Jump to content

विकिपीडिया चर्चा:सफर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुचालन खिडकीत स्थान विनंती

[संपादन]

इंग्रजी विकिपीडियाने वाचकांच्या सोयीकरिता आपल्या या लेखा प्रमाणे असलेल्या Portal:Contents या पानास डावीकडिल सुचालन खिडकीत स्थान दिले आहे. असेच डावीकडिल सुचालन खिडकीत स्थान मराठी विकिपीडियाने विकिपीडिया:सफर लेखास द्यावे असे मला वाटते. कृपया आपले मत व्यक्त करा. Mahitgar ०७:०९, ३१ मे २००९ (UTC)

ते योग्य होइल.मि समर्थन करतो. V.narsikar १३:५३, ८ सप्टेंबर २००९ (UTC)

आणखी काय हवे

[संपादन]

वाचकांचा वाटाड्या अर्थात विकिपीडियाःसफरच्या मजकुराचे मोठे संपादनाचे काम हाती घेतले होते. ते पूर्णत्वाकडे जाते आहे. मात्र यात आणखी काही माहिती मजकूर समाविष्ट करायला हवा का, हे जुन्यांनी सांगावेच पण नव्या सदस्यांनी आवर्जुन सांगावे. विकिपीडियात वाचकांचा प्रवेश या पानामुळे सोपा होतो,त्यामुळे त्याचे महत्व मोठे आहे. - मनोज १०:२८, १७ जुलै २०११ (UTC)

मनोज,या कामात पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद.पानाचा उद्देश वाचकाभिमूकता आणणे आहे.मराठी विकिपीडियावर अद्यापही वाचकांचा प्रतिसादांचे प्रमाण बरेच कमी आहे,ते कसे वाढवता येईल, काही सर्वे बटन जोडता येईल कुणाला अजून काही पर्याय सुचतात किंवा कसे ? मराठी विकिपीडिया वाचनाभिमुक बनवण्याच्या पुढच्या टप्प्यात दालन:विशेष लेखन परिपूर्ण बनवले जाण्याकडे लक्ष दिले जावयास हवे असे वाटते माहितगार ११:२७, १७ जुलै २०११ (UTC)
बदलावाची भाषा मनोज ह्यांना फारसी रुचत नाही (लाईट घ्यावे )पण जर साईट म्याप अथवा साईट फ्लो डायग्राम द्यावा का ?(one picture is equal to one million words) इंग्रजी विपी वर पानाखाली feed back, ranking वैगरेची सुविधा आहे. चांगले टूल आहे बहुतेक नवीन extension असावे, आपण पण त्यासाठी प्रयत्न करावे का ते ठरवावे. राहुल देशमुख १२:५८, १७ जुलै २०११ (UTC)
हे पान नव्या वाचक-संपादकांसाठी उपयोगी आहे. त्यांना विकिपीडिया जरासा आकर्षक वाटावा यासाठी या पानावर थोडी चित्रमयता असावी, हे मीच सुचवणार होतो. साईट मॅप किंवा साईटफ्लो कितपत उपयोगी ठरेल हे मला सांगता येणार नाही, पण काही चित्रे-छायाचित्रे जरूर यावीत. - मनोज १६:२२, १७ जुलै २०११ (UTC)


वाचन सप्ताह- आपल्या कल्पना पानावर मांडण्याचे आवाहन

[संपादन]

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या १५ ऑक्टोबर या जयंती पासून या वर्षी वाचन पंधरवडा साजरा करण्याचा मानस आहे. आपल्या कल्पना पानावर मांडण्याचे आवाहन आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४६, ४ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]

मला वाटते वाचन सप्ताह पुरेसा होईल.
या आठवड्याच्या शेवटी त्या कालावधीत सर्वाधिक वाचल्या गेलेल्या पानांची सांख्यिकी सांडता येईल.
अभय नातू (चर्चा) ०६:३८, ५ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]
माझ्या मते ह्या निमित्याने विकिपीडियास शोधणे, वाचणे बाबत मोठ्या प्रमाणात विवेचन मुखपृष्टावर करावे (वाचकांचा वाटाड्या, विकिपीडिया सफर ) आदी लेख वृद्धिंगत करावे. त्यातील इतर साम्पादाविशायीची माहिती वगळून वाचणे हाच केंद्रबिंदू असेल असा प्रयत्न असावा (हवे तर मर्यादित दुवे द्यावे ).
उत्तम कार्यक्रम. १५ दिवस खूप लांब होतात, छोटा असावा.
- Jayram (चर्चा) ०७:००, ५ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]


ठिक आहे सप्ताह पर्यंत कमी करतो आणि दिवाळीत पुन्हा दिवाळी-अंकाच्या निमीत्ताने वाचन विषयक अजून काय करता येईल ते सुचवावे.

>>विकिपीडियास शोधणे, वाचणे बाबत मोठ्या प्रमाणात विवेचन मुखपृष्टावर करावे<<

त्या आठवड्याभरासाठी स्वतंत्र साइट नोटीस टाकतोच आहे पण मुखपृष्ठात वाचक सोईसाठी दीर्घ स्वरुपी कोण-कोणत्या सुधारणा करता येतील ?

>>इतर संपादनां विषयीची माहिती वगळून वाचणे हाच केंद्रबिंदू असेल असा प्रयत्न असावा (हवे तर मर्यादित दुवे द्यावे ). <<

हे ठिक आहे

चर्चा सुरवात करण्यासाठी /चर्चा सहभागासाठी आभार

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:२०, ५ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]

मला वाटते की मुखपृष्ठावर मोठे बदल करू नयेत. तेथे दुवे आणि साइटनोटीस टाकाव्यात व मथळ्यावर या बद्दलची सूचनाही टाकावी (लाल रंगातही चालेल!)
याव्यतिरिक्त माहितगारांनी साइडबारमध्ये वाचन सप्ताह हा दुवा टाकलाच आहे. नोटीस किंवा सूचनेत याचाही उल्लेख करता येईल.
अभय नातू (चर्चा) ०८:०४, ५ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]


नमस्कार,
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जन्मदिन (15 ऑक्टोबर) ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करणे हि अतिशय उत्तम कल्पना आहे. विकिपीडिया समाजात संपादन आणि लिखाणाचे अनेक कार्यक्रम आयोजित होत असतात पण वाचनाचा कार्यक्रम हे एक वेगळेपण मराठी विकिपीडियाचे असू शकेल.
  • अभय आणि जयराम यांनी सुचवल्या प्रमाणे साप्ताह भर हा उत्तम कालावधी आहे ज्यात कार्यक्रमाची प्रसिद्धी आणि वाचकांच्या भागीदारी साठी पुरेसा वेळ मिळू शकतो.
  • वाच्याकांच्या प्रतिक्रिया हि पण छान कल्पना आहे पण नेमक्या कोण कोणत्या पानात हा साचा लावायचा , कि त्या साठीचे एक्स्टेन्शन लावावे कि काय ? पण प्रायोगिक तत्वावर वापरास हरकत नाही.
  • अभय म्हणतो तसे मुखपृष्ठावर एक छोट्या विभागात जुजबी माहिती आणि दुवे द्यावेत आणि सप्ताहाच्या शेवटी आकडेवारी जाहीर करावी असे वाटते.
  • ह्या निम्मित्याने वर्ग वृक्ष दाखवण्याचे किंवा त्याचा वापर करून माहिती पर्यंत पोहचण्याचे काही सोपे साचा तंत्र बनवता आले तर पहायला हवे ह्याचा वाचकांना चांगला फयदा होवू शकेल असे वाटते
धन्यवाद

राहुल देशमुख ११:३४, ९ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]

  • माझ्या अंदाजानुसार तांत्रिक अडचणींमुळे एक्सटेंशन इंग्रजी विकिपीडियावरून मध्यंतरी मागे घेतले गेले सध्याची स्थिती माहित नाही तुर्तास तरी त्यास वेळ लागेल असे वाटते.
विशेष:मोठी_पाने, सर्वाधिक बदललेले लेख यातील टॉपच्या दहा-दहा पानांना आणि दहा मुखपृष्ठ सदर आणि उदयोन्मुख सदर लेखांवर सुरवातीस अभिप्राय साचा लावून पहावा असे वाटते. त्या शिवाय साइटनोटीस मधून आलटून पालटून काही संदेशातून अभिप्राय साचा लावू, तांत्रिक दृष्ट्या जमल्यास साइटनोटीसवरील बटन टिचकवले तरीही वाचक ज्या पानावर असेल त्याच्या चर्चा पानावर तो वाचक पोहोचेल असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:१३, ९ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]

अभिप्राय हवा

[संपादन]

काही लेख पानांच्या तळाशी, साचांच्या माध्यमातून खालील प्रमाणे अभिप्राय/सुचना बटन्स उपलब्ध करुन देता येतील जे अभिप्राय देऊ इच्छिणाऱ्यास चर्चा पानावर घेऊन जातील. साधारणत: वाचन प्रेरणा सप्ताह आणि जेव्हा एखाद्या लेख खूप चांगला झाला असे लेखाच्या लेखक/संपादकास वाटते तेव्हा असा सूचना साचा आठवडा भर लेखाच्या तळाशी ठेवता यावा अशी संकल्पना मांडतो आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०८, ५ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]
खालील वाक्यांमध्ये सुधारणा सुचवा
अनु.क्र. साचा बटन मजकुर इनपूट बॉक्स
{{वाचक अभिप्राय हवा १}} * वाचक ? अभिप्राय हवा !! (अभिप्राय नोंदवण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा)

{{वाचक अभिप्राय हवा २}} * वाचक ? अभिप्राय आवर्जून द्या !! (अभिप्राय नोंदवण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा) उदाहरण
{{वाचक अभिप्राय हवा ३}} * लेख वाचलात ? तुमचा अभिप्राय नोंदवा !! (अभिप्राय नोंदवण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा) उदाहरण
{{वाचक अभिप्राय हवा ४}} * लेख वाचलात ? आपला अभिप्राय नोंदवा !! (अभिप्राय नोंदवण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा) उदाहरण
{{वाचक अभिप्राय हवा ५}} *ह्या लेखास वाचकांचा अभिप्राय हवा (अभिप्राय नोंदवण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा) उदाहरण
{{वाचक अभिप्राय हवा ६}} *हा लेख वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत आहे. (अभिप्राय नोंदवण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा) उदाहरण
{{वाचक अभिप्राय हवा ७}} *ह्या लेखाच्या संपादक/लेखकांची वाचकांना अभिप्रायासाठी विनंती आहे (अभिप्राय नोंदवण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा) उदाहरण
{{वाचक अभिप्राय हवा ८}} *हा लेख आपल्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत आहे (अभिप्राय नोंदवण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा) उदाहरण
{{वाचक अभिप्राय हवा ९}} *हा लेख तुमच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत आहे (अभिप्राय नोंदवण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा) उदाहरण
१० {{वाचक अभिप्राय हवा १०}} *हा लेख आवडला आहे ? की नाही ? चला अभिप्राय नोंदवूया ! (अभिप्राय नोंदवण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा) उदाहरण
११ {{वाचक अभिप्राय हवा ११}} *लेखात सुधारणा हवी आहे ? कोणती सुधारणा हवी आहे ? (चर्चा पानावर अभिप्राय नोंदवण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा) उदाहरण
१२ {{वाचक अभिप्राय हवा १२}} *लेखात सुधारणेस संधी आहे ? नेमकी कोणती सुधारणा येईल ? (चर्चा पानावर अभिप्राय नोंदवण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा) उदाहरण

काही वाक्ये

[संपादन]

काही वाक्ये सुचवितो, ती साईट नोटीस वर टाकता येतील का पाहावे.


वाचन हा लेखनाचा पाया आहे/असतो.

वाचतो तो लिहितो

वाचाल तर वाचालाच पण लिहाल तर जास्त वाचले जाल !

वाचतो तोच "वाचतो"

वाचावे परी लेखकरुपी उरावे


श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]])श्रीनिवास हेमाडे २३:०५, १४ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]

सुधारणा सुचवणी

[संपादन]
@Rahuldeshmukh101:


आपण सध्या विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा चित्र:A.P.J.gif खालील प्रमाणे बहुतांश संदेशात लावली आहेत. त्या बद्दल काही सुधारणा सुचवाव्याशा वाटतात त्या खालील प्रमाणे


साइट नोटीस मधील इतर मजकुराच्या खाली gif येते त्यामुळे स्क्रोलींग स्पेस अधिक जातो आहे, त्या शिवाय gif च्या सातत्याने वाचक जरासा विचलीत (distract) होणार नाहीना अशी साशंकता वाटते आहे. खालील प्रमाणे बदल करता आल्यास पहावे
१) सांख्यिकी आणि वर्ष २०१५ नमुद असलेली एक gif आता उपलब्ध आहेच दुसरी अजून gifस् बनवावी ज्यात सांख्यीकी आणि वर्ष नमुद असणार नाही, एक gif सांख्यीकी आणि वर्ष शिवाय असल्यास gifचा एकुण वेळ कमी होईल. आणि दरवर्षी विशेष बदल न करता वापरता येईल. (वर्ष सांख्य्की अद्ययावत वाली gif ज्या वर्षी मिळाली त्यावर्षी काही सम्देशातून सोबतीने वापरता येईलच)
२) या नवीन gif मध्ये एकच सुविचार ठेवण्या एवजी वेगवेगळे सुविचार असावेत (वर हेमाडे सरांनी काही सुविचार सुचविले आहे तेही उपयोगात आणता येऊ शकतील) आणि अशा gif वेगवेगळ्या संदेशातून असाव्यात.
३) gif इतर मजकुरा खालच्या संदेशात न ठेवता स्वतंत्र संदेशातून साधारणत: ३० टक्के पर्यंत संदेशातून वापरल्यास वाचकांना कदाचित अधिक सोपे जाइल असे वाटते.
४) काही संदेश रिकामे आणि काही संदेश दुवा दिलेले केवळ पांढरे रिकामे छायाचित्र यांचे किमान प्रमाणावर ठेवावेत म्हणजे एकतर संदेश अथवा जाहीरात सारखी दिसल्यामुळेही जाहीरातीकडे दुर्लक्ष होते अथवा ज्यांचे खूप लक्ष जाते त्यांना विचलतीत करते म्हणून काही रिकामे संदेश पाने आणि काही संदेश दुवा दिलेले केवळ पांढरे रिकामे छायाचित्र यांचे किमान प्रमाण राहू द्यावे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:२४, १६ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]

कलामांचे छायाचित्र समावेशन

[संपादन]

आत्ताच्या मजकुरात कलाम यांच्या जयंतीनिमित्त म्हंटले आहे, त्यात त्यांचे छायाचित्र समावेशन केल्यास अधिक प्रभावी ठरेल, असे वाटते.

त्यांची वाचत असतानाची चित्रे, त्यांचे ग्रंथालय, त्यांची पुस्तके, शाळा, महाविद्यालय तसेच नालंदा इत्यादी ग्रंथालये, जगातील इतर ग्रंथ-ग्रंथालये, पहिले पुस्तक, पुस्तक शब्दाचा इतिहास, विकिपेडिआ, ब्रिटानिका, विश्वकोश, इत्यादी वाचताना मुले, बालभारतीचे प्रसिद्ध मुखपृष्ठ इत्यादी समाविष्ट करून ते जिवंत करता येईल. पाहावे.

श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १३:३४, १६ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]