"गोंधळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५: ओळ ५:
पूर्वीं मराठेशाहींत सरकारी गोंधळी नेमिलेले असत. त्यांची कामें पुढील जावत्यांवरून कळतील.
पूर्वीं मराठेशाहींत सरकारी गोंधळी नेमिलेले असत. त्यांची कामें पुढील जावत्यांवरून कळतील.

==गों ध ळी जा ब ता.==
गोंधळी यांनीं दरमहा पौर्णिमेस प्रात:काळीं अंघोळ करून, गंध लावून वस्त्रपात्र स्वच्छतेनें सरकार वाड्यांत येऊन तख्तापुढें गोंधळ रात्रौ नेमानें करून जात यावें. लिहिल्याप्रमाणें आपलें काम हुशारीनें करावें. यांत अंतर पडूं नये. पौर्णिमेस अगर जेव्हां हुकूम होईल त्या वेळेस जमत जावें. सदरहू लिहिल्याप्रमाणें बंदोबस्त हुशारीनें सरकार चाकरी करून दाखवील, त्याजवर सरकारमेहेरबानी होईल. हें समजोन हुशारीनें वागावें. सरकारांतून चालावयाचे जाबते:-

# दरमहा पौर्णिमेस व चंपाषष्ठीच्या गोंधळाबद्दल रुपया एक व खण पावतो. त्याप्रमाणें पावेल.

# पोतास खादी व ओवाळणीबद्दल रुपया एकपावतो म्हणोन कलम. त्यास शिरस्त्याप्रमाणें पावेल, व रोजमुरा दोन ताफ्यांस पावतो त्याप्रमाणें पावेल.

# दस-याच्या पूजेस चौंडक्यास पागोटीं दोन व दिपवाळीबद्दल तेल व फराळाचें सालाबादीप्रमाणें पावत जाईल.

या जाबत्याप्रमाणें प्रतापसिंह छत्रपति सातारकर यांची व्यवस्था होती.
==संदर्भ==
[[वर्ग: जाती]]
[[वर्ग: जाती]]
[[वर्ग: हिंदू धर्म]]
[[वर्ग: हिंदू धर्म]]

११:१३, १३ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

गोंधळी ही हिंदू जात आहे. या समूहाचे लोक जगदंबा देवीस आपले आराध्य दैवत मानतात. हा समाज गोंधळ, पोवाडे, वासुदेव यातून जनजागृती करतात.

या जातीची विशेष वस्ती हैदरबाद संस्थान आणि वर्‍हाड-मध्यप्रांत या भागांतून आहे. मुंबई इलाख्यांत गुजराथखेरीज करून सर्व इलाख्याभर हे लोक पसरलेले आहेत. पण एकंदर लोकसंख्या हजाराच्या आत आहे. यांचे मूळ वसतिस्थान माहूर व तुळजापूर हे असून आपण २००-३०० वर्षांपूर्वीं दक्षिणोत आलो असे हे सांगतात. हे अंबाबाई भवानीचे सेवेकरी असल्यामुळे खालच्या जातीच्या लोकांत यांना चांगला मान मिळतो. मराठ्यांच्या सत्तेच्या आरंभी गोंधळी लोक आपले पोवाडे गाऊन अशिक्षित लोकांमध्ये देशाभिमान जागृत ठेवीत असत. हे लोक गोंधळ करून व भवानीच्या नावावर भिक्षा मागून आपले पोट भरतात. मुंबई इलाख्यांत (१) मराठे, (२) कुंभार, (३) कडमराय, (४) रेणुकराय, (५) ब्राह्यण, (६) अकरमाशे अशा सहा पोटजाती यांमध्ये आहेत. संस्कार व रीतिरिवाज या बाबतींत मराठे कुणब्यांप्रमाणे वागतात. यांचा दर्जा मराठ्यांहून खाली आहे. मध्यप्रांतात यांच्या जाती पुढीलप्रमाणे आढळून येतातः- ब्राह्यण, मराठे, माने, कुणबी, खैरेकुणबी, तेली, महार, मांग व बिदुर तसेच देशकर, गंगापारे व हिजडे लोकही यांच्यात मिळसतात. यांची गोत्रे, डोकेंफोड, सुक्त मुके, जवल, पंचांगे इत्यादि होत. लग्नांत वराच्या गळ्यांत त्याच्या जातींतील ५ विवाहित लोक कवड्याची माळ घालतात; हाच गोंधळी होण्याचा विधि आहे. उच्च जातीच्या लग्नाकार्यांत किंवा नवसाचा गोंधळ करण्यास यांस बोलावतात. गोंधळास चार माणसेे लागतात. कोणी लोक नवसांकरितांहि गोंधळी होतात. स्वत:ची जात न सोडतां त्यांस ही दीक्षा घेतां येते.[१]

पूर्वीं मराठेशाहींत सरकारी गोंधळी नेमिलेले असत. त्यांची कामें पुढील जावत्यांवरून कळतील.

गों ध ळी जा ब ता.

गोंधळी यांनीं दरमहा पौर्णिमेस प्रात:काळीं अंघोळ करून, गंध लावून वस्त्रपात्र स्वच्छतेनें सरकार वाड्यांत येऊन तख्तापुढें गोंधळ रात्रौ नेमानें करून जात यावें. लिहिल्याप्रमाणें आपलें काम हुशारीनें करावें. यांत अंतर पडूं नये. पौर्णिमेस अगर जेव्हां हुकूम होईल त्या वेळेस जमत जावें. सदरहू लिहिल्याप्रमाणें बंदोबस्त हुशारीनें सरकार चाकरी करून दाखवील, त्याजवर सरकारमेहेरबानी होईल. हें समजोन हुशारीनें वागावें. सरकारांतून चालावयाचे जाबते:-

  1. दरमहा पौर्णिमेस व चंपाषष्ठीच्या गोंधळाबद्दल रुपया एक व खण पावतो. त्याप्रमाणें पावेल.
  1. पोतास खादी व ओवाळणीबद्दल रुपया एकपावतो म्हणोन कलम. त्यास शिरस्त्याप्रमाणें पावेल, व रोजमुरा दोन ताफ्यांस पावतो त्याप्रमाणें पावेल.
  1. दस-याच्या पूजेस चौंडक्यास पागोटीं दोन व दिपवाळीबद्दल तेल व फराळाचें सालाबादीप्रमाणें पावत जाईल.

या जाबत्याप्रमाणें प्रतापसिंह छत्रपति सातारकर यांची व्यवस्था होती.

संदर्भ

  1. ^ [सेन्सस रिपोर्ट, सन १९११ (मुंबई); रसेल व हिरालाल].