"कथक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{गल्लत|कथकली}} |
{{गल्लत|कथकली}} |
||
[[चित्र:Kathak 3511900193 986f6440f6 b retouched.jpg|thumb|उजवे|कथक नृत्य]] |
[[चित्र:Kathak 3511900193 986f6440f6 b retouched.jpg|thumb|उजवे|कथक नृत्य]] |
||
[[चित्र:Aditi Mangaldas.JPG|thumb|उजवे|कथक कलाकार |
[[चित्र:Aditi Mangaldas.JPG|thumb|उजवे|कथक कलाकार अदिती मंगलदास]] |
||
'''कथक''' किंवा कथ्थक ही एक [[भारत|भारतीय]] [[नृत्य|नृत्यशैली]] आहे. ती भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे. |
'''कथक''' किंवा कथ्थक ही एक [[भारत|भारतीय]] [[नृत्य|नृत्यशैली]] आहे. ती भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे. (इतर प्रकार - ओडिसी, कथकली, कुचिपुडी, भरतनाट्यम्, मणिपुरी, मोहिनीअट्ट्म आणि सत्त्रिया. |
||
हा उत्तर भारतातील प्रमुख नृत्यप्रकार असून भावप्रधान आणि चमत्कारप्रधान तत्त्वाचा समावेश हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे. शास्रीयदृष्ट्या या शैलीत गत, तोडे,नायक नायिका भेद, तत्&zwmj;कार, घुंगुरांचा आवाज, तालवादकासह नर्तकाची जुगलबंदी अशा प्रकारांचा समावेश होतो. या गोष्टीमुळे लोकरंजनही होते. |
हा उत्तर भारतातील प्रमुख नृत्यप्रकार असून भावप्रधान आणि चमत्कारप्रधान तत्त्वाचा समावेश हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे. शास्रीयदृष्ट्या या शैलीत गत, तोडे, नायक नायिका भेद, तत्&zwmj;कार, घुंगुरांचा आवाज, तालवादकासह नर्तकाची जुगलबंदी अशा प्रकारांचा समावेश होतो. या गोष्टीमुळे लोकरंजनही होते. |
||
==कथक शब्दाचे अर्थ== |
==कथक शब्दाचे अर्थ== |
१४:२४, १३ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
कथक किंवा कथ्थक ही एक भारतीय नृत्यशैली आहे. ती भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे. (इतर प्रकार - ओडिसी, कथकली, कुचिपुडी, भरतनाट्यम्, मणिपुरी, मोहिनीअट्ट्म आणि सत्त्रिया.
हा उत्तर भारतातील प्रमुख नृत्यप्रकार असून भावप्रधान आणि चमत्कारप्रधान तत्त्वाचा समावेश हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे. शास्रीयदृष्ट्या या शैलीत गत, तोडे, नायक नायिका भेद, तत्&zwmj;कार, घुंगुरांचा आवाज, तालवादकासह नर्तकाची जुगलबंदी अशा प्रकारांचा समावेश होतो. या गोष्टीमुळे लोकरंजनही होते.
कथक शब्दाचे अर्थ
कथक ह्या शब्दाचा उगम 'कथा कहे सो कथक' अशी सांगितली जाते. म्हणजेच हावभाव आणि हाताच्या व पायाच्या हालचाली वापरून कथा सांगणाऱ्या व्यक्तींपासून कथक हा शब्द आला असे म्हणले जाते. याचाच दुसरा अर्थ कथा सांगणारी शैली म्हणजे कथक असा होतो.
ब्रह्म पुराणात अभिनेता, गायक, नर्तक यांना 'कथक' असे संबोधले आहे. पाली भाषेत 'कथको' याचा अर्थ उपदेशक असा आहे. नेपाळी भाषेत 'कथिको' असा शब्द व्याख्याता या अर्थी दिसून येतो. संगीत रत्नाकर या ग्रंथाच्या नृत्याध्यायामधे 'कथक' हा शब्द अाला आहे.
इतिहास
कथावाचन करणाऱ्यांकडून मंदिरांमधे पौराणिक कथा सांगितल्या जात. त्यानंतर होणाऱ्या कीर्तनात नट मंडळी नृत्य करीत असत. काही सामाजिक कारणांमुळे या नटमंडळींवर तत्कालीन परिस्थितीत बहिष्कार टाकला गेला, त्यामुळे यांनी स्वतःच कथा सांगून नृत्य करण्यास प्रारंभ केला, म्हणून त्यांना 'कत्थक' असे संबोधण्यात येऊ लागले. आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली या नटमंडळींनी नृत्याची शास्त्रीय पद्धती व परिभाषा आत्मसात केली आणि नृत्यप्रधान अंगाने त्यांनी कृष्णाच्या लीलांचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली, आणि कथक नृत्यशैलीचा जन्म झाला.
घराणे परंंपरा
कथकची तीन प्रमुख घराणी सांगितली जातात -
१.जयपूर घराणे - भानुजी हे मुख्य प्रवर्तक. त्यांच्या चार शाखांंचे नायक नत्थूलाल, शंंकरलाल, गिरिधारीलाल, भानजी हे अन्य प्रवर्तक.
२. लखनौ घराणे - ईश्वरीप्रसाद हे प्रवर्तक
३. बनारस घराणे - जानकीप्रसाद हे प्रवर्तक.
यांचबरोबर फारसे प्रचलित नसलेले रायगड घराणे. इतर शास्त्रीय नृृत्य प्रकारांच्या तुलनेत कथकमध्ये पाय ताठ ठेवले जातात. हा कथकवरील मोगल प्रभावामुळे झालेला बदल आहे असे मानले जाते.[१]
प्रसिद्ध कलाकार
अच्छन महाराज, बिरजू महाराज, मनीषा साठे, रोशनकुमारी, हजारी प्रसाद हे कथ्थक नृत्यप्रकारातील प्रसिद्ध कलाकार आहेत.
- ^ डाॅॅ.गर्ग सत्यनारायण, संंगीत विशारद, १९९४