"सविता भीमराव आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५४: ओळ ५४:
* बाबासाहेबांच्या सहवासात
* बाबासाहेबांच्या सहवासात


==आंतरजातीय विवाह करणार्‍यांना सरकारी नोकरीत प्राधान्य==
== आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य ==
डॉ. सविता आंबॆडकर यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याची जोजना आखली आहे. या योजनेनुसार अशा दांपत्याला १५००० रुपये रोख, आणि अपत्यांच्या नावाने बँकेत एक लाख रुपये ठेवले जातील आणि मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. पती सवर्ण आणि पत्‍नी मागासवर्गीय असेल तर हल्ली न मिळणार्‍या या प्रकारच्या सवलतीदेखील देण्याचा विचार आहे.
डॉ. सविता आंबेडकर यांच्या नावाने [[महाराष्ट्र सरकार]]ने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याची जोजना आखली आहे. या योजनेनुसार अशा दांपत्याला १५ हजार रुपये रोख आणि अपत्यांच्या नावाने बँकेत लाख रुपये ठेवले जातील आणि मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. पती सवर्ण आणि पत्‍नी मागासवर्गीय (अनु.जाती, अनु. जमाती किंवा इ.मा.व.) असेल तर हल्ली न मिळणाऱ्या या प्रकारच्या सवलतीदेखील देण्याचा विचार आहे.


==हे सुद्धा पहा ==

==संदर्भ ==

==बाह्य दुवे==


{{DEFAULTSORT:आंबेडकर, सविता भीमराव}}
{{DEFAULTSORT:आंबेडकर, सविता भीमराव}}

१२:३७, २७ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

डॉ. सविता भीमराव आंबेडकर
टोपणनाव: माईसाहेब, शारदा
जन्म: जानेवारी २७, १९०९
मृत्यू: मे २९, इ. स. २००३
धर्म: बौद्ध धर्म
पती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर


डॉ. सविता भीमराव आंबेडकर उपाख्य डॉ. माईसाहेब आंबेडकर (जानेवारी २७ इ. स. १९०९ - मे २९ इ. स. २००३) या डॉ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी होत्या.

डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे माहेरचे नाव डॉ. शारदा कबीर. त्यांचे घराणे राजापूर तालुक्यातील दोरला गावचे. त्यांचे वडील इंडियन मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रार होते.

शालेय शिक्षण पुण्यात घेतलेल्या माईंनी मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरीसाठीची एम.बी.बी.एस ही पदवी मिळवली. गुजरातमध्ये काही काळ चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून एका हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर शारदा कबीर मुंबईत आल्या आणि डॉ. मालवणकरांबरोबर काम करू लागल्या. तिथेच १९४७ साली त्यांची आणि रक्तदाबाच्या आणि मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली. डॉ. आंबेडकरांची पहिली पत्‍नी रमाई आंबेडकर यांचे २७ मे १९३५ रोजी निधन झालेले होते त्यानंतर बाबासाहेबांनी प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टर असलेल्या शारदा कबीर यांचेकडून वैद्यकीय सेवा घेतली.

१५ एप्रिल इ. स. १९४८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी सरकारी पद्धतीने विवाहबद्ध होऊन त्या शारदा कबीर च्या सविता आंबेडकर झाल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान लिखाणाच्या काळात आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांच्या काही अनुयायांनी सविताबाईंवर आंबेडकरांची दुखण्यामध्ये योग्य काळजी घेतली नसल्याचे आणि त्यांनी आंबेडकरांना विषप्रयोगाने मारल्याचे आरोप केले. या आरोपांची चौकशी करण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तज्ज्ञांची एक समिती नेमली. समितीने माई आंबेडकरांना सर्व आरोपांतून मुक्त केले.

त्यानंतर डॉ. माईसोबत आंबेडकर दिल्लीत मेहरोलीच्या फार्महाऊसमध्ये राहू लागल्या. दलित पँथरच्या काही लोकांच्या आणि रामदास आठवले, गंगाधर गाडे यांच्यासारख्या काही रिपब्लिकन पार्टीच्या तरुण सदस्यांच्या आग्रहाने माईसाहेब [[दलित चळवळ]एक [[च्या मुख्य प्रवाहात येत होत्या. मात्र वाढत्या वयामुळे व ढासळत्या प्रकृतीमुळे त्यांना ते फार काळ जमले नाही.

डॉ. सविता आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्याचा आधार घेऊन आणि माईंच्या सक्रिय मदतीच्या आधारे डॉ. जब्बार पटेल यांनी आंबेडकरांच्या आयुष्यावर एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट) तयार केला आहे.

डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे दीर्घ आजाराने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात २९ मे २००३ रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. तत्कालीन पंतप्रधान, अटल बिहारी वाजपेयी दुःख व्यक्त करताना म्हणाले की, ‘माई आंबेडकर या बाबासाहेबांच्या स्फूर्तीचा स्रोत होत्या. त्या स्वत:च एक मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या.’

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

बुद्ध आणि त्यांचा धम्म

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘बुद्ध ॲन्ड हिज धम्म’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी त्यांना जगविण्याचे श्रेय सविता आंबेडकरांना दिले होते. हे पुस्तक बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीने प्रसिद्ध केले. ती प्रस्तावना जर छापली असती तर दलित चळवळ सविता आंबेडकरांच्या हातात गेली असती, असे दलित नेत्यांना वाटले, त्यामुळे ती प्रस्तावना पुस्तकातून गाळण्यात आली, असे रावसाहेब कसबे यांचे म्हणणे त्यांनी त्यांच्या ‘भक्ती आणि धम्म’ या पुस्तकात मांडले आहे..

माई आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके

  • बाबासाहेबांच्या सहवासात

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य

डॉ. सविता आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याची जोजना आखली आहे. या योजनेनुसार अशा दांपत्याला १५ हजार रुपये रोख आणि अपत्यांच्या नावाने बँकेत १ लाख रुपये ठेवले जातील आणि मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. पती सवर्ण आणि पत्‍नी मागासवर्गीय (अनु.जाती, अनु. जमाती किंवा इ.मा.व.) असेल तर हल्ली न मिळणाऱ्या या प्रकारच्या सवलतीदेखील देण्याचा विचार आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे