विकिपीडिया:उल्लेखनीयता/अनुदिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अनुदिनी किंवा ब्लॉग्स यांच्या मराठी विकिपीडियातील उल्लेखनीयते बद्दलची चर्चा येथे चर्चिली जाईल. आपण लिहिलेल्या अनुदिनी विषयक लेखनाचे उल्लेखनीयते बद्दल किंवा वगळण्याबाबत सुचवले गेले असेल तर प्रथमत: विकिपीडिया नेमका काय आहे आणि काय नाही या बद्दल आधी अधिक माहिती करून घ्यावी.

  • अनुदिनी विषयक मराठी विकिपिडियावरील लेख, विश्वकोशिय उल्लेखनीयता असलेल्या व्यक्तीच्या लेखात त्यांच्या स्वत:च्या अनुदिनीचा दुवा, इतर लेखात अनुदिनीतील संदर्भ ,इतर लेखात अनुदिनींचे बाह्यदुवे, अनुदिनीच्या पद्धतीने विकिपीडिया लेखात लेखन या पाच सर्वस्वी भिन्न बाबी आहेत.
अनुदिनीच्या पद्धतीने विकिपीडियात लेखन करता येत नाही कारण अनुदिनीच्या पद्धतीतल्या प्रमाणे विकिपिडियात ज्ञानकोश आहे, ज्ञानकोशात मूळ किंवा पहिल लेखन करता येत नाही,(विकिपीडिया) ज्ञानकोश प्रामुख्याने आधीच झालेल्या समसमीक्षीत लेखनाचे संदर्भ देत करावयाच्या लेखनाची जागा आहे (अनुदिनींना अस बंधन नसत);विकिपीडियातील लेखकास एखाद्दा विषयाबद्दल जिव्हाळा किंवा आत्मियता असू शकते पण वस्तुनिष्ठ लेखन करताना व्यक्तिगत मते,दृष्टीकोन आणि अनुभव बाजूस ठेऊन तिसऱ्या व्यक्तिंची मते देत तटस्थ मांडणी करावी लागते, स्वत:चे व्यक्तिगत हितसंबध जपणारे लेखन,समर्थन करणारे लेखन ज्ञानकोशीय लेखातून करण अभिप्रेत नसत, विशेषणांनी भरलेला भाषेस अलंकृत फुलोराही चालत नाही .लेखनात वार्तांकनता चालत नाही ,लेखनात व्याकरणातील प्रथमपुरूष,आणि द्वितीय पुरूषी लेखन न करता तृतीय पुरूषी लेखन कराव लागत .एवढ्या सर्व कारणांमुळे अनुदिनीतील लेखन आणि विकिपीडियातील ज्ञानकोशीय लेखन यात मोठा फरक असतो.सरते शेवटी तुम्हाला विकिपीडियातील लेखनावर कॉपीराईट उपलब्ध होत नाही , विकिपीडिया बाहेर केलेल्या अनुदिनी लेखनास सहसा कॉपीराईटचे संरक्षण प्राप्त होते,विकिपीडिया बाहेरील अनुदिनींना जाहीरातींचे उत्पन्न प्राप्त होण्याची सुद्धा संधी असते.
  • विश्वकोशिय उल्लेखनीयता असलेल्या व्यक्तीच्या लेखात त्यांच्या स्वत:च्या अनुदिनीचा दुवा नमुद करणे विश्वकोशीय उल्लेखनीयतेस धरून आहे पण ती अनुदिनी किंवा तो ब्लॉग खरोखरीच त्या व्यक्तिचा स्वत:चा आहे एखाद्दा तोतयाचा नाही याची खातरजमा केली जाणे अभिप्रेत असते.इतर लेखात बाह्यदुवे म्हणून सहसा अनुदिनींचे दुवे स्विकारले जात नाहीत पण जेव्हा ते स्विकारावले जावेत असे वाटत असेल तेव्हा तो या पानावरील उल्लेखनीयता चर्चेचा मुद्दा असतो .
  • इंटरनेटवरील अनुदिनी लेखन हे संदर्भाकरिता प्रमाण साधन म्हणून स्विकारण्यात बऱ्याच मर्यादा असतात, संबधीत अनुदिनी लेखनाचे समसमिक्षण झालेले असणे आणि डाटामिररींग परवानगी देण्या करता उचीत कॉपीराइटची उपलब्धता आणि तसे डाटामिररिंग होत असल्या शिवाय अनुदिनींचा संदर्भाकरता सहसा उपयोग करू नये.संदर्भा करिता अनुदिनीचा उपयोग हा संबधीत लेखाच्या चर्चा पानावर चर्चीला जावा.
  • आंतरजालावरील अनुदिनी या कॉपीराईट नमुद न करताही कॉपीराइटेडच असतात त्यातील मजकुर विकिपीडियात कॉपिराईट , लेखनशैली,संदर्भांचे अभाव इत्यादी मुळे विकिपीडियात जसेच्या तसे स्विकारता येत नाहीत.

* हे पान मुख्यवे अनुदिनींच्या मराठी विकिपीडियातील लेखाच्या स्वरूपात उल्लेखनीयतेच्या संदर्भाने आहे.नामनिर्देशीत लेख[संपादन]

गावठी कट्टा/चर्चा:गावठी कट्टा[संपादन]

वैयक्तिक अनुदिनी नामविश्वाची पाने विकिपीडियावर असावीत हे विश्वकोशीय दृष्टीकोनातून अयोग्य वाटते. (हे सर्वस्वी माझे मत आहे)

-संतोष दहिवळ (चर्चा) २१:२९, २१ मे २०१२ (IST)

अनुदिनी जर मराठी साहित्याच्या दृष्टीने मैलाचा दगड सिद्ध झाली असेल (अर्थात त्यासाठी विश्वसनीय स्रोत/दर्जेदार समीक्षक इत्यादींचा हवाला हवा), तरच त्या विषयावरील लेखाला काही प्रमाणात ज्ञानकोशीय मूल्य मिळू शकेल; अन्यथा दहिवळांचे मत योग्य वाटते. अर्थात हे सामान्य सदस्याच्या नजरेतून माझे प्रामाणिक मत.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २१:३७, २१ मे २०१२ (IST)
मी येथे विश्वकोशीय उल्लेखनीयतेची माप तपासण्याचा प्रयत्न करतो आहे.खालील मुद्दांचा उद्देश गावठी कट्टा या अनुदिनीच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेचे समर्थन नाही.पण विरोधात मांडलेल्या मुद्दांना इतर तात्वीक मुद्दांवरून खोडतो आहे.
अनुदिनीबद्दल लेख मराठी विकिपीडियावर येण्यापुर्वी बाह्यस्रोतात त्यास प्रसिद्धी मिळून त्याचे समसमीक्षण झालेले असावे या बाबीशी सहमत आहे.स्वत:च्या अनुदिनि बद्दल स्वत: लेख लिहू नये या बाबींशी पण सहमत आहे.
परंतु केवळ साहित्य विषयक अनुदिनींना साहित्याचे मोजमाप लावता येईल एखादी अनुदिनी साहित्येतर विषयावर असू शकते बाह्यस्रोतात त्यास प्रसिद्धी मिळून त्याचे समसमीक्षण झालेले व ज्ञानकोशीय मुल्य असू शकते त्यामुळे साहित्येतर अनुदिनींना साहित्याचे मोजमाप लावता येणार नाही. वैयक्तिक अनुदिनीस विश्वकोशीय मुल्य असूच शकणार नाही या मुद्दांशी मी सहमत नाही.
ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेकरिता "मैलाचा दगड"ही अनावश्यकरित्या फार सख्त व्याख्या/क्वालिफीकेशन आहे. आहे मैलाचा दगड असणे हे विश्वकोशीय उल्लेखास आवश्यक नाही. शेक्सपियर ,विस खांडेकर अथवा कुसुमाग्रजांच्या प्रत्येक कलाकृती मैलाचा दगड व्याख्येत बसेल असे नव्हे पण तरिही ती कलाकृती/विषय ज्ञानकोशीय उल्लेखास पात्र ठरू शकते.उदाहरणार्थ बंदुक या अर्थाने गावठी कट्टा या विषयावर पुरेसे संदर्भ सापडल्यास विश्वकोशीय लेखन होऊ शकते. गावठी बंदुक कोणत्याही अर्थाने मैलाचा दगड ठरणार नाही तरिही.
माहितगार (चर्चा) २१:३१, २२ मे २०१२ (IST)