Jump to content

गावकामगार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बलुतेदार आणि अलुतेदार हे खरे गावकामगार. काहीजण तलाठ्याला गाव कामगार समजतात. बलुतेदारांच्या आणि अलुतेदारांच्या यादींमध्ये एकवाक्यता नाही. एका यादीप्रमाणे

तर दुसऱ्या यादीप्रमाणे

हे बारा बलुतेदार आहेत. या दुसऱ्या यादीत, पहिल्या यादीतले कोळी आणि चौगुला नाहीत, आणि त्यांऐवजी महार आणि मुलाणी आहेत.
तिसऱ्या एका यादीप्रमाणे सोनार हा बलुतेदार नसून अलुतेदार आहे.

अलुतेदारांच्या यादीत असेच गोंधळ आहेत. एका यादीप्रमाणे

  • कलावंत, कोरव, गोंधळी, गोसावी, घडशी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, भाट, भोई, माळी, मुलाणा, वाजंत्री, शिंपी, सनगर, साळी

हे अठरा अलुतेदार, तर दुसऱ्या यादीप्रमाणे

  • कलावंत, घडशी, चौगुला, जंगम, ठाकर, डौरी, तराळ, तांबोळी, माळी, साळी, सोनार, चौगुला

हे फक्त बारा अलुतेदार आहेत. बाराच्या बारा अलुते कोठल्याही एका खेड्यात क्वचितच सांपडतात. कोठे कोठे वाजंत्री, गारपगारी वगैरे नवीन अलुतेदार आढळतात.

डौरी, डवरी, डवऱ्या आणि गोंधळी बहुधा एकच असावेत. मात्र, गोसावी आणि डवऱ्या गोसावी वेगळे आहेत. डवरी समाजामध्ये एक ’नाथपंथी डवरी’ समाज आहे. बहुरूप्याचे काम करणारे बहुधा ’डवरी’ असतात. डौरी नावाचे वाद्य वाजविणारेसुद्धा डवरीच असतात.

ग्रॅन्ट डफच्या मते कोळी, जंगम, तराळ, वेसकर, शिंपी, सोनार, यांचा हक्क महारांपेक्षा निराळा होता. सोनारलाच पोतदार असे म्हणले जाई. काही ठिकाणी ‘तराळ म्हणजे पाटलाजवळ सतत हजर असणारा, सरकारी अधिकाऱ्यांची सरबराई करणारा, त्यांचे सामान वाहणारा महार’ असे म्हणले आहे. अशा महारालाच वेसकर म्हणतात, असेही काही जणांनी लिहिले आहे. गोंधळी, घडशी, डवऱ्या गोसावी, तांबोळी, तेली, भिल्ल, माळी, रामोशी यांना नारूकारूच्या उलट अशी संज्ञा (म्हणजे काय?) आहे, असे ग्रँट डफ लिहितो. इतर ठिकाणी बलुतेदार म्हणजेच कारू आणि अलुतेदार म्हणजेच नारू असेही लिहिलेले सापडते.