील शांता कुमार
पुढील प्रेम कुमार धुमल
कार्यकाळ
८ एप्रिल १९८३ – ५ मार्च १९९०
मागील ठाकुर राम लाल
पुढील शांता कुमार

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
२००९ – २०१२
मतदारसंघ मंडी

केंद्रीय पोलाद मंत्री
कार्यकाळ
२८ मे २००९ – १८ जानेवारी २०११
मागील रामविलास पासवान
पुढील बेनी प्रसाद वर्मा

जन्म २३ जून, १९३४ (1934-06-23) (वय: ८९)
सिमला
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सही वीरभद्र सिंहयांची सही

वीरभद्र सिंह ( २३ जून १९३४) हे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते आजवर चार वेळा हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत. इ.स.मे २००९ ते जानेवारी २०११ यादरम्यान केंद्रातील मनमोहन सिंह सरकारमध्ये ते पोलादमंत्री होते. तसेच ते एप्रिल इ.स. १९८३ ते मार्च इ.स. १९९०, डिसेंबर इ.स. १९९३ ते मार्च इ.स. १९९८ आणि मार्च इ.स. २००३ ते डिसेंबर इ.स. २००७ दरम्यान हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते.

ते इ.स. १९६२, इ.स. १९६७, इ.स. १९७१, इ.स. १९८० आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये हिमाचल प्रदेश मधून लोकसभेवर निवडून गेले होते.

बाह्य दुवे[संपादन]