बण्डा जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.

बंडा जोशी, प्रचलित लिखाण - बण्डा जोशी, हे मराठीताले एक हास्यकलावंत आहेत. त्यांचे पूर्ण नाव बण्डा ऊर्फ भालचंद्र दत्तात्रय जोशी. मूळ गाव कोल्हापूर.

नोकरी[संपादन]

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर प्रादेशिक बातम्या देणारे एक भालचंद्र जोशी होते, म्हणून जेव्हा बंडा जोशी यांना त्याच केंद्रावर नोकरी लागली तेव्हा त्यांना आपल्या नावातले ’भालचंद्र’ गाळावे लागले. बंडा जोशी पुणे केंद्रावरून सुप्रभात नावाचा कार्यक्रम करीत. तो खूप लोकप्रिय ठरला होता.

एकपात्री नाटक[संपादन]

बंडा जोशी हे जेव्हा एकपात्रीचा प्रयोग करतात तेव्हा त्यात त्यांच्या कविताही ते म्हणून दाखवतात. ’हास्यपंचमी’ आणि हास्यखळखळाट’ ही त्यांच्या एकपात्री प्रयोगांची नावे आहेत.

बंडा जोशी हे ’आम्ही एकपात्री’ या संघटनेचे अध्यक्ष आहेत.

बंडा जोशी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • खळखळाट (हास्यकविता संग्रह)

बण्डा जोशी यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • माधव मनोहर पुरस्कार (२००९)
  • सुखकर्ता पुरस्कार (२०१४)