"बोधीवृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७: ओळ ७:
==चित्रदालन==
==चित्रदालन==
<gallery>
<gallery>
File:Maha bodhi temple.jpg|thumb|[[महाबोधी विहार]]
File:Maha bodhi temple.jpg|thumb|[[बिहार]] मधील [[महाबोधी विहार]].
File:Bodhi Baum, Sri Lanka.jpg|thumb|बोधी वृक्ष [[श्रीलंका]]
File:Bodhi Baum, Sri Lanka.jpg|thumb| [[श्रीलंका]] मधील बोधीवृक्ष.
File:Bodhi Tree at Deekshabhoom Nagpur.jpg|thumb|[[दीक्षाभूमी]] मधील बोधीवृक्ष.
</gallery>
</gallery>

== संदर्भ==
== संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

१५:२७, ११ मे २०१७ ची आवृत्ती

बोध गयाच्या महाबोधी विहारातील महाबोधी वृक्ष

बोधीवृक्ष किंवा महाबोधी वृक्ष म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ (Knowledge Tree) होय. पिंपळांच्या वृक्षांना बोधीवृक्ष म्हटले जाते. ‘बोधी’चा अर्थ ज्ञान असा होय. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे, तोच महाबोधीवृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले, तेव्हापासून पिंपळ वृक्षास बोधीवृक्ष संबोधिण्यात येते. ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसवलेला आहे. सम्राट अशोक बुद्धांचा अनुयायी झाला व नित्यनियमाने बोधीवृक्षाचे दर्शन घेवू लागला. तेव्हा त्यांची पत्नी राणी तिश्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होवून तो वृक्ष उपटून टाकला. पण सम्राट अशोकांनी तो पुन्हा लावला. अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधीवृक्षाची एक शाखा (फांदी) श्रीलंकेत नेली व अनुराधापुरात तिचे आरोपण केले गेले.

बौद्ध लोक या वृक्षाला अतिशय पवित्र मानतात व त्याची पूजा करतात. भारहूत व बोधगया येथील शिल्पकामात गजराज हे बोधीवृक्षाची पूजा करीत आहेत अशी चित्र कोरलेली दिसतात. गया महात्म्य, अग्नी पुराण, वायू पुराण इ. ग्रंथात बोधगया व बोधीवृक्ष यांची पुष्कळ महिमा गायलेली आहे.[१]

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड सहावा