विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडियावर सर्वाधिक वाचकसंख्या असलेली पृष्ठे
अनुचित संपादने टाळावी
[संपादन]@Khirid Harshad: नमस्कार, तुमची अयोग्य संपादने या पानावरुन परतवली आहेत. त्या दुव्यावर जेवढे दिसते त्यापलीकडे पण बघावे लागते, मग योग्य आकडेवारी काढता येते. भविष्यात अशी संपादने टाळावी, ही विनंती आणि २०२१ मध्ये महात्मा फुले हा लेख १२व्या स्थानी येतो. --संदेश हिवाळेचर्चा २०:२४, ११ फेब्रुवारी २०२२ (IST)
- @Sandesh9822: मला जी माहिती मिळाली तशी मी जोडली परंतु काही चुकीची माहिती भरल्या गेली असेल तर उलटवावी. तसेच महात्मा फुले २०२१ च्या यादीत जोडले आहे. कृपया जमल्यास २०१५ आणि २०१६ ची यादी देखील जोडावी. मला २०१६ चे सर्वात जास्त पाहिले गेलेली १० पाने सापडली आहेत. Khirid Harshad (चर्चा) २३:३०, ११ फेब्रुवारी २०२२ (IST)
- @Khirid Harshad: सध्या तरी, २०१५ आणि २०१६ ची माहिती सदर लिंक वरुन काढता येत नाही, पण याबद्दल मी विकिमेडिया स्टाफशी बोलतो. कृपया, २०१६ ची सर्वात जास्त पाहिले गेलेली १० पाने येथे सादर करा.--संदेश हिवाळेचर्चा २०:५२, १२ फेब्रुवारी २०२२ (IST)
@Sandesh9822: १) निबंध १,९३,५६४
२) शिवाजी महाराज १,९२,८११
३) भीमराव रामजी आंबेडकर १,८६,६८९
४) ए.पी.जे. अब्दुल कलाम १,६२,७७८
५) वायुप्रदूषण १,५४,९३१
६) महात्मा गांधी १,४४,८०६
७) लोकमान्य टिळक १,२५,२२७
८) जलप्रदूषण १,१९,२७७
९) भारत १,०६,१५४
१०) जोतीराव गोविंदराव फुले ९२,३७२
Khirid Harshad (चर्चा) २०:४३, १४ फेब्रुवारी २०२२ (IST)
- महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कृपया, याचा संदर्भ दुवा सुद्धा सादर करावा. --संदेश हिवाळेचर्चा ११:३७, १६ फेब्रुवारी २०२२ (IST)
- @Khirid Harshad: नमस्कार, या पानावरील तुमची आजची संपादने मी तपासली. त्या संदर्भात - एखाद्या मूळ लेखाच्या वाचकसंख्येत त्याच्या पुनर्निर्देशित पानांची वाचकसंख्या समाविष्ट करू नये, यातून एकाच वाचकसंख्येची दुबार, तिबार किंवा चौबार मोजणी होत असते. विकिपीडियावर पुनर्निर्देशित नाव शोधल्यास वाचकाला मूळ लेखावर नेते जाते. अशावेळी "एकाच" वाचकाची "दोन" वाचकसंख्या होते.
- एखाद्या लेखाचे शीर्षक बदल झाले असल्याचा उल्लेख/टीप सुद्धा हटवू नये. कारण टूलमध्ये एका वर्षातील सर्वाधिक वाचकसंख्या असलेल्या लेखांच्या सूचीमध्ये एकच लेख दोन भिन्न शीर्षकाखाली दोन स्वतंत्र वाचकसंख्या प्रदर्शित होत असतो. अशावेळी दोन्ही वाचकसंख्या एकत्रित करुन त्या लेखाची वर्षभरातील एकूण वाचकसंख्या ठरवणे अभिप्रेत असते. शीर्षक बदलाची टिपणी जोडल्यास वाचकांच्या शंका दूर होतात, अन्यथा टूलमधील विशिष्ट वर्षातील वाचकसंख्या बघताना ती कमी आढळेल.
- नवीन बदल करायचा असल्यास कृपया अगोदर चर्चा पानावर चर्चा करावी. वाचकसंख्या वाढ व वाचकसंख्या घट यासारखी नवीन माहिती लेखात तुम्ही जोडू शकता, मात्र जुनी माहिती हटवू नये, ही विनंती. महिनाभरानंतर नवीन आकडेवारी (2022) उपलब्ध होईल. --संदेश हिवाळेचर्चा १४:०१, १३ डिसेंबर २०२२ (IST)
- @Sandesh9822: मला सांगा मग २०१८ आणि २०१९ च्या यादीत शाहू महाराज लेखासाठी चौथा शाहू आणि छत्रपती शाहू महाराज या दोन पानांची एकत्रित वाचकसंख्या जोडावी का? सध्या ही दोन्ही पाने शाहू महाराज लेखाला पुनर्निर्देशित आहेत. Khirid Harshad (चर्चा) १४:४१, १३ डिसेंबर २०२२ (IST)
- ९ फेब्रुवारी २०२० रोजी लेख चौथा शाहू वरुन शाहू महाराज ला हलविला. छत्रपती शाहू महाराज हा लेख (२०१८ पासून) २३:५२, २७ जून २०१९ पर्यंत शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजी महाराजांचे पुत्र असलेल्या शाहू यांच्याबद्दल होता (सातारा). (विसाव्या शतकातले कोल्हापूरचे चौथा शाहू वेगळे) छत्रपती शाहू महाराज हा लेख २७ जून २०१९ पासून कोल्हापूरच्या चौथ्या शाहुंच्या लेखावर (चौथा शाहू) पुनर्निर्देशित करण्यात आला. हे दोन भिन्न व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या लेखांची वाचकसंख्या एकत्रित केली जाऊ शकत नाही. हे अधिक समजून घेण्यासाठी, सर्वप्रथम २०१८ आणि २०१९ या वर्षांमध्ये कोल्हापूरच्या चौथ्या शाहू महाराजांचा लेख विकिपीडियावर कोणत्या शीर्षकाखाली झळकत होता याची माहिती काढावी लागेल. --संदेश हिवाळेचर्चा १९:१९, १३ डिसेंबर २०२२ (IST)
पुनर्निर्देशित पानांची वाचक संख्या मुख्य पानात जोडली जाऊ नये. जर पुनर्निर्देशित असलेल्या आजचे पान पूर्व लेखाचे मुख्य पान असेल तर त्याची वाचकसंख्या नवीन लेखाच्या वाचकसंख्येत समाविष्ट करता येईल. उदाहरणार्थ. उद्धव बाळासाहेब ठाकरे हा लेख 12 जानेवारी 2019 रोजी बनवला, आणि 5 एप्रिल 2020 रोजी तो उद्धव ठाकरे वर हलवला. अशावेळी उद्धव ठाकरे या आजच्या वर्तमान लेखाची वाचकसंख्या काढायची असल्यास पुर्वीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या लेखाची 12 एप्रिल 2019 ते 5 एप्रिल 2020 पर्यंतची वाचकसंख्या काढावी लागेल, समजा ही संख्या 50 आहे. आणि सध्याच्या उद्धव ठाकरे या लेखाची 5 एप्रिल 2020 ते 13 डिसेंबर 2022 पर्यंतची वाचकसंख्या काढावी, समजा ती 150 आहे. अशावेळी उद्धव ठाकरे या लेखाची 12 एप्रिल 2019 ते 13 डिसेंबर 2022 पर्यंतची एकूण वाचकसंख्या 200 होईल. यामध्ये विशिष्ट कालावधीतील मुख्य लेखांची वाचकसंख्या विचारात घेतली आहे, पुनर्निर्देशित पाने विचारात घेतली नाहीत. --संदेश हिवाळेचर्चा १९:३३, १३ डिसेंबर २०२२ (IST)
- @Sandesh9822: २०१८ व २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनची वाचकसंख्या महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ मध्ये जोडावी का? सध्या महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ लेख महाराष्ट्र शासन लेखास पुनर्निर्देशित आहे. Khirid Harshad (चर्चा) ०७:५३, १८ डिसेंबर २०२२ (IST)
- होय, २०१८ व २०१९ मध्ये महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ हा स्वतंत्र लेख असल्याने त्याची वाचकसंख्या महाराष्ट्र शासन मध्ये जोडता येईल. --संदेश हिवाळेचर्चा ०८:०६, १८ डिसेंबर २०२२ (IST)