"वामन गोपाळ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: विशेषणे टाळा |
|||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
== वारसा == |
== वारसा == |
||
वामनराव जोशी यांच्या नावाने अमरावतीत [[वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर]] नावाचे [[नाटक|नाट्यगृह]] आहे. त्यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. (या व्यायाम मंडळाच्या संकेतस्थळावर, ’मुस्लिम लिबरेशन आर्मी’ने हल्ला केला आहे, अशी माहिती ’पाक सोल्जर डॉट कॉम’ या ठिकाणी दिली आहे.) वीर वामनराव जोशींमुळेच [[महात्मा गांधी]], [[राजगुरू]], [[सुभाषचंद्र बोस]] यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती{{संदर्भ हवा}}. |
वामनराव जोशी यांच्या नावाने अमरावतीत [[वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर]] नावाचे [[नाटक|नाट्यगृह]] आहे. त्यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. (या व्यायाम मंडळाच्या संकेतस्थळावर, ’मुस्लिम लिबरेशन आर्मी’ने हल्ला केला आहे, अशी माहिती ’पाक सोल्जर डॉट कॉम’ या ठिकाणी दिली आहे.) वीर वामनराव जोशींमुळेच [[महात्मा गांधी]], [[राजगुरू]], [[सुभाषचंद्र बोस]] यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती{{संदर्भ हवा}}. १९८९साली ६२वे मराठी साहित्य संमेलन या जागतिक कीर्तिप्राप्त अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात भरले होते. अध्यक्ष सुप्रसिद्धद कथालेखक प्राचार्य के. ज. पुरोहित (शांताराम) होते.स्वागताध्यक्ष केरळचे तत्कालीन रा. सू. गवई होते. |
||
वामनराव जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त ''संस्कार भारती''च्या अमरावती शाखेच्या वतीने रविवार, [[२१ मार्च]], [[इ.स. २०१०]] रोजी अमरावतीत [[बडनेरा ]]मार्गावरील व्यंकटेश लॉनमध्ये मोठा समारंभ झाला होता. |
वामनराव जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त ''संस्कार भारती''च्या अमरावती शाखेच्या वतीने रविवार, [[२१ मार्च]], [[इ.स. २०१०]] रोजी अमरावतीत [[बडनेरा ]]मार्गावरील व्यंकटेश लॉनमध्ये मोठा समारंभ झाला होता. |
२२:५५, ६ जुलै २०१२ ची आवृत्ती
वामन गोपाळ जोशी (इ.स. १८८१ - ३ जून, इ.स. १९५६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, मराठी नाटककार, कवी आणि पत्रकार होते.
जीवन
जोशी मूळचे समशेरपूरचे होते. त्यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंत झाले होते. शिक्षणासाठी नाशिकला गेले असतांना त्यांची गाठ तिथल्या गुप्त क्रांतिकारकांशी पडली, आणि वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. अहमदनगर शहरातील गुजर गल्लीत बाँब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरू केले.
अनंत कान्हेरे, वामनराव जोशी व त्यांच्या सहकार्यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. २३ डिसेंबर, इ.स. १९०९ रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. यात त्यावेळी अकोल्यात असलेले वामनराव जोशी एक होते. त्यांना २५ वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा झाली. मे, इ.स. १९२२ मध्ये त्यांची सुटका झाली. परंतु स्वस्थ न बसता ते इ.स. १९३० च्या जंगल सत्याग्रहात अग्रभागी राहिले. महात्मा गांधींच्या चळवळीतही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्योत्तर काळात हलाखीची आर्थिक स्थिती असताना इ.स. १९५६ साली भारत सरकारने स्वदेशसेवेसाठी त्यांना ४,५०० रुपये इतके मानधन दिले होते. तेही त्यांनी निस्पृहपणे शासनाला परत केले होते.
त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती.
आयुष्याच्या उत्तरार्धात ते अमरावतीला स्थायिक झाले होते.
प्रकाशित साहित्य
नाटके
- ढोटुंग पादशाही
- धर्मसिंहासन
- रणदुंदुभि (पहिला प्रयोग, बलवंत संगीत नाटक मंडळी ने १७-२-१९२७ रोजी केला होता).
- राक्षसी महत्त्वाकांक्षा (पहिला प्रयोग, ललित कलादर्श ने २०-९-१९१३रोजी केला होता).
- शीलसंन्यास
अन्य पुस्तके
- चंद्रपूरची महाकाली
- राष्ट्रपिता महात्मा गांधी
गाजलेली नाट्यगीते
- आपदा राज-पदा भयदा (संगीत रणदुंदुभि)
- जगी हा खास वेड्यांचा पसारा (संगीत रणदुंदुभि)
- दिव्य स्वातंत्र्य रवि (संगीत रणदुंदुभि)
- परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला (संगीत रणदुंदुभि)
- वितरि प्रखर तेजोबल (संगीत रणदुंदुभि)
वारसा
वामनराव जोशी यांच्या नावाने अमरावतीत वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर नावाचे नाट्यगृह आहे. त्यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. (या व्यायाम मंडळाच्या संकेतस्थळावर, ’मुस्लिम लिबरेशन आर्मी’ने हल्ला केला आहे, अशी माहिती ’पाक सोल्जर डॉट कॉम’ या ठिकाणी दिली आहे.) वीर वामनराव जोशींमुळेच महात्मा गांधी, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती[ संदर्भ हवा ]. १९८९साली ६२वे मराठी साहित्य संमेलन या जागतिक कीर्तिप्राप्त अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात भरले होते. अध्यक्ष सुप्रसिद्धद कथालेखक प्राचार्य के. ज. पुरोहित (शांताराम) होते.स्वागताध्यक्ष केरळचे तत्कालीन रा. सू. गवई होते.
वामनराव जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त संस्कार भारतीच्या अमरावती शाखेच्या वतीने रविवार, २१ मार्च, इ.स. २०१० रोजी अमरावतीत बडनेरा मार्गावरील व्यंकटेश लॉनमध्ये मोठा समारंभ झाला होता.
बाह्य दुवे
- http://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Veer_Wamanrao_Joshi. Missing or empty
|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |