Jump to content

विनोद राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विनोद राय

विद्यमान
पदग्रहण
७ जानेवारी, इ.स. २००८
मागील वी.एन. कौल

जन्म २३ मे, इ.स. १९४८
गाझीपूर पारसा, उत्तर प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
गुरुकुल हिंदू कॉलेज, दिल्ली (बी.ए.)
दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स(एम.ए. अर्थशास्त्र)
हारवर्ड विद्यापीठ (एम.ए. सार्वजनिक प्रशासन)
व्यवसाय भारतीय प्रशासकीय सेवा
धर्म हिंदू
संकेतस्थळ http://cag.gov.in

विनोद राय (२३ मे, इ.स. १९४८ - हयात) हे भारताचे ११ वे नियंत्रक आणि महालेखापाल आहेत.[][] २-जी तरंग घोटाळा आणि कोळसा घोटाळा उजेडात आणल्यामुळे ते प्रकाशझोतात आले.[][]

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

गाझीपूर, उत्तर प्रदेश येथे जन्मलेल्या विनोद राय यांनी शालेय शिक्षण विद्या निकेतन, बिर्ला पब्लिक स्कूल येथे पूर्ण केले. नंतर हिंदू कॉलेज, दिल्ली येथे पदवी तर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अर्थशास्त्रातील एम.ए.ची पदवी मिळवली. नंतर सार्वजनिक प्रशासन विषयातील एम.ए. हारवर्ड विद्यापीठातून पूर्ण केले.

कारकीर्द

[संपादन]

राय १९७२ च्या केरळ संवर्गातील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी बनले.[] उपजिल्हाधिकारी पदावर त्रिसूर जिल्ह्यामध्ये त्यांनी कारकीर्द सुरू केली. तेथे नंतर जिल्हाधिकारी म्हणून १९७७ पर्यंत काम केले. नंतर १९७७ ते १९८० या काळात केरळ राज्य सहकारी विपणन संघटनेचे प्रबंध निदेशक होते. [] नंतर ते केरळ राज्यसरकारमध्ये वित्त विभागातील प्रधान सचिव बनले. नंतर भारत सरकार मध्ये वाणिज्य व रक्षा मंत्रालयांत वरिष्ठ पदांवर काम केले. महालेखापाल होण्याआधी त्यांनी वित्तमंत्रालयात वित्तीय सेवा विभागाचे सचिव आणि बँक विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून काम केले होते.

राय यांनी इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीच्या स्थापनेसाठी महत्त्वाचे काम केले ते त्या कंपनीच्या निदेशक मंडळावरही होते. आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, भारतीय जीवन विमा निगम इत्यादी कंपन्यांच्या निदेशक मंडळावरही त्यांनी काम केले आहे.[]

ते सध्या (२०१२ मध्ये) राष्ट्रीय संघाच्या बाह्य लेखापाल मंडळाचे अध्यक्ष तर आंतरराष्ट्रीय सर्वोच्च लेखापरीक्षा संस्थांच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य आहेत.[] २९ फेब्रुवारी, इ.स. २०१२ रोजी त्यांनी अशियाच्या सर्वोच्च लेखापरीक्षा संस्थांच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपदही स्वीकारले.

[]21 डिसेंबर 2017 रोजी सीबीआय विशेष न्यायालयाने 2जी घोटाळा प्रकरणी सर्व आरोपींना पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली. निर्णय देतांना न्यायालयाने म्हटले होते की "आरोपींनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केला अथवा कुठल्याही अनियमितता केल्या या बद्दल न्यायालयासमोर पुरावा सादर करण्यात आला नाही."

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "CAG of India Shri. Vinod Rai" (इंग्लिश भाषेत). 2013-01-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "विनोद राय नवे महालेखापाल". ११ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ "2G घोटाळ्यातील समीकरणे क्लिष्ट". ११ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ "कोळसा खाणींच्या ठेक्यांमुळे सरकारचे १० लाख कोटींचे नुकसान". लोकमत. १४ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
  5. ^ "Vinod Rai is new CAG" (इंग्लिश भाषेत). १२ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]
  6. ^ "Vinod Rai appointed CAG" (इंग्रजी भाषेत). 2007-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
  7. ^ "CAG Vinod Rai elected U.N. external audit panel chief" (इंग्लिश भाषेत). १२ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)