Jump to content

"कारगिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९: ओळ २९:
[[श्रीनगर]] ते [[लेह]] दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग १ डी]] कारगीलमधून जातो. कारगीलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. [[कारगील विमानतळ]] सध्या [[भारतीय हवाई दल]]ाच्या ताब्यात असून येथे नागरी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
[[श्रीनगर]] ते [[लेह]] दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग १ डी]] कारगीलमधून जातो. कारगीलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. [[कारगील विमानतळ]] सध्या [[भारतीय हवाई दल]]ाच्या ताब्यात असून येथे नागरी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


१९९९ साली [[पाकिस्तान]]ी लष्कराने घुसखोरी करून कारगील भागावर अतिक्रमण केले होते. ह्यामुळे झालेल्या [[कारगील युद्ध]]ात [[भारतीय लष्कर]]ाने पाकिस्तानला येथून हुसकावून लावले व कारगील पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आणले.
१९९९ साली [[पाकिस्तान]]ी लष्कराने घुसखोरी करून कारगील भागावर अतिक्रमण केले होते. ह्यामुळे झालेल्या [[कारगील युद्ध]]ात [[भारतीय लष्कर]]ाने पाकिस्तानला येथून हुसकावून लावले व कारगील पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आणले. हे युद्ध एकूण ६० दिवस चालले. युद्धात ३०,००० भारतीय सैनिकांनी लढाई केली. ५५७ सैनिक मृत्युमुखी पडले, १३६३ जखमी झाले.

कारगील युद्धात भारताच्या बोफोर्ससहित ३०० तोफांचा वापर झाला. अडीच लाख तोफगोळे, बाँब आणि ऱाॅकेट्स डागले. रोज ३०० तोफांमधून ५००० गोळे, माॅर्टर बाँब आणि राॅकेत्स डागले जात होते. शत्रूचे ८०% सैनिक मारले गेले. टायगर हिल्सवर ताबा मिळविण्यासाठी ९,००० तोफगोळ्यांचा मारा झाला. मीडियम रेंजच्या ज्या बोफोर्सच्या तोफांचे आयुष्य ४० वर्षे असल्याचे सांगितले जात होते, त्या तोफांपैकी १८ तोफा २५ दिवसात निकामी झाल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात एकाचवेळी एवढे फायरिंग झाले.

लढाईच्या पहिल्या तीन आठवड्यात भारतीय हवाई सेनेच्या ३०० विमानांनी ६,५०० उड्डाणे केली. युदधात मिग-२१, मिग-२३, मिग-२५, मिग-२७, मिग-२९, जग्वार, मिराज-२००० ही विमाने आणि एमआय-१७ हे हेलिकाॅप्टर यांचा सहभाग होता.
एकूण विमानांमध्ये १२०० लढाऊ विमाने होती. सर्वात जास्त काम हल्ले वेस्टर्न कमांडच्या विमानांनी केले. त्यांनी ६,५०० टन दारूगोळा, पाणी आणि अन्य मालाची वाहतूक केली.

कॅप्टन बत्राने ७ जुलै १९९९ रोजी कारगीलजवळचे जे शिखर काबीज केले त्याला हल्ली बत्रा टाॅप म्हणतात.

==कारगील युद्धाची दिनदर्शिका==
* ३ मे १९९९ - एका गुरे चरणाऱ्या धनगराने (ताशी नामग्यालने) कारगीलमध्ये पाकिस्तानी सैनिक घुसल्याची बातमी सैन्याला कळवली.
* ५ ते १५ मे - भारतीय सैन्याने सर्वेक्षण केले. ते करणाऱ्यांपैकी कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाला.
* २५ मे - हवाई दलाला हल्ला करण्याचा आदेश. २६ मे रोजी हल्ले सुरू.
* १३ जून - सैन्याने तोलोलिंग शिखर काबीज केले. हे श्रीनगर-लेह मार्गावरचे महत्त्वाचे ठिकाण आहे.
* १५ जून - पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेत पोहोचले, त्यांना राष्ट्रपती बिल क्लिंटनने पाकिस्तानी सैनिकांना कारगीलमधून मागे हटवण्यास सांगितले.
* २९ जून - भारतीय सैन्याने टायगर हिलजवळच्या दोन चौक्या जिंकल्या.
* ४ जुलै - टायगर हिलवर भारतीय सैन्याचा ताबा. इथपासून भारतीय सैन्याच्या विजयाची सुरुवात झाली.
* १४ जुलै - भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' यशस्वी झाल्याची घोषणा केली.
* २६ जुलै १९९९ - पाकिस्तानने पराभव मान्य केला.



==कारगीलविषयक पुस्तके==
==कारगीलविषयक पुस्तके==

१३:२६, २६ जुलै २०१९ ची आवृत्ती

कारगील
ആലപ്പുഴ
भारतामधील शहर


कारगील is located in जम्मू आणि काश्मीर
कारगील
कारगील
कारगीलचे जम्मू आणि काश्मीरमधील स्थान
कारगील is located in भारत
कारगील
कारगील
कारगीलचे भारतमधील स्थान

गुणक: 34°33′N 76°8′E / 34.550°N 76.133°E / 34.550; 76.133

देश भारत ध्वज भारत
राज्य जम्मू आणि काश्मीर
जिल्हा कारगिल
समुद्रसपाटीपासुन उंची ८,७८० फूट (२,६८० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,४३,३८८
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


कारगील हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या लडाख भौगोलिक प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात नियंत्रण रेषेच्या जवळ वसले असून ते श्रीनगरच्या पूर्वेस २०४ किमीवर तर लेहच्या २३४ किमी पश्चिमेस आहे. कारगील हे लडाख प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली त्याची १.४३ लाख होती. हिमालय पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून २,६७६ मी उंचीवरील कारगील शहर हे सुरू नदीच्या किनाऱ्यावर आहे.

श्रीनगर ते लेह दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ डी कारगीलमधून जातो. कारगीलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. कारगील विमानतळ सध्या भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असून येथे नागरी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

१९९९ साली पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून कारगील भागावर अतिक्रमण केले होते. ह्यामुळे झालेल्या कारगील युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला येथून हुसकावून लावले व कारगील पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आणले. हे युद्ध एकूण ६० दिवस चालले. युद्धात ३०,००० भारतीय सैनिकांनी लढाई केली. ५५७ सैनिक मृत्युमुखी पडले, १३६३ जखमी झाले.

कारगील युद्धात भारताच्या बोफोर्ससहित ३०० तोफांचा वापर झाला. अडीच लाख तोफगोळे, बाँब आणि ऱाॅकेट्स डागले. रोज ३०० तोफांमधून ५००० गोळे, माॅर्टर बाँब आणि राॅकेत्स डागले जात होते. शत्रूचे ८०% सैनिक मारले गेले. टायगर हिल्सवर ताबा मिळविण्यासाठी ९,००० तोफगोळ्यांचा मारा झाला. मीडियम रेंजच्या ज्या बोफोर्सच्या तोफांचे आयुष्य ४० वर्षे असल्याचे सांगितले जात होते, त्या तोफांपैकी १८ तोफा २५ दिवसात निकामी झाल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात एकाचवेळी एवढे फायरिंग झाले.

लढाईच्या पहिल्या तीन आठवड्यात भारतीय हवाई सेनेच्या ३०० विमानांनी ६,५०० उड्डाणे केली. युदधात मिग-२१, मिग-२३, मिग-२५, मिग-२७, मिग-२९, जग्वार, मिराज-२००० ही विमाने आणि एमआय-१७ हे हेलिकाॅप्टर यांचा सहभाग होता. एकूण विमानांमध्ये १२०० लढाऊ विमाने होती. सर्वात जास्त काम हल्ले वेस्टर्न कमांडच्या विमानांनी केले. त्यांनी ६,५०० टन दारूगोळा, पाणी आणि अन्य मालाची वाहतूक केली.

कॅप्टन बत्राने ७ जुलै १९९९ रोजी कारगीलजवळचे जे शिखर काबीज केले त्याला हल्ली बत्रा टाॅप म्हणतात.

कारगील युद्धाची दिनदर्शिका

  • ३ मे १९९९ - एका गुरे चरणाऱ्या धनगराने (ताशी नामग्यालने) कारगीलमध्ये पाकिस्तानी सैनिक घुसल्याची बातमी सैन्याला कळवली.
  • ५ ते १५ मे - भारतीय सैन्याने सर्वेक्षण केले. ते करणाऱ्यांपैकी कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाला.
  • २५ मे - हवाई दलाला हल्ला करण्याचा आदेश. २६ मे रोजी हल्ले सुरू.
  • १३ जून - सैन्याने तोलोलिंग शिखर काबीज केले. हे श्रीनगर-लेह मार्गावरचे महत्त्वाचे ठिकाण आहे.
  • १५ जून - पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेत पोहोचले, त्यांना राष्ट्रपती बिल क्लिंटनने पाकिस्तानी सैनिकांना कारगीलमधून मागे हटवण्यास सांगितले.
  • २९ जून - भारतीय सैन्याने टायगर हिलजवळच्या दोन चौक्या जिंकल्या.
  • ४ जुलै - टायगर हिलवर भारतीय सैन्याचा ताबा. इथपासून भारतीय सैन्याच्या विजयाची सुरुवात झाली.
  • १४ जुलै - भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' यशस्वी झाल्याची घोषणा केली.
  • २६ जुलै १९९९ - पाकिस्तानने पराभव मान्य केला.


कारगीलविषयक पुस्तके

  • अनटोल्ड स्टोरीज ऑफ द वाॅर (इंग्रजी, लेखिका कारगीलच्या युद्धात सहभागी असलेल्या कॅप्टन मनोज रावत यांच्या पत्नी - रचना बिष्ट रावत)
  • कारगिल (हेमन कर्णिक)
  • कारगिल आणि भारताची संरक्षणसिद्धता (पन्नालाल सुराणा)
  • कारगिल काय घडले कसे जिंकले (मिलिंद वेर्लेकर)
  • कारगिल विजय (नाटक, रमेश रोहोकले )
  • कारगिलचे परमवीर (कॅप्टन राजा लिमये)
  • कारगिलच्या युद्धकथा (बालसाहित्य, लेखक - दत्ता टोळ)
  • कारगील : अनपेक्षित धक्का ते विजय (अनुवादित, [[प्रशांत तळणीकर[[; मूळ इंग्रजी, Kargil : From Surprise to Victory - by General Ved Prakash Mullic)
  • कारगिल के परमवीर कॅप्टन विक्रम बत्रा (हिंदी, जी.एल. बत्रा)
  • काश्मीर से कारगिल तक (हिंदी, शुभंवदा पाण्डेय)
  • डोमेल ते कारगील (शशिकांत पित्रे)
  • द शेरशाह ऑफ कारगिल"- कॅप्टन विक्रम बत्रा यांचे चरित्र (हिंदी)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत