"तुरटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Potassium alum octahedral like crystal.jpg|इवलेसे|तुरटी [[स्फटिक]]रूपात]] |
[[चित्र:Potassium alum octahedral like crystal.jpg|इवलेसे|तुरटी [[स्फटिक]]रूपात]] |
||
'''हायड्रेटेड पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट''' (K<sub>2</sub>SO<sub>4</sub>.Al<sub>2</sub><sub></sub>(SO<sub>4</sub>)<sub>3</sub>.24H<sub>2</sub>O)या संयुगाला [[मराठी]]मध्ये '''तुरटी''' असे म्हणतात. तुरटीचे सर्वसामान्य रासायनिक सूत्र X<sub>2</sub>SO<sub>4</sub>. Y<sub>2</sub>(SO<sub>4</sub>)<sub>3</sub>. 24H<sub>2</sub>O असे आहे. बॉक्साइट तसेच ॲल्युनाइटवर प्रक्रिया करून तुरटी मिळवली जाते. तुरटीचे [[स्फटिक]] समकोन अष्टकोनाकृती असतात. गढूळ [[पाणी]] स्वच्छ करण्यास तुरटीचा उपयोग होतो. तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला [[विद्युतभार]] नाहीसा होतो. त्यामुळे आधी वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येतात. [[वस्तुमान]] वाढल्याने ते जड झाले की पाण्यात खाली बसतात. यामुळे पाणी स्वच्छ झालेले दिसते. परंतु हे पाणी निर्जंतुक झालेले नसते. हे [[पाणी]] गाळून घेऊन ते उकळले तरच निर्जंतुक होते. [[भाजी|भाज्या]] आणि [[फळे]] यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो. तुरटी ज्वलनशील नसल्याने [[कापड]], [[लाकूड]], [[कागद]] अशा ज्वलनशील पदार्थांचा ज्वलनाला विरोध वाढवण्यासाठी तुरटीच्या द्रावाचा उपयोग केला जातो. तुरटी तापविल्यास त्यातील स्फटिकजल [[बाष्प]]रूपात बाहेर पडते. यामुळे तुरटी फुलते. अशा तुरटीला '''लाही''' म्हणतात. |

तुरटी ही जंतुनाशक आहे. त्यामुळे दाढी केलेल्या चेहऱ्यावरून तुरटीचा खडा फिरविल्यास, वस्तऱ्याच्या किंवा ब्लेडच्या वापराने गालावर ओरखडा पडला असेल वा जखम झाली असेल तर अशा गोष्टीमुळे होऊ शकणारा संभाव्य जंतुसंसर्ग टाळता येतो. |
|||
==इतिहास== |
==इतिहास== |
२२:०४, १७ जानेवारी २०१४ ची आवृत्ती
हायड्रेटेड पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट (K2SO4.Al2(SO4)3.24H2O)या संयुगाला मराठीमध्ये तुरटी असे म्हणतात. तुरटीचे सर्वसामान्य रासायनिक सूत्र X2SO4. Y2(SO4)3. 24H2O असे आहे. बॉक्साइट तसेच ॲल्युनाइटवर प्रक्रिया करून तुरटी मिळवली जाते. तुरटीचे स्फटिक समकोन अष्टकोनाकृती असतात. गढूळ पाणी स्वच्छ करण्यास तुरटीचा उपयोग होतो. तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला विद्युतभार नाहीसा होतो. त्यामुळे आधी वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येतात. वस्तुमान वाढल्याने ते जड झाले की पाण्यात खाली बसतात. यामुळे पाणी स्वच्छ झालेले दिसते. परंतु हे पाणी निर्जंतुक झालेले नसते. हे पाणी गाळून घेऊन ते उकळले तरच निर्जंतुक होते. भाज्या आणि फळे यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो. तुरटी ज्वलनशील नसल्याने कापड, लाकूड, कागद अशा ज्वलनशील पदार्थांचा ज्वलनाला विरोध वाढवण्यासाठी तुरटीच्या द्रावाचा उपयोग केला जातो. तुरटी तापविल्यास त्यातील स्फटिकजल बाष्परूपात बाहेर पडते. यामुळे तुरटी फुलते. अशा तुरटीला लाही म्हणतात.
तुरटी ही जंतुनाशक आहे. त्यामुळे दाढी केलेल्या चेहऱ्यावरून तुरटीचा खडा फिरविल्यास, वस्तऱ्याच्या किंवा ब्लेडच्या वापराने गालावर ओरखडा पडला असेल वा जखम झाली असेल तर अशा गोष्टीमुळे होऊ शकणारा संभाव्य जंतुसंसर्ग टाळता येतो.
इतिहास
तुरटी ही मानवाला किमान चार हजार वर्षांपासून माहिती आहे असे पुरावे इजिप्त येथे आढळले आहेत. तसेच भारतीय गणितज्ञ वराहमिहिर यांच्या लेखनात रंगबंधक म्हणून तुरटीचा उल्लेख केलेला आहे. प्राचीन कालापासून भारतातील सौराष्ट्र प्रदेशात तुरटी तयार केली जात आली आहे.