Jump to content

"असुर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११: ओळ ११:
* अघासुर : बकासुराचा भाऊ. याला कृष्णाने मारले.
* अघासुर : बकासुराचा भाऊ. याला कृष्णाने मारले.
* अरिष्टासुर : याला श्रीकृष्णाने बालपणीच मारले. ह्याचेच दुसरे नाव वृषभासुर.
* अरिष्टासुर : याला श्रीकृष्णाने बालपणीच मारले. ह्याचेच दुसरे नाव वृषभासुर.
* आग्यासुर : [[असुर जमात|असुर जमातीची]] देवता.
* कामासुर : याला [[मुकाम्बिका]] देवीने मारले.
* कोयलासुर : [[असुर जमात|असुर जमातीची]] देवता.
* गजासुर : हा महिषासुराचा मुलगा. इच्छेनुसार कधीही हत्ती होऊ शकत असे. ब्रह्मदेवाने याला कामवासनेने वश होणार्‍या व्यक्तीकडून मरण येणार नाही असा वर दिला होता. शंकराने याला मारून याचे डोके गणपतीला बसवले.
* गजासुर : हा महिषासुराचा मुलगा. इच्छेनुसार कधीही हत्ती होऊ शकत असे. ब्रह्मदेवाने याला कामवासनेने वश होणार्‍या व्यक्तीकडून मरण येणार नाही असा वर दिला होता. शंकराने याला मारून याचे डोके गणपतीला बसवले.
* गयासुर : याच्या पाठीवर शिळा ठेवून देवांनी यज्ञ केला, आणि त्याला मुक्ती दिली. [[बिहार]]मधल्या ज्या ठिकाण हे घडले तेथे [[गया]] नावाचे शहर आहे.
* गयासुर : याच्या पाठीवर शिळा ठेवून देवांनी यज्ञ केला, आणि त्याला मुक्ती दिली. [[बिहार]]मधल्या ज्या ठिकाण हे घडले तेथे [[गया]] नावाचे शहर आहे.
ओळ २५: ओळ २८:
* मयासुर : त्वष्ट्याचा हा पुत्र मोठा स्थापत्यकार होता. पांडवासाठी याने मयसभा बांधली. २. रावणपत्नी मंदोदरीच्या वडलांचे नावही मयासुर होते.
* मयासुर : त्वष्ट्याचा हा पुत्र मोठा स्थापत्यकार होता. पांडवासाठी याने मयसभा बांधली. २. रावणपत्नी मंदोदरीच्या वडलांचे नावही मयासुर होते.
* महिषासुर : ह्याचा वध दुर्गादेवीने केला.
* महिषासुर : ह्याचा वध दुर्गादेवीने केला.
* लोहासुर : [[असुर जमात|असुर जमातीची]] देवता.
* वत्सासुर : गाईच्या वासराच्या (वत्साच्या) रूपात गायरानात आलेल्या या असुराला कृष्णाने पोटात ठोसे मारून ठार केले.
* वत्सासुर : गाईच्या वासराच्या (वत्साच्या) रूपात गायरानात आलेल्या या असुराला कृष्णाने पोटात ठोसे मारून ठार केले.
* वलासुर : हे अनेक होते. ऋगवेदातील कथेनुसार यांनी देवांच्या गायी पळवून पणींच्या देशात नेल्या होत्या. सरमा नावाच्या कुत्रीने त्यांचा शोध लावला. इंद्राने गाई सोडवून आणल्या.
* वलासुर : हे अनेक होते. ऋगवेदातील कथेनुसार यांनी देवांच्या गायी पळवून पणींच्या देशात नेल्या होत्या. सरमा नावाच्या कुत्रीने त्यांचा शोध लावला. इंद्राने गाई सोडवून आणल्या.

२०:१६, १७ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

असुर किंवा दैत्य हे हिंदू पुराणांत वर्णिलेले लोक आहेत. असुर हे सुर (देव) नाहीत असे लोक होय. असुरांकडे देवांप्रमाणेच अमानवी शक्ती असते.[]

अगदी सुरुवातीच्या वैदिक ग्रंथांमध्ये अग्नी, इंद्र व इतर देवांचा उल्लेख असुर (ज्ञान, शक्ती आणि प्रदेशांचे अधिपती या अर्थाने) असाच केलेला आहे. नंतरच्या वैदिक साहित्यामध्ये आणि वेदोत्तर साहित्यामध्ये देव आणि असुर हे एकमेकांचे शत्रू असून ते एकमेकांवर सतत कुरघोडी करीत असल्याचे आढळते. असुरांचे दोन गट असून त्यांतील 'सुष्ट' असुरांचा नेता वरुण आहे तर 'दुष्ट' असुरांचा नेता वृत्र होय.[]

असुर हे राक्षस, यक्ष किंवा दस्यु या लोकांसमान असले तरी हे गण एकच नाहीत.

काही प्रसिद्ध असुर

  • अंधकासुर : हिरण्याक्षाचा मुलगा. आपल्या शक्तीमुळे हा इतका ताठला की याला पुढचे मागचे काही दिसेना. त्याने पार्वतीला पळवून नेले होते. शंकराने याचा नाश करून पार्वतीला सोडविले आणि अंधकासुराचे रूपांतर वास्तुपुरुषात केले..
  • अनलासुर : हा सतत आग ओकणारा असुर होता. पर्वताएवढा मोठा होऊन गणपतीने या असुराला गिळले. पोटात आग होऊ लागल्याने गणेशाने दुर्वा सेवन केल्या.
  • असुर वरुण : पारसी लोकांचा देव - अहुरबज्ध
  • अघासुर : बकासुराचा भाऊ. याला कृष्णाने मारले.
  • अरिष्टासुर : याला श्रीकृष्णाने बालपणीच मारले. ह्याचेच दुसरे नाव वृषभासुर.
  • आग्यासुर : असुर जमातीची देवता.
  • कामासुर  : याला मुकाम्बिका देवीने मारले.
  • कोयलासुर : असुर जमातीची देवता.
  • गजासुर : हा महिषासुराचा मुलगा. इच्छेनुसार कधीही हत्ती होऊ शकत असे. ब्रह्मदेवाने याला कामवासनेने वश होणार्‍या व्यक्तीकडून मरण येणार नाही असा वर दिला होता. शंकराने याला मारून याचे डोके गणपतीला बसवले.
  • गयासुर : याच्या पाठीवर शिळा ठेवून देवांनी यज्ञ केला, आणि त्याला मुक्ती दिली. बिहारमधल्या ज्या ठिकाण हे घडले तेथे गया नावाचे शहर आहे.
  • घोरासुर : घोरत असलेल्या माणसाला मराठीत घोरासुर म्हणतात. आणि त्याच्या घोरण्यातून निर्माण होणार्‍या संगीताला 'घॊरासुराचे आख्यान'.
  • तारकासुर : ह्याचा वध कार्तिकेयाने केला.
  • त्रिपुरासुर : याला भगवान शंकराने मारले, आणि त्यांची तीन नगरे (पुरे) जाळून टाकली. ही घटना कार्तिक पौर्णिमेला घडली म्हणून त्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरान्तक पौर्णिमा म्हणतात.
  • धेनुकासुर : गाढवाच्या वेशातल्या या असुराच्या तंगड्या धरून छोट्या बलरामाने त्याला झाडावर आपटले. त्यातच त्याचा अंत झाला.
  • नरकासुर : याला सत्यभामेने मारले.
  • प्रलंबासुर : याला बलरामाने मारले.
  • बकासुर : एकचक्रा नगरीच्या जवळ राहणाऱ्या खादाड आणि नरभक्षक बकासुराला भीमाने बुकलून बुकलून मारले. २. बगळ्याच्या रूपात असलेल्या एका बकासुराला गायी चरायला आलेल्या श्रीकृष्णाने गळा दाबून मारले.
  • बाणासुर : श्रीकृष्णाने याचा वध केला.
  • भस्मासुर : श्रीविष्णूने मोहिनीरूप घेऊन याला भस्मसात केले.
  • भौमासुर : नरकासुराचेच दुसरे नाव.
  • मयासुर : त्वष्ट्याचा हा पुत्र मोठा स्थापत्यकार होता. पांडवासाठी याने मयसभा बांधली. २. रावणपत्नी मंदोदरीच्या वडलांचे नावही मयासुर होते.
  • महिषासुर : ह्याचा वध दुर्गादेवीने केला.
  • लोहासुर : असुर जमातीची देवता.
  • वत्सासुर : गाईच्या वासराच्या (वत्साच्या) रूपात गायरानात आलेल्या या असुराला कृष्णाने पोटात ठोसे मारून ठार केले.
  • वलासुर : हे अनेक होते. ऋगवेदातील कथेनुसार यांनी देवांच्या गायी पळवून पणींच्या देशात नेल्या होत्या. सरमा नावाच्या कुत्रीने त्यांचा शोध लावला. इंद्राने गाई सोडवून आणल्या.
  • वृकासुर : भस्मासुराचे आधीचे नाव. २. शकुनीच्या एका मुलाचे नाव वृकासुर हॊते.
  • वृत्रासुर : याला देवराज इंद्राने दधीची ऋषीच्या हाडांपासून बनवलेल्या वज्राने मारले.
  • वृषभासुर : अरिष्टासुराचे दुसरे नाव.
  • व्योमासुर : कंसाच्या या गुप्तहेराने खेळातल्या मेंढ्या बनलेल्या बाल कृष्णाच्या सवंगड्यांना आपल्या गुहेत लपवून ठेवले. कृष्णाने त्याल शोधले आणि ठार केले.
  • शंकासुर : निष्कारण शंका काढणाऱ्या माणसाला शंकासुर म्हणतात.
  • शंखासुर : या नावाचा एक दैत्य समुद्रात रहात असे. त्याल पंचजन हे आणखी एक नाव होते. त्याच्या शरीरावर पांचजन्य नावाचा शंख होता. श्रीकृष्णाने समुद्रात बुडी मारून पंचजनाला मारले आणि शंख ताब्यात घेतला.
  • संकासुर : . हे एका पुष्पवृक्षाचे नाव आहे. काही लोक या झाडाला शंखासुर म्हणतात. इंग्रजीत Peacock Flower Tree. शास्त्रीय नाव - Caesalpinia pulcherrima
  • सिंधुरासुर : या असुराचा वध गणपतीने केला. त्यावेळी गणपती मोरावर बसून आला होता. ज्या ठिकाणी हा वध झाला तेथे, म्हणजे मोरगावात, अष्टविनायकांतले मयुरेश्वराचे देऊळ आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Wash Edward Hale (1999), Ásura in Early Vedic Religion, Motilal Barnarsidass, आयएसबीएन 978-8120800618, pages 2-6
  2. ^ Wash Edward Hale (1999), Ásura in Early Vedic Religion, Motilal Barnarsidass, आयएसबीएन 978-8120800618, page 4