"एकांकिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ४७: ओळ ४७:
इत्यादी.
इत्यादी.


==अप्रसिद्ध एकांकिका==
==तितक्याश्या प्रसिद्ध नसलेल्या नवीन एकांकिका==
एक एप्रिल, जेवणावळ, नूपुरी, पंचकर्म, मोहर, यद्दर द ब्लाथिंग्ज, वास इज दास, वेटिंग फॉर सुपरमॅन,
एक एप्रिल, चिअर्स, जेवणावळ, ट्रुथ ॲन्ड अदरवाईज, नूपुरी, पंचकर्म, पडद्यामागचा घोळ, मोहर, यद्दर द ब्लाथिंग्ज, वास इज दास, वेटिंग फॉर सुपरमॅन,


==मराठीत एकांकिकांच्या स्पर्धा घेणाऱ्या संस्था: ==
==मराठीत एकांकिकांच्या स्पर्धा घेणाऱ्या संस्था: ==

२१:२०, ४ जून २०१२ ची आवृत्ती

एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. स्थलकालाच्या मर्यादित अवकाशात आपल्या सर्व नाट्यशक्ती एककेंद्रित करणारा; थोडक्यात उत्कट, एकसंघ व एकजिनसी परिणाम साधणारा संपूर्ण, स्वयंपूर्ण, एक अंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका. भरताने संस्कृत नाट्यशास्त्रात नाटकांचे दहा प्रकार सांगितले आहेत.त्यांतले भाण, उत्सृष्टिकांक, व्यायोग आणि वीथी हे चार प्रकार एकांकिकांचे आहेत. याचा अर्थ, भरताच्या काळातही ही चार प्रकारची नाटके होत असावीत. स्थल-काल व कथानिकाची एकता साधणाऱ्या, प्रभावी व्यक्तिरेखा असणाऱ्या व एकसंघ स्वरूपाच्या पाच स्वयंपूर्ण एकांकिका भास या नाटककाराने लिहिल्या आहेत. पण भासाला अनुसरून नंतरच्या नाटककारांनी अशा एकांकिका लिहून एक प्रवाही परंपरा निर्माण केल्याचे आढळत नाही. त्यानंतर, भारतामधल्या ब्रिटिश राजवटीच्या काळात मुख्यत्वे संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयावरून स्फूर्ती घेऊन मराठी एकांकिका लिहिल्या गेल्या. स्वातंत्र्यानंतरच्या काळात हा नाट्यप्रकार मराठीत भरभराटीला आला.

एकांकिका सुमारे अर्ध्या ते पाऊण तासाची असते. ती बहुरूपिणी असते. तिला कोणत्याही विषयाचे वावडे नसल्याने ती काव्यमय, चर्चात्मक, प्रहसनासारखी, तत्त्वचिंतनपर किंवा रहस्यकथेसारखी असू शकते. एखाद-दुसरीच मध्यवर्ती व्यक्तिरेखा, अर्थभारित आणि नाट्यगर्भ असे मोजकेसंवाद, तीव्र व उत्कट परिणाम साधणारे प्रसंग या सर्वांच्या साह्याने एकांकिका एकात्म परिणाम साधते. आजची मराठी एकांकिका ही एकप्रवेशी न राहता बहुप्रवेशी आणि बहुकेंद्री झाली आहे.

मराठीतील सुरुवातीच्या एकांकिका या इंग्रजी एकांकिकांचे अनुवाद आणि रूपांतरे असत. उदा० इंग्रजी 'दि सीक्रेट' चा किरातांनी केलेला 'संशयी शिपाई' हा अनुवाद; 'दि डिअर डिपार्टेड' आणि 'कमिंग थ्रू द राय' या एकांकिकांची माधव मनोहर यांनी केलेली अनुक्रमे 'आजोबांच्या मुली' आणि 'जन्मापूर्वी' ही रूपांतरे. तसेच दिवाकरांचे 'आंधळे'(मूळ इंग्रजी लेखक -मेटरलिंक) वगैरे, राम गणेश गडकऱ्यांचे 'दीड पानी नाटक' ही बहुधा अनुवादित नसलेली स्वतंत्र एकांकिका असावी. पुढील काळात अनंत काणेकर, दत्तू बांदेकर, भा.वि. वरेरकर, मो.ग.रांगणेकर, व्यंकटेश वकील, शं.बा.शास्त्री इत्यादी लेखकांच्या एकांकिकाही प्रकाशित झाल्या.

इ.स. १९५० मध्ये भारतीय विद्या भवन या संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एका़किका स्पर्धा घ्यावयास सुरुवात केली, आणि मराठीत एका़किका हा नाट्यप्रकार बहरास आला. आता एकांकिकांच्या अनेक स्पर्धा होतात आणि मराठीत दर वर्षी असंख्य एकांकिका लिहिल्या जातात आणि रंगमंचावर सादर केल्या जातात.

काही प्रसिद्ध एकांकिका

अनुवादित :

  • अभ्यास (शं.ना.नवरे)
  • कदाचित (पु.ल.देशपांडे)
  • खुर्च्या (वृंदावन दंडवते)
  • जनावर (शं.ना.नवरे), वगैरे.

स्वतंत्र :

  • ॲश इज बर्निंग (प्रदीप राणे)
  • अस्तित्व (चंद्रकांत प्रभाकर देशपांडे)
  • इतिहास (चंद्रकांत प्रभाकर देशपांडे)
  • एका म्हाताऱ्याचा खून (महेश एलकुंचवार)
  • काहूर (शफाअतखान)
  • खोटं नाटक (वृंदावन दंडवते)
  • घोटभर पाणी (प्रेमानंद गज्वी)
  • चिऊताई, चिऊताई दार उघड (प्रदीप राणे)
  • छिन्न (वामन तावडे)
  • झुलता पूल (सतीश आळेकर)
  • डिअर पिनाक (सुहास तांबे)
  • देव नवरी (प्रेमानंद गज्वी)
  • पुढारी (वृंदावन दंडवते)
  • बसस्टॉप (सतीश आळेकर)
  • भजन (सतीश आळेकर)
  • भिंत (सतीश आळेकर)
  • मन पिंजऱ्याचे (दिलीप परदेशी)
  • महाद्वार (दिलीप परदेशी)
  • माझी गोष्ट (सुहास तांबे)
  • यमूचे रहस्य (सतीश आळेकर)
  • यातनाघर (महेश एलकुंचवार)
  • रक्तबीज (महेश एलकुंचवार)
  • रायाची राणी (वामन तावडे)
  • वळण (सतीश आळेकर)
  • समुदाय (चंद्रकांत प्रभाकर देशपांडे)
  • सुलतान (महेश एलकुंचवार)
  • होळी (महेश एलकुंचवार)

इत्यादी.

तितक्याश्या प्रसिद्ध नसलेल्या नवीन एकांकिका

एक एप्रिल, चिअर्स, जेवणावळ, ट्रुथ ॲन्ड अदरवाईज, नूपुरी, पंचकर्म, पडद्यामागचा घोळ, मोहर, यद्दर द ब्लाथिंग्ज, वास इज दास, वेटिंग फॉर सुपरमॅन,

मराठीत एकांकिकांच्या स्पर्धा घेणाऱ्या संस्था:

  • अद्वैत एकांकिका स्पर्धा, सेठ जी.एस.(गोविंददास सुंदरदास) मेडिकल कॉलेज व के.ई.एम.(किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालय, मुंबई यांच्यातर्फे
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहमदनगर शाखा (पु.ल.देशपांडे महाकरंडक)
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कल्याण(राम गडकरी करंडक)
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई (विष्णुदास भावे करंडक)
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,नाशिक आयोजित अनंत कुबल एकांकिका स्पर्धा
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा (राम गणेश गडकरी करंडक)
  • अँमॅच्युअर थिएटर, नागोठणे (कोकण करंडक)
  • अमर हिंद मंडळ, दादर यांची कै. आबा पडते एकांकिका स्पर्धा
  • अमर हिंद मंडळ दादर आयोजित, सांस्कृतिक अमावास्या (दर अमावास्येला एकांकिकांच्या रंगीत तालमी)
  • अमृतकुंभ एकांकिका स्पर्धा, मुंबई
  • अवतरण एकांकिका, आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा, मुंबई(?)
  • अस्तित्व हिंदी-मराठी एकांकिका स्पर्धा, मुंबई
  • आम्ही नूमविय एकांकिका करंडक स्पर्धा, पुणे
  • आय.एन.टी(इंडियन नॅशनल थिएटर) मराठी एकांकिका स्पर्धा, मुंबई(प्रवीण जोशी करंडक)
  • आय.एन.टी(इंडियन नॅशनल थिएटर) हिंदी-मराठी-गुजराथी एकांकिका स्पर्धा, मुंबई
  • आय.पी.टी.ए.-इप्टा(इंडियन पीपल्स थिएटर) च्या हिंदी एकांकिका स्पर्धा
  • उत्कर्ष सेवा मंडळींची ‘उंबरठा’ एकांकिका स्पर्धा, मुंबई
  • एकजूट एकांकिका स्पर्धा, मुंबई
  • कराड अर्बन बॅंक सेवक संघ, कऱ्हाड आयोजित (कराड अर्बन बॅंक करंडक) स्पर्धा
  • कला व संस्कृती संचालनालय, गोवा आयोजित स्पर्धा (वेताळेश्वर करंडक)
  • कीर्ति महाविद्यालय, मुंबईतर्फे आंतरमहाविद्यालयीन नाट्यमहोत्सव अंतरंग स्पर्धा
  • गोमंतक मराठी अकादमी, कांदोळी-बारदेश, गोवा
  • चैतन्य करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, सांगली
  • जिभाऊ करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा, नंदुरबार
  • डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या कलारंग एकांकिका स्पर्धा (ज्ञानसाधना करंडक, पुष्पलता डी. पाटील करंडक)
  • ठाणे महापालिकेच्या, ठाणे महापौर करंडक एकांकिका स्पर्धा
  • दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन (विनोदोत्तम करंडक)
  • दिलीप प्रभावळकर एकांकिका स्पर्धा,नवी मुंबई
  • दैनिक सकाळ. औरंगाबाद, कल्याण, जळगांव, पुणे, मुंबई वगैरे (सकाळ करंडक)
  • पाली करंडक स्पर्धा, मुंबई
  • मराठवाडा मित्रमंडळ आयोजित बाल एकांकिका स्पर्धा
  • महाबॅंक रंगददक्षिणी स्पर्धा, बंगलोर
  • महाराष्ट्र कलोपासक, पुणे(पुरुषोत्तम करंडक)
  • मिलिंद कला मंडळ, बाप्टी रोड, मुंबई
  • मृगजळ एकांकिका स्पर्धा (साठ्ये आणि डहाणूकर कॉलेज माजी विद्यार्थीसंघातर्फे), मुंबई
  • राज करंडक स्पर्धा, पुणे
  • वेध थिएटर्स आयोजित ’माय बाबा मराठी एकांकिका स्पर्धा‘
  • शाहू मोडक करंडक एकांकिका स्पर्धा, अहमदनगर
  • सन्मित्र, पेण (पु.नि.देव स्मृतिकरंडक)
  • सवाई स्पर्धा, मुंबई
  • सेठ जी.एस.(गोविंददास सुंदरदास) मेडिकल कॉलेज व के.ई.एम.(किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालय, मुंबई यांच्यातर्फे ‘अद्वैत एकांकिका स्पर्धा’
  • सहमती पुणे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कलादर्शन स्पर्धा (फिरोदिया करंडक)
  • स्वागताध्यक्ष खासदार करंडक एकांकिका स्पर्धा, अहमदनगर
  • स्वाभिमान संघटना पुणे आयोजित एकांकिका स्पर्धा
  • ज्ञानक्रांती शैक्षणिक व सामाजिक संस्था, पाषाण, पुणे (ज्ञानक्रांती करंडक)