"गावकामगार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
(काही फरक नाही)
|
१४:४२, ३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
बलुतेदार आणि अलुतेदार यांना खरे गावकामगार. काहीजण तलाठ्याला गाव कामगार समजतात. ही बलुतेदारांच्या आणि अलुतेदारांच्या यादींमध्ये एकवाक्यता नाही.
एका यादीप्रमाणे
तर दुसऱ्या यादीप्रमाणे
बलुतेदार आहेत. या दुसऱ्या यादीत, पहिल्या यादीतले कोळी आणि चौगुला नाहीत, आणि त्यांऐवजी मांग आणि मुलाणी आहेत.
तिसऱ्या एका यादीप्रमाणे सोनार हा बलुतेदार नसून अलुतेदार आहे.
अलुतेदारांच्या यादीत असेच गोंधळ आहेत. एका यादी प्रमाणे
- कलावंत, कोरव, गोंधळी, गोसावी, घडसी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, भाट, भोई, माळी, मुलाणा, वाजंत्री, शिंपी, सनगर, साळी
हे अठरा अलुतेदार, तर दुसऱ्या यादीप्रमाणे
- कळावंत, घडशी, चौगुला, जंगम, ठाकर, डौरी, तराळ, तांबोळी, माळी, साळी, सोनार, चौगुला
हे फक्त बारा अलुतेदार आहेत. बाराच्या बारा अलुते कोठल्याहि खेड्यांतून क्वचितच सांपडतात. कोठें कोठें वाजंत्री, गारपगारी वगैरे नवीन अलुतेदार आढळतात.डौरी, डवरी, डवऱ्या आणि गोंधळी बहुधा एकच असावेत. गोसावी आणि डवऱ्या गोसावी यांच्यातील नक्की फरक काय आहे ते कुठे स्पष्ट केलेले सापडले नाही.
ग्रॅन्ट डफच्यामतें कोळी, जंगम, तराळ, वेसकर, शिंपी, सोनार, यांचा हक्क महारापेक्षां निराळा होता. तर अनेक पुस्तकांत महार म्हणजेच वेसकर असे दिले आहे. गोंधळी, घडशी, डवऱ्या गोसावी, तांबोळी, तेली, भिल्ल, माळी, रामोशी यांना नारूकारूच्या उलट अशी संज्ञा आहे, असे ग्रॅन्ट डफ लिहितो. इतर ठिकाणी बलुतेदार म्हणजेच कारू आणि अलुतेदार म्हणजेच नारू असेही लिहिलेले सापडते. सोनारालाच पोतदार असे म्हटले जाई.