Jump to content

"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४७: ओळ ४७:
* तुला मी मला मी - लेखक गिरीश कर्नाड (अभिनय रीमा लागू)
* तुला मी मला मी - लेखक गिरीश कर्नाड (अभिनय रीमा लागू)
* तेव्हाची ती आत्ताची मी - रीमा लागू
* तेव्हाची ती आत्ताची मी - रीमा लागू
* थोडे आसू, थोडे हासू - रूपाली अवचरे
* संगीत [[धन्य तुकोबा समर्थ]] - नामदेव तळपे (>५० प्रयोग)
* संगीत [[धन्य तुकोबा समर्थ]] - नामदेव तळपे (>५० प्रयोग)
* दिलखुलास - स्वाती सुरंगळीकर (२५०वा प्रयोग-२५ मे २०१३)
* दिलखुलास - स्वाती सुरंगळीकर (२५०वा प्रयोग-२५ मे २०१३)
ओळ ६१: ओळ ६२:
* माता रमाई - ममता वागदे
* माता रमाई - ममता वागदे
* मी अत्रे बोलतोय- सदानंद जोशी (२७५० प्रयोग)
* मी अत्रे बोलतोय- सदानंद जोशी (२७५० प्रयोग)
* मी जिजाऊ बोलतेय (डॉ. स्मिता देशमुख) (१३-११-११पर्यंत ८००हून अधिक प्रयोग) (त्यान्ण्तर, बालकलावंत शिवानी म्हेत्रे)
* मी जिजाऊ बोलतेय (डॉ. स्मिता देशमुख) (१३-११-११पर्यंत ८००हून अधिक प्रयोग) (त्यानंतर, बालकलावंत शिवानी म्हेत्रे)
* मी जिजाऊ व्याख्यानमाला बोलतेय - ब.हि. चिंचवडे
* मी जिजाऊ व्याख्यानमाला बोलतेय - ब.हि. चिंचवडे
* मी जनी नामयाची - अनुराधा पिंगळीकर
* मी जनी नामयाची - अनुराधा पिंगळीकर
ओळ १७३: ओळ १७४:
* राजा नारकर (हास्यचक्र)
* राजा नारकर (हास्यचक्र)
* रीमा लागू (तेव्हाची ती आत्ताची मी )
* रीमा लागू (तेव्हाची ती आत्ताची मी )
* - रूपाली अवचरे (थोडे आसू, थोडे हासू)
* कै. लक्ष्मण देशपांडे (वऱ्हाड निघालंय लंडनला - >२००० प्रयोग)
* कै. लक्ष्मण देशपांडे (वर्‍हाड निघालंय लंडनला - >२००० प्रयोग)
* वंदन नगरकर
* वंदन नगरकर
* [[व.पु. काळे]] (कथाकथन)
* [[व.पु. काळे]] (कथाकथन)

११:२०, ८ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

एका तासापेक्षा जास्त वेळ कोणत्याही विषयावर, अभिनयासह कार्यक्रम सादर करणारी व्यक्ती म्हणजे एकपात्री कलाकार. या व्याख्येनुसार एकपात्री कलाकारांची संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात किमान ५०० तरी कलाकार ठिकठिकाणी जाहीर कार्यक्रम करीत असतात.

मराठी नाटक आणि एकपात्री प्रयोग या दोघांत मूलभूत फरक आहे. एकपात्रीत एकच कलाकार रंगमंचावर असतो. तो अभिनय, आवाज, हालचाली यातून आपली कला पेश करतो. पु. ल. देशपांडे यांची ‘बटाट्याची चाळ’ किंवा ‘असा मी असामी’ किंवा सुमन धर्माधिकारी यांची ‘घार हिंडते आकाशी’, वि. र. गोडे यांचे ‘अंतरीच्या नाना कळा’ तसेच सदानंद जोशी यांचे ‘मी अत्रे बोलतोय...’ याची दर्जेदार परंपरा लाभली आहे. प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे ‘वर्‍हाड निघालंय लंडनला’, राम नगरकर यांचे ‘रामनगरी’, लालन सारंग यांचे ‘मी आणि माझ्या भूमिका’, शिरीष कणेकर यांची ‘माझी फिल्लमबाजी’, ‘फटकेबाजी’, ‘कणेकरी’, सुषमा देशपांडे यांची ‘व्हय मी सावित्रीबाई’, वसंत पोतदार यांचे ‘योद्धा सन्यासी’ यांनीही एकपात्रीच्या दालनात वैभव निर्माण केले.

दिलीप प्रभावळकर या अष्टपैलू अभिनेत्यानेही ‘माझ्या भूमिका’, ‘मुखवटे आणि चेहरे’ या एकपात्रीतून ही कला शिखरापर्यंत पोहोचविली. रोहिणी हट्टंगडी, सुलभा देशपांडे, कै. भक्ती बर्वे, सदानंद चांदेकर, व्यंगचित्रकार विकास सबनीस, श्रीकांत मोघे, विसूभाऊ बापट, अंजली कीर्तने, प्रा. प्रवीण दवणे, सुधीर गाडगीळ, विश्‍वास मेहेंदळे, बंडा जोशी, संजय मोने, सुरेश परांजपे असे मराठी एकपात्री कलाकार आज आहेत.

ज्योतिष, भविष्य यावर भाष्य करणारे शरद उपाध्ये यांचे राशीचक्र, डॉ. रविराज अहिरराव यांचे ‘वास्तुविराज’, विवेक मेहेत्रे याचे ‘राशीवर्ष’ यांनीही हाऊसफुल्ल प्रयोगांचे विक्रम रंगभूमीवर केले आहेत. एकूणच एकपात्री प्रयोगांचे अनेक विषय, आशय आहेत. त्यात संवाद, गप्पागोष्टी, किस्से, मार्गदर्शन, नाट्य हे आहे.

दिलीप खन्ना यांच्या ‘हास्यदरबार’नेही रंगभूमीवर विक्रमी प्रयोग केलेत. दोन घटका मस्त करमणूक ते करतात. व्यंगचित्रकार संजय मिस्त्री हे व्यंगचित्रांच्या आधारे रसिकांना हसवितात.. संतोष चोरडिया ‘कॉमेडी चॅनल’ रंगवतात. त्यात ते धापा टाकत पळणार्‍या माणसाची नक्कल करतात. प्रकाश पारखी हे कोंबडी, घोडागाडी, शेतावरल्या मोटेचा आवाज, पक्ष्यांचे आवाज पेश करतात.

२००६साली नाट्यसंमेलनात प्रथमच एकपात्री कलाकारांची दखल घेतली गेली. संमेलनाध्यक्ष मोहन जोशींनी 'एकपात्री महोत्सव' आयोजित करून एकपात्रीला व्यासपीठ मिळवून दिले. त्याच वर्षी दिलीप खन्ना यांनी 'एकपात्री कलाकार संघ' स्थापन केला. महाराष्ट्र राज्यभर विखुरलेल्या कलाकारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी संघटनेबरोबरच 'एकपात्री कलाकार' नावाची वेबसाईटही सुरू केली होती. कणकवलीच्या नाट्यसंमेलनात तिचे उद्‌घाटन करण्यात आले. पुण्यात 'एकपात्री कलाकार परिषद' नावाची संस्था सुरू झाली होती. त्यात २००७सालापर्यंत ३५ कलाकार सभासद झाले होते.

वर्षातून एकदा, बहुधा २१ एप्रिलला, अनेक एकपात्री कलाकार एकत्र येऊन ’आम्ही एकपात्री’ संघटनेचा वर्धापन दिन साजरा करतात. बंडा जोशी या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

एकपात्री कार्यक्रम थिएटरमध्येच नव्हे तर लग्न, मुंज, वाढदिवस, पार्ट्यांच्या ठिकाणी एकपात्री कार्यक्रम हमखास ठेवले जातात. यासाठी विनोदी कार्यक्रमांना अधिक मागणी असते. उदाहरणार्थ, 'हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' हा विनोदी एकपात्री कार्यक्रम इ.स. १९६१ पासून सादर होत आहे. पूर्वी कै. मधुकर टिल्लू करीत असलेला हा कार्यक्रम आता त्यांचे चिरंजीव मकरंद टिल्लू करतात.[१][मृत दुवा]

डॉ. मधुसूदन घाणेकर व ऋचा घाणेकर थत्ते हे ’द्विदल’ नावाचा पिता आणि कन्यका यांचा एकपात्री प्रयोगांचा सप्ताह साजरा करतात. ’मधुरंग’ ही संस्था या प्रयोगांवी निर्मिती करते. या प्रयोगांची विश्वविक्रमासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌ज आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌जमध्ये नोंद झाली आहे.

मराठीत यांशिवायही अनेक कलावंतांनी एकपात्री नाटक किंवा मनोरंजनाचे एकपात्री गद्य कार्यक्रम रंगमंचावर सादर केले आहेत. त्यांतील काही गाजलेली नाटके किंवा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ---


  • अंतरीच्या नाना कळा - वि.र. गोडे (१५००हून अधिक प्रयोग)
  • अनंत युगाची जननी - कीर्तनकार अंजली कर्‍हाडकर
  • अब्द अब्द - माधुरी पुरंदरे (३२ प्रयोग)
  • असा मी, असामी- पु.ल.देशपांडे (शेकडो प्रयोग)
  • अस्सल माणसं इरसाल नमुने -प्रभाकर निलेगावकर
  • आक्रंदन एका आत्म्याचे (हिंदी, मराठी, इंग्रजी) - वसंत पोतदार (किमान ८० प्रयोग)
  • आत्म्याचा प्रवास आणि मृत्युपश्चात जीवन : वक्त्या - डॉ. मेधा खासगीवाले
  • आनंदओवरी - मूळ लेखक दि.बा. मोकाशी, नाट्यरूपांतर दिग्दर्शक अतुल पेठे (अभिनय किशोर कदम)
  • आनंदीबाई जोशी (अश्विनी जोशी)
  • आर के लक्ष्मण्स् कॉमन मॅन -लेखक अनिल जोगळेकर-मराठी, गौतम जोगळेकर-इंग्रजी) (अभिनय विवेक केळकर)
  • एकदा काय झालं (चंद्रकांत परांजपे)
  • एका गाढवाची कहाणी - रंगनाथ कुळकर्णी (>८०० प्रयोग)
  • कणेकरी - शिरीष कणेकर (>१५०प्रयोग)
  • कथाकथन (व.पु. काळे), (पु.ल.देशपांडे), (शंकर पाटील), (व्यंकटेश माडगूळकर), (द.मा. मिरासदार), सुरेखा कामथे,
  • कथामैत्र - दत्ता आजगावकर
  • कथारंग - उमा चांदे
  • करून गेलो गाव (द्विपात्री) : वैभव मांगले आणि भालचंद्र कदम (लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे)
  • कुटुंब रंगलंय काव्यात - विसूभाऊ बापट (१३००प्रयोग)
  • खळखळाट (स्वरचित हास्यकविता आणि विडंबन कवितांचे सादरीकर्ण. मूळ लेखक बंडा जोशी)
  • खळखळाट (मूळ बंडा जोशी; आताचे सादरकर्ते - अॅड. प्रभाकर आडकर) (>१०० प्रयोग)
  • गप्पागोष्टी - जयंत ओक
  • गप्पाष्टक - डॉ.संजय उपाध्ये
  • गरीब बिच्चारे पुरुष - रंगनाथ कुळकर्णी (>१२००प्रयोग)
  • घार हिंडते आकाशी - सुमन धर्माधिकारी (>५०० प्रयोग)
  • टी.व्ही.रडारड.कॉम - चंद्रकांत परांजपे
  • तुला मी मला मी - लेखक गिरीश कर्नाड (अभिनय रीमा लागू)
  • तेव्हाची ती आत्ताची मी - रीमा लागू
  • थोडे आसू, थोडे हासू - रूपाली अवचरे
  • संगीत धन्य तुकोबा समर्थ - नामदेव तळपे (>५० प्रयोग)
  • दिलखुलास - स्वाती सुरंगळीकर (२५०वा प्रयोग-२५ मे २०१३)
  • धन्य तुकोबा समर्थ - नामदेव तळपे (१००वा प्रयोग-३१ मार्च २०१३)
  • धमाल पाहुणचाराचा - प्रा. विवेक गंगणे
  • नमुनेदार माणसं - मुरलीधर राजूरकर (५०हून अधिक प्रयोग)
  • प्रसंग लहान, विनोद महान - मधुकर टिल्लू (१०००हून अधिक प्रयोग)
  • बटाट्याची चाळ - पु.ल.देशपांडे (शेकडो प्रयोग)
  • बिचारे सौभद्र - मूळ लेखक पु.ल. देशपांडे (अभिनय डॉ. अशोक साठे)
  • मन करा रे प्रसन्न - डॉ. संजय उपाध्ये
  • मला वन मॅन शो करावा लागतो - पुरुषोत्तम बाळ (एकूण किमान ४ प्रयोग झाल्याची नोंद आहे)
  • माझी धमाल अंत्ययात्रा - श्रीपाद भोसले
  • माझ्या लग्नाची चित्तरकथा (चंद्रकांत परांजपे)
  • माता रमाई - ममता वागदे
  • मी अत्रे बोलतोय- सदानंद जोशी (२७५० प्रयोग)
  • मी जिजाऊ बोलतेय (डॉ. स्मिता देशमुख) (१३-११-११पर्यंत ८००हून अधिक प्रयोग) (त्यानंतर, बालकलावंत शिवानी म्हेत्रे)
  • मी जिजाऊ व्याख्यानमाला बोलतेय - ब.हि. चिंचवडे
  • मी जनी नामयाची - अनुराधा पिंगळीकर
  • मी जोतिबा फुले बोलतोय - कुमार आहेर
  • मी मुक्ता साळवे बोलतेय - श्रुती तोरडमल
  • मी बहिणाबाई - कुंदा प्रधान
  • मी सावित्रीबाई बोलतेय - अस्मिता जावळे
  • मी सावित्रीबाई बोलतेय - डॉ. वृषाली रणधीर
  • मुक्ताई - प्रचिती प्रशांत सुरू. (या एकपात्रीचे १९९ प्रयोग झाले आहेत).
  • योद्धा संन्यासी - वसंत पोतदार (२५०० प्रयोग)
  • योद्धा संन्यासी. आत्मविश्वासाचा आवेग (अव्यावसायिक नाटक) (दामोदर रामदासी)
  • रंगत-संगत - अभिजित कुलकर्णी
  • रामनगरी - राम नगरकर (७०० प्रयोग)
  • लपु छपुन जरा जपून (द्विपात्री - दीपाली निरगुडकर व अरुण पटवर्धन)
  • लेकुरे उदंड झाली- विद्या कदम (ऑगस्ट २०१२पर्यंत ९०हून अधिक प्रयोग)
  • वंदे मातरम्‌ (हिंदी, मराठी, बंगाली) - वसंत पोतदार (६०००हून अधिक प्रयोग)
  • वर्‍हाड निघालंय लंडनला - कै. लक्ष्मण देशपांडे (२०००पेक्षा खूप जास्त प्रयोग). अन्य एकपात्री अभिनेते - अश्‍विन खैरनार; संदीप पाठक; स्वरूपा देशमुख
  • विरंगुळा (आम्ही एकपात्री या संस्थेचा कार्यक्रम) - ५ एकपात्री कलावंत शेखर केदारी, अनिल गुंजाळ, संतोष चोरडिया, बण्डा जोशी, चंद्रकांत परांजपे
  • व्यक्ती तितक्या प्रकृती - डॉ. के.व्ही. पाठक
  • व्हंय, मी सावित्रीबाई - सुषमा देशपांडे (२०० प्रयोग)
  • स्वामी विवेकानंद (चरित्र कथाकथन) - शंकर अभ्यंकर
  • संगीत मानापमान - सुहासिनी मुळगांवकर
  • संगीत सौभद्र - सुहासिनी मुळगांवकर (५००हून कितीतरी अधिक प्रयोग)
  • सबकुछ मधुसूदन - डॉ. मधुसूदन घाणेकर (१२०००हून अधिक प्रयोग)
  • सादसंवाद (ऋचा घाणेकर)
  • साहेब-यशवंतराव चव्हाण (रंगनाथ कुलकर्णी)
  • सेर सिवराज (हिंदी) - वसंत पोतदार (७००हून अधिक प्रयोग)
  • स्मृतिचित्रे - मूळ लेखिका लक्ष्मीबाई टिळक (अभिनय सुहास जोशी)
  • स्वभावालाही औषध असते (समुपदेशनावर आधारित मनोरंजक एकपात्री कार्यक्रम - सादरकर्ते : डॉ. सचिन देशमुख)
  • स्वातंत्र्यवीर - मुरलीधर जावडेकर
  • हलकंफुलकं - ऋचा घाणेकर
  • हसण्याच्या गावा जावे - अशोक पुंडलीक नंदीकुरळे
  • हसवणूक भाग १,२ - अजितकुमार कोष्टी
  • हसवण्याचा माझा धंदा/वटवट - पु.ल. देशपांडे (>५० प्रयोग)
  • हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा - (पूर्वी मधुकर टिल्लू, आता मकरंद टिल्लू (१५०० हून अधिक प्रयोग. सन २०१३ एकपात्री सादरीकरणाचे ५२ वे वर्ष)
  • हसू आणि आसू (डॉ. स्मिता कोल्हे)
  • हास्यकथा-आनंदकथा - अशोक मुरूडकर
  • हास्यखळखळाट (बंडा जोशी)
  • हास्यचक्र - राजा नारकर
  • हास्यपंचमी (बण्डा जोशी)
  • हास्यफुलोरा - प्रभाकर साळेगावकर
  • हास्यरंजन - उज्‍ज्वला कुलकर्णी

मराठीत एकपात्री गद्य कार्यक्रम करणारे कलावंत/लेखक, आणि त्यांच्या कार्यक्रमाचे नाव

  • अंजली कर्‍हाडकर (अनंत युगाची जननी)
  • अजितकुमार कोष्टी (हसवणूक भाग १,२)
  • अनिल गुंजाळ
  • अनुराधा पिंगळीकर (मी जनी नामयाची)
  • अभय देवरे-सातारा : (गंमतगप्पा)
  • अभिजित कुलकर्णी यांचे लेखन, दिग्दर्शन व सादरीकरण असलेला (संगत-रंगत)
  • अशोक मुरूडकर (हास्यकथा-आनंदकथा)
  • अशोक पुंडलिक नंदीकुरळे उर्फ एन.अशोक (हसण्याच्या गावा जावे)
  • अशोक बोंडे (बाचाल तर हसाल)
  • डॉ. अशोक साठे (बिचारे सौभद्र - लेखक पु.ल. देशपांडे)
  • आदित्य कदम (बंटी बबली)
  • आश्विन खैरनार (वर्‍हाड निघालंय लंडनला)
  • आश्विनी जोशी (डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोग)
  • उज्‍ज्वला कुलकर्णी (हास्यरंजन)
  • उमा चांदे (कथारंग)
  • ऋचा घाणेकर (सादसंवाद, हलकंफुलकं)
  • किशोर शिरसाट (वरचा मजला)
  • कुंदा प्रधान (मी बहिणाबाई)
  • कुमार आहेर (मी जोतिबा फुले बोलतोय)
  • डॉ. के.व्ही. पाठक (व्यक्ती तितक्या प्रकृती)
  • चंदा नाईक (कथाकथन)
  • चंद्रकांत परांजपे (टी.व्ही.रडारड.कॉम); (माझ्या लग्नाची चित्तरकथा); (एकदा काय झालं)
  • चंद्रसेन टिळेकर (राहूकेतू)
  • चेतना तिबरेकर (खेळ)
  • जयंत ओक (गप्पागोष्टी)
  • ज्योती देशपांडे
  • दत्ता आजगावकर (कथामैत्र)
  • द.मा. मिरासदार (कथाकथन)
  • डॉ. दिलीप अलोणे (जावे प्रेमाच्या गावा, हसा आणि लठ्ठ व्हा)
  • दिलीप खन्ना (हास्यदरबार - फेब्रुवारी २०११पर्यंत २०००पेक्षा जास्त प्रयोग)
  • दिलीप हल्याळ (हास्यवाटिका)
  • दीपक देशपांडे (हास्यकल्लोळ)
  • दीप्ती पन्हाळकर
  • डॉ. धनसिंग चौधरी (कामयाबी की ओर-संमोहनशास्त्रावर आधारित मराठी कार्यक्रम)
  • धनंजय जोशी (गुदगुल्या)
  • नामदेव तळपे - धन्य तुकोबा समर्थ (१००वा प्रयोग-३१ मार्च २०१३)
  • निखिल रत्‍नपारखी (मसाज - एका माणसाची कैफियत, मूळ लेखक विजय तेंडुलकर)
  • अॅड. पद्मा गोखले (प्रतिबिंब)
  • पपा दळवी (पपा गोष्टी)
  • डॉ. पाठक के.व्ही. (व्यक्ती तितक्या प्रकृती)
  • कै. पुरुषोत्तम बाळ ( मला वन मॅन शो करावा लागतो)
  • कै. पु. ल. देशपांडे (असा मी असामी, बटाट्याची चाळ, वटवट, हसवण्याचा माझा धंदा, कथाकथन वगैरे)
  • प्रकाश पारखी (नकलानगरी)
  • प्रचिती प्रशांत सुरू (मुक्ताई - एकपात्री नाटक)
  • प्रभाकर निलेगावकर (अस्सल माणसं इरसाल नमुने)
  • प्रभाकर साळेगावकर (हास्यफुलोरा)
  • डॉ. प्रवीण जोग (हास्यगडगडा)
  • बंडा जोशी (हास्यपंचमी, खळखळाट)
  • वैद्य बालाजी तांबे (
  • मकरंद टिल्लू (हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा)
  • मंजिरी धामणकर (चर्पटमंजिरी) (मराठी-हिंदी) (मंजिरी धामणकर यांचे स्वानुभवांवर आधारलेले ’अनुनाद’ हे पुस्तक आणि ऑडियो सीडी निघाली आहे.)
  • मंदार गायधनी (कोपरखळी)
  • मधुकर काकडे (मंत्र सुखाचा)
  • कै. मधुकर टिल्लू (प्रसंग लहान, विनोद महान-१०००हून अधिक प्रयोग)
  • डॉ. मधुसूदन घाणेकर (सबकुछ मधुसूदन -मनोरंजक गद्य-पद्य-अभिनय कार्यक्रम-सुमारे १२०००प्रयोग); अश्या बायका तश्या बायका, ५००वा प्रयोग १०-३-२०१३ला)
  • मनीष आपटे (गुगुल्या)
  • प्रा. महेंद्र गणपुले ( हास्यनगरी)
  • मुरलीधर राजूरकर (नमुनेदार माणसं)
  • मृण्मयी भजग
  • मृदुला मोघे (हास्यषट्‌कार)
  • डॉ. मेधा खाजगीवाले (आत्म्याचा प्रवास आणि मृत्युपश्चात जीवन)
  • बंडा जोशी (हास्यखळखळाट)
  • रंगनाथ कुळकर्णी (गरीब बिच्चारे पुरुष), (एका गाढवाची कहाणी - >८०० प्रयोग), (साहेब-यशवंतराव चव्हाण)
  • रमेश थोरात (हिंदुस्थानी)
  • डॉ. रविराज अहिरराव (वास्तुशास्त्रविषयक एकपात्री प्रयोग)
  • कै. राम नगरकर (रामनगरी-७०० प्रयोग)
  • राजा नारकर (हास्यचक्र)
  • रीमा लागू (तेव्हाची ती आत्ताची मी )
  • - रूपाली अवचरे (थोडे आसू, थोडे हासू)
  • कै. लक्ष्मण देशपांडे (वर्‍हाड निघालंय लंडनला - >२००० प्रयोग)
  • वंदन नगरकर
  • व.पु. काळे (कथाकथन)
  • विद्या कदम (लेकुरे उदंड झाली - >ऑगस्ट २०१२पर्यंत ९०हून अधिक प्रयोग)
  • विनोद सावंत (घर दोघांचं)
  • विवेक केळकर (आर के लक्ष्मण्स् कॉमन मॅन)
  • विश्वास पटवर्धन (स्वभावराशी)
  • विसूभाऊ बापट (कुटुंब रंगलंय काव्यात - >१३००प्रयोग)
  • शंकर अभ्यंकर - (स्वामी विवेकानंद चरित्र कथाकथन)
  • शरद उपाध्ये (भविष्यावर बोलू काही, राशीचक्र)
  • प्रा. शरच्चंद्र काकडे (पंचवार्षिक पाळणा)
  • शरद जाधव (हास्ययात्रा)
  • शिरीष कणेकर (कणेकरी, फटकेबाजी, माझी फिल्‍लमबाजी)
  • बालकलावंत शिवानी म्हेत्रे (मी जिजाऊ बोलतेय)
  • शेखर केदारी (हास्यधिंगाणा)
  • श्यामल कुलकर्णी (अरे संसार संसार)
  • डॉ. श्रीकांत गोडबोले (ओबामाच्या देशात-भाग १ ते ४)
  • फोटोग्राफर श्रीकांत मलुष्टे (अशा व्यक्ती अशा वल्‍ली)
  • निसर्गोपचारतज्ज्ञ श्रीकांत मुंदडा (मैत्री हृदयाशी, लढा मधुमेहाशी)
  • प्रा. श्रीपाद काळे (हास्यदिंडी)
  • श्रीपाद भोसले (माझी धमाल अंत्ययात्रा)
  • श्रुती तोरडमल - (मी मुक्ता साळवे बोलतेय)
  • डॉ. सचिन देशमुख - (स्वभावालाही औषध असते - समुपदेशनावर आधारित मनोरंजक एकपात्री कार्यक्रम)
  • डॉ. संजय उपाध्ये - (गप्पाष्टक, मन करा रे प्रसन्न)
  • संजय मिस्त्री (हास्यशाही)
  • संतोष चोरडिया - (हसवाहसवी) (आम्ही)
  • सदानंद जोशी (मी अत्रे बोलतोय-२७५० प्रयोग)
  • संदीप खरे व सलील कुलकर्णी (आयुष्यावर बोलू काही)
  • संदीप पाठक (वऱ्हाड निघालंय लंडनला)
  • सायली गोडबोले-जोशी (जिजाऊ-९२हून अधिक प्रयोग), (पंचकन्या)
  • सुधीर कुलकर्णी-लेखक/दिग्दर्शक (बहिणाबाईंची गोष्ट आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या जीवनावरील ' वृत्तिबोध‘)
  • सुनीता देशपांडे (राजमाता जिजाबाई)
  • डॉ. स्मिता कोल्हे (हसू आणि आसू)
  • डॉ. स्मिता देशमुख (मी जिजाऊ बोलतेय -८००हून अधिक प्रयोग)
  • स्वरूपा देशमुख - (वर्‍हाड निघालंय लंडनला)
  • स्वाती सुरंगळीकर (दिलखुलास -२५०वा प्रयोग २५ मे २०१३). (प्रांजली); (संसारी लोणचं - कविता सादरीकरणाचा साभिनय कार्यक्रम)


(अपूर्ण)

पहा : नाटक

संदर्भ

[१][२][मृत दुवा]