Jump to content

आनंदी आनंद गडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनंदी आनंद गडे ही बालकवी तथा त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची कविता आहे.

निवडक उतारा

[संपादन]
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला मोद विहरतो चोहिकडे
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले इकडे, तिकडे, चोहिकडे