"गणेश चतुर्थी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Fixing double redirect to गणेशोत्सव |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) श्री गणेश चतुर्थी लेख स्थानांतर केला खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:Ganesh chaturthi 01.jpg|thumb|गणेश चतुर्थी पूजा]] |
|||
⚫ | |||
'''श्री गणेश चतुर्थी''' हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=g4TtrdejbTEC&pg=PA54&dq=ganesh+chaturthi&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjnmuCX673jAhUFfH0KHby_BI8Q6AEIRzAF#v=onepage&q=ganesh%20chaturthi&f=false|title=Festivals of India|last=Gupta|first=Shobhna|date=2002|publisher=Har-Anand Publications|isbn=9788124108697|language=en}}</ref>भाद्रपद चतुर्थीपासून [[अनंत चतुर्दशी]]पर्यंत महाराष्ट्रात फार मोठा उत्सव साजरा होत असतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=75otAAAAMAAJ&q=ganesh+chaturthi+pooja&dq=ganesh+chaturthi+pooja&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjju4rT9r3jAhUbWCsKHfLsCt04FBDoAQhNMAY|title=Prācīna Bhāratīya saṃskr̥ti kośa: Vaidika kāla se 12 vīṃ śatābdī taka|last=Bahri|first=Hardev|date=1988|publisher=Vidyā Prakāśana Mandira|language=hi}}</ref> या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]] केली. |
|||
गणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.<ref> गणेश कोश, संपादक- अमरेंद्र गाडगीळ</ref> |
|||
==गणेश चतुर्थी व्रत== |
|||
गाणपत्य संप्रदायाचे हे एक महत्वाचे व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जावून, स्नान करून मातीची आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती लगेच नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हणतात. |
|||
गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होवून पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते.<ref> गणेश कोश, संपादक- अमरेंद्र गाडगीळ</ref> |
|||
==प्रतिष्ठापना पूजा== |
|||
गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.<ref name=":0" /> |
|||
श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन,स्नान,अभिषेक,वस्त्र,[[चंदन]],फुले,पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. त्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.उदा. [[शमी]] ही थंड गुणाची वनस्पती आहे. उष्णतेच्या विकारांवर शमीच्या पाल्याचा रस, [[जिरे]] आणि खडीसाखर एकत्र करून देतात.[[धोत्रा|धोत-याची]] झाडे सर्वत्र उपलब्ध असतात. दम्याच्या विकारात कफ असेल तर धोत-याच्या पानांची धुरी देतात. सुजेवर धोत-याचा रस लावतात.मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।। पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे.’ श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=dJ0HAQAAIAAJ&q=ganesh+chaturthi+pooja&dq=ganesh+chaturthi+pooja&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwj9m8uz9r3jAhXUdCsKHTcmDC44ChDoAQg5MAM|title=Hamāre sāṃskṛtika parva-tyohāra|last=Siṃha|first=Māheśvarī|date=1982|publisher=Pārijāta-prakāśana|language=hi}}</ref> |
|||
== हे ही पहा== |
|||
⚫ | |||
[[भाद्रपद]]<br> |
|||
[[गणपती]]<br> |
|||
== संदर्भ == |
|||
[[वर्ग:हिंदू दैवते]] |
|||
[[वर्ग:हिंदू धर्म उपासना पद्धती]] |
|||
[[वर्ग:सण आणि उत्सव]] |
१५:१२, १८ जुलै २०१९ ची आवृत्ती
श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.[१]भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात फार मोठा उत्सव साजरा होत असतो.[२] या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली.
गणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.[३]
गणेश चतुर्थी व्रत
गाणपत्य संप्रदायाचे हे एक महत्वाचे व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जावून, स्नान करून मातीची आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती लगेच नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हणतात. गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होवून पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते.[४]
प्रतिष्ठापना पूजा
गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.[१] श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन,स्नान,अभिषेक,वस्त्र,चंदन,फुले,पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. त्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.उदा. शमी ही थंड गुणाची वनस्पती आहे. उष्णतेच्या विकारांवर शमीच्या पाल्याचा रस, जिरे आणि खडीसाखर एकत्र करून देतात.धोत-याची झाडे सर्वत्र उपलब्ध असतात. दम्याच्या विकारात कफ असेल तर धोत-याच्या पानांची धुरी देतात. सुजेवर धोत-याचा रस लावतात.मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।। पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे.’ श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात.[५]
हे ही पहा
संदर्भ
- ^ a b Gupta, Shobhna (2002). Festivals of India (इंग्रजी भाषेत). Har-Anand Publications. ISBN 9788124108697.
- ^ Bahri, Hardev (1988). Prācīna Bhāratīya saṃskr̥ti kośa: Vaidika kāla se 12 vīṃ śatābdī taka (हिंदी भाषेत). Vidyā Prakāśana Mandira.
- ^ गणेश कोश, संपादक- अमरेंद्र गाडगीळ
- ^ गणेश कोश, संपादक- अमरेंद्र गाडगीळ
- ^ Siṃha, Māheśvarī (1982). Hamāre sāṃskṛtika parva-tyohāra (हिंदी भाषेत). Pārijāta-prakāśana.