Jump to content

"भास्कर रामचंद्र भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:
}}
}}
'''भास्कर रामचंद्र भागवत''' (३१ मे, इ.स. १९१०; [[इंदूर]] - २७ ऑक्टोबर, इ.स. २००१) हे [[मराठी बालसाहित्य|बालसाहित्य]] लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, [[भाषांतर]]कार, [[कादंबरीकार]] आणि विनोदी लेखक होते. ते 'भा.रा. भागवत' या नावानेच प्रसिद्ध होते. मराठीतील पहिल्या [[बालकुमार साहित्य संमेलन|बाल-कुमार साहित्य संमेलनाचे]] (१९७६) अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांनी लहान मुलांसाठी - विशेषत: कुमार वयोगटासाठी - अनेक कादंबर्‍या व साहसकथा लिहिल्या. तसेच अनेक कथा, कादंबर्‍या व विज्ञानकथा यांची इंग्रजीतून भाषांतरे आणि रूपांतरे केली. त्यांनी 'ज्यूल व्हर्न' या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथालेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरीत वा रुपांतरित केले. त्यांनी निर्माण केलेले [[फास्टर फेणे]] आणि [[बिपिन बुकलवार]] हे नायक इ.स. १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्धी पावले. मुलांसाठी त्यांनी '[[बालमित्र]]' हे नियतकालिक चालवले; तसेच 'पुस्तकहंडी'सारखे उपक्रमही केले.
'''भास्कर रामचंद्र भागवत''' (३१ मे, इ.स. १९१०; [[इंदूर]] - २७ ऑक्टोबर, इ.स. २००१) हे [[मराठी बालसाहित्य|बालसाहित्य]] लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, [[भाषांतर]]कार, [[कादंबरीकार]] आणि विनोदी लेखक होते. ते 'भा.रा. भागवत' या नावानेच प्रसिद्ध होते. मराठीतील पहिल्या [[बालकुमार साहित्य संमेलन|बाल-कुमार साहित्य संमेलनाचे]] (१९७६) अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांनी लहान मुलांसाठी - विशेषत: कुमार वयोगटासाठी - अनेक कादंबर्‍या व साहसकथा लिहिल्या. तसेच अनेक कथा, कादंबर्‍या व विज्ञानकथा यांची इंग्रजीतून भाषांतरे आणि रूपांतरे केली. त्यांनी 'ज्यूल व्हर्न' या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथालेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरीत वा रुपांतरित केले. त्यांनी निर्माण केलेले [[फास्टर फेणे]] आणि [[बिपिन बुकलवार]] हे नायक इ.स. १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्धी पावले. मुलांसाठी त्यांनी '[[बालमित्र]]' हे नियतकालिक चालवले; तसेच 'पुस्तकहंडी'सारखे उपक्रमही केले.

==भाराभर लिखाण==
भा.रा. भागवतांनी १८५हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांची वर्गवारी अशी :-<br />
४९ कथासंग्रह, १०० कादंबर्‍या, ४ चरित्रे आणि ३२हून अधिक अन्य पुस्तके.


== जीवन ==
== जीवन ==

२३:०९, ११ जून २०१५ ची आवृत्ती

भास्कर रामचंद्र भागवत
जन्म नाव भास्कर रामचंद्र भागवत
जन्म ३१ मे, इ.स. १९१०
इंदूर
मृत्यू २७ ऑक्टोबर, इ.स. २००१
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार बालसाहित्य, वैज्ञानिक कथा, विनोदी लेखन
प्रसिद्ध साहित्यकृती फास्टर फेणे कादंबरी मालिका
बिपिन बुकलवार कादंबरी मालिका
वडील रामचंद्र भागवत
पत्नी लीलावती भास्कर भागवत
अपत्ये रवींद्र भागवत, चंदर भागवत

भास्कर रामचंद्र भागवत (३१ मे, इ.स. १९१०; इंदूर - २७ ऑक्टोबर, इ.स. २००१) हे बालसाहित्य लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, भाषांतरकार, कादंबरीकार आणि विनोदी लेखक होते. ते 'भा.रा. भागवत' या नावानेच प्रसिद्ध होते. मराठीतील पहिल्या बाल-कुमार साहित्य संमेलनाचे (१९७६) अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांनी लहान मुलांसाठी - विशेषत: कुमार वयोगटासाठी - अनेक कादंबर्‍या व साहसकथा लिहिल्या. तसेच अनेक कथा, कादंबर्‍या व विज्ञानकथा यांची इंग्रजीतून भाषांतरे आणि रूपांतरे केली. त्यांनी 'ज्यूल व्हर्न' या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथालेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरीत वा रुपांतरित केले. त्यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार हे नायक इ.स. १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्धी पावले. मुलांसाठी त्यांनी 'बालमित्र' हे नियतकालिक चालवले; तसेच 'पुस्तकहंडी'सारखे उपक्रमही केले.

भाराभर लिखाण

भा.रा. भागवतांनी १८५हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांची वर्गवारी अशी :-
४९ कथासंग्रह, १०० कादंबर्‍या, ४ चरित्रे आणि ३२हून अधिक अन्य पुस्तके.

जीवन

भा.रा.भागवतांचा जन्म ३१ मे, इ.स. १९१० रोजी इंदुरात निरीश्वरवादी सुधारकी कुटुंबात झाला []. त्यांचे वडील, रामचंद्र भागवत, सरकारी शाळेचे -सुधारकी विचार असलेले- मुख्याध्यापक होते. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रात येणार्‍या, 'सेंट झेवियर्स महाविद्यालया'तून अर्थशास्त्र हा विषय घेऊन बी.ए. ही पदवी घेतली. इंग्रजी साहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय होता. दुर्गाबाई भागवत यांच्याशी त्यांचे दूरचे नाते होते. सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत काही लेखनाचा उपक्रम केला होता; पण तो प्रकाशित झाला नाही.

आरंभिक काळ आणि पत्रकारिता

लहानपणापासून इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाची भागवतांना आवड होती. शालेय जीवनात 'माय मॅगझिन' हे पुस्तक/नियतकालिक आणि गिबन्स, डिकन्स, थॅकरे तसेच ह. ना. आपटे, विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांचे साहित्य ह्यांमुळे प्रभावित होऊन भा.रा. भागवतांनी बालवयातच लेखन सुरू केले. घरातल्या साहित्यप्रेमी पोषक वातावरणामुळे त्यांनी 'वसंत' नावाचे मासिक काढले होते. बालपणी त्यांनी त्यांची आतेबहीण दया परांजपे हिच्या मदतीने 'निळे पाकीट' या रहस्यमय कादंबरीचे लेखन केले. ते छापूनही आले. वयाच्या दहाव्या वर्षी भागवतांची मांजरीवरील कविता 'आनंद' मासिकात छापून आली होती. त्याच सुमारास त्यांनी चित्रावरून लिहिलेली एक गोष्ट 'बालोद्यान' ह्या मासिकात प्रसिद्ध झाली होती.

भागवतांनी इ.स. १९३०च्या दशकापासून पत्रकारितेस आरंभ केला. इ.स. १९३५-३६मध्ये ते दैनिक सकाळचे उपसंपादक होते. इ.स. १९३७-३८ कालखंडात ते प्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते []. ऑल इंडिया रेडियोच्या दिल्ली केंद्रावरील वार्तापत्राचे ते मराठी अनुवादक (इ.स. १९४१-४२) होते. महात्मा गांधींच्या अटकेची बातमी प्रसारित न करण्याचे आदेश असतानाही त्यांनी ती केली आणि नोकरीचा राजीनामा देऊन ते भूमिगत झाले. तेव्हा त्यांचा विवाह लीलावती भागवत यांच्याशी झालेला होता व त्या गरोदर होत्या. पण भा.रा. भागवत भूमिगत झाल्यावर त्यांना लपतछपत मुंबईत परत येणे भाग पडले. याच काळात एस.एम. जोशी यांच्यासोबत भागवत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. विसापूरच्या तुरुंगात त्यांनी त्याबद्दल कारावासही भोगला[]. त्याच काळात त्यांची आई वारली. त्यांच्या थोरल्या मुलाचा - रवींद्र याचा - जन्मही ते तुरुंगात असतानाच झाला. या स्वातंत्र्यचळवळीतल्या सहभागाबद्दल त्यांना पुढे सरकारी निवृत्तिवेतन मिळत असे.

साहित्यिक कारकीर्द

तुरुंगवासाच्या काळातही भागवतांचे लेखन चालू होते. सुरुवातीच्या काळात ते विनोदी कथालेखन करत असत. माझा विक्रम, वैतागवनातील वाफारे हे त्यांचे सुरुवातीच्या काळातले काही विनोदी कथासंग्रह. मराठीतील उत्कृष्ट विनोदी कथासंग्रहात श्री. राम कोलारकरांनी त्यांच्या जवळपास वीस कथा अंतर्भूत केलेल्या आहेत. स्वतंत्र विनोदी कथा, भाषांतरित व रूपांतरित विनोदी कथा, लोकप्रिय रहस्यकथा व प्रेमकथांची विडंबने अशा सर्व प्रकारचे लेखन त्यांत आहे.

बाल-कुमारांसाठीच्या बालमित्र या पाक्षिकाचे भागवत संस्थापक होते []. हा अंक त्यांनी जवळजवळ सात वर्षे काढला. त्यातले बहुतेकसे लेखन भागवत एकटाकी करत. त्यासाठी ते विविध टोपणनावे वापरत असत. हा अंक हौशीपोटी चालवताना त्यांना त्या काळात हजारो रुपयांचे कर्ज झाले होते. [] इ.स. १९७५ सालच्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

भा.रां.च्या साहित्यावर आधारित कलाकृती

रघुवीर कुलकर्णी ऊर्फ 'रघुवीर कूल' यांनी भा. रा. भागवत यांच्या 'बिपिन बुकलवार' या पात्रावर आधारित 'लगी शर्त' [] आणि 'राँग मॉरिशस' [] हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले. 'चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया' या संस्थेने या चित्रपटांसाठी अनुदान दिले आहे. []

भा. रा. भागवतांच्या १०५ व्या जयंतीच्या निमित्ताने ऐसी अक्षरे या मराठी संस्थळाने त्यांच्यावर विशेषांक काढला. त्यात भा. रां.चे अप्रकाशित साहित्य, कुटुंबीयांच्या मुलाखती, पूर्वप्रकाशित लेखन, भा. रां. च्या साहित्याची चिकित्सा करणारे लेख, फॅनफिक्शन, फास्टर फेणेच्या गोष्टींमधून येणार्‍या ठिकाणांचा धांडोळा असे विषय हाताळले आहेत. []

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
आनंदी आनंद गडे राजा प्रकाशन
उमलती कळी राजा प्रकाशन
एक होते सरोवर राजा प्रकाशन
खजिन्याचा शोध पुरंदरे प्रकाशन
जंगलबुकातील दंगल उत्कर्ष प्रकाशन
जुनाट भावलीची भन्नाट कथा उत्कर्ष प्रकाशन
तुटक्या कानाचे रहस्य सुरेश एजन्सी
थँक्यू मिस्टर शार्क उत्कर्ष प्रकाशन
पिझरोचे थैमान
फास्टर फेणे उत्कर्ष प्रकाशन
ब्रह्मदेशातला खजिना मॅजेस्टिक प्रकाशन
भटांच्या वाड्यातील भुतावळ पुरंदरे प्रकाशन
भुताळी जहाज मॅजेस्टिक प्रकाशन
मोठ्या रानातले छोटे घर राजा प्रकाशन
रॉबिन्सन आणि मंडळी पुरंदरे प्रकाशन
रॉबिनहूड आणि त्याचे रंगेल गडी कादंबरी स्वैर अनुवाद श्री. बा. ढवळे १९४८, १९९९
शाबास, शेरलॉक होम्स! उत्कर्ष प्रकाशन
साखरसोंड्या उत्कर्ष प्रकाशन
हाजीबाबाच्या गोष्टी मॅजेस्टिक प्रकाशन

संदर्भ व नोंदी

  1. ^ भा.रा. भागवत. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b c (इंग्लिश भाषेत). p. १३३-३४ http://books.google.com.sg/books?id=QA1V7sICaIwC&pg=PA133&lpg=PA133&dq=Bhaskar+Ramchandra+Bhagwat&source=bl&ots=i_r580SJGf&sig=iqOs_ZTPnPa9CdG0NiUmGkcFpY0&hl=mr&sa=X&ei=mTczUaqYE4P9rAe-iYGQDA&ved=0CCoQ6AEwAQ#v=onepage&q=Bhaskar%20Ramchandra%20Bhagwat&f=true. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ निरंजन घाटे यांचा 'ऐसी अक्षरे' विशेषांकामधला लेख - http://www.aisiakshare.com/node/4160
  4. ^ लगी शर्त : http://cfsindia.org/lagi-sharth-let%E2%80%99s-bet/
  5. ^ राँग मॉरिशस : http://cfsindia.org/wrong-mauritius/
  6. ^ रघुवीर कूल यांची मुलाखत http://www.aisiakshare.com/node/4134
  7. ^ 'ऐसी अक्षरे'चा भा. रा. भागवत विशेषांक http://aisiakshare.com/brbf