Jump to content

विकिपीडिया:सद्य घटना/ऑक्टोबर २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑक्टोबर २००८
सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु
<< १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ >>


आजचे छायाचित्र                                                                                  दि. ३ डिसेंबर २०२४, मंगळवार


दि. ३१.१०.२००८

[संपादन]

दि. ३०.१०.२००८

[संपादन]

दि. २९.१०.२००८

[संपादन]

दि. २८.१०.२००८

[संपादन]

दि. २७.१०.२००८

[संपादन]

दि. २६.१०.२००८

[संपादन]

दि. २५.१०.२००८

[संपादन]

दि. २४.१०.२००८

[संपादन]
मालेगाव बाँबस्फोटात "अभाविप"चा हात
मालेगावमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या बाँबस्फोटात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) सदस्यांचा हात असल्याचे विशेष तपास पथकाला आढळले आहे. गुजरातमधील मोडासा येथे झालेल्या बाँबस्फोटाशीही अन्य एका हिंदुत्ववादी संघटनेचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री डॉ. शकील अहमद यांनी आज ही माहिती दिली. बाँबस्फोटासारख्या देशविघातक कृत्यात एखाद्या प्रमुख राजकीय पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनेचा सहभाग असल्याची स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच घटना असल्याची माहिती त्यांनी दिली. अभाविप ही संघ परिवारभारतीय जनता पक्षाशी थेट संबंध असलेली संघटना आहे.
सकाळ



पुढील आठवड्यात पेट्रोल स्वस्त?
मनमोहनसिंग सरकार देशवासीयांना या वर्षी पेट्रोल-डिझेल दरकपातीची दिवाळी भेट देणार असल्याचे सूतोवाच पेट्रोलियममंत्री मुरली देवरा केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती निम्म्याने घटल्याने पेट्रोलियम पदार्थांच्या दरांबाबत काहीतरी निर्णय आठवडाभरात होईल, असे त्यांनी गुरुवारी लोकसभेत जाहीर केले. शिवसेना आणि डाव्या पक्षांसह विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. बर्‍याच वादानंतर देवरा यांनी वरील आश्‍वासन दिले. त्यांच्या संदिग्ध उत्तराने समाधान न झाल्याने विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. प्रश्‍नोत्तरांच्या तासात हा मुद्दा चर्चेला आला. पेट्रोलियम पदार्थांचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर निम्म्याने कमी झाल्याने सरकार स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल व डिझेलचे दर कमी करणार काय, असा विरोधकांचा प्रश्‍न होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दरवाढ होताच सरकारने त्वरित दर वाढविले. आता दर कमी झाल्यावर दरकपातीचा निर्णय तातडीने का घेत नाही, असाही त्यांचा सवाल होता.
सकाळ



चांद्रयानाची कक्षा वाढविली; पहिला संदेश प्राप्त
अवकाशात झेपावलेल्या चांद्रयानाची कक्षा गुरुवारी अधिक वाढविण्यात आली असून, यानाकडून पहिला संदेश प्राप्त झाला आहे. चांद्रयानाचे कार्य सुरळीतपणे सुरू असल्याचे भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या प्रवक्‍त्याने सांगितले. भारताच्या पहिल्या चांद्रयानाने कालच अवकाशात झेप घेतली होती. यानाची दूरची कक्षा ३७ हजार ९०० किलोमीटरपर्यंत आणि जवळची कक्षा ३०५ किलोमीटरने वाढविण्यासाठी ४४० न्यूटन लिक्विड इंजिन १८ मिनिटे सुरू ठेवण्यात आले होते. यामुळे प्रत्येक वेळी पृथ्वीला फेरी मारण्यासाठी चांद्रयानाला ११ तास लागणार आहेत. बंगळूरपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या बायलालू येथे डीप स्पेस नेटवर्कने चांद्रयानाचे एस बँड आणि एक्‍स बँडचे संदेश स्वीकारले असून, कमांड्‌सही पाठविल्या आहेत.
सकाळ



लष्करी जवान की हरकामे गडी? - संसदीय समितीची तीव्र नापसंती
लष्करी जवानांवर देशाची सेवा करण्याऐवजी वरिष्ठांचे घरगडी म्हणून राबण्याची वेळ आल्याबद्दल संसदीय समितीने तीव्र आणि तीक्ष्ण शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे. घरादारापासून दूर राहणाऱ्या जवानांच्या आत्महत्यांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत मोठी वाढ झाली आहे. नव्याने भरती झालेल्या जवानांना वरिष्ठ वा त्यांच्या कुटुंबीयांकडून होणारा जाच, हे यामागचे एक ठळक कारण असल्याचे समितीने स्पष्टपणे नमूद केले आहे. एवढेच नव्हे, तर या प्रकारांवर शेमलेस असा कडक शेराही मारला आहे. तिन्ही दलांतील जवान वाढत्या मानसिक ताणतणावांना बळी पडत असल्याचा व त्यामुळे त्यांच्या एकूण कामाच्या तासांतही घट झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी २००६ मध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र पाठविले होते. यापूर्वी याच विषयावर नऊ वेळा अभ्यास गट वा समित्या स्थापन करूनही जवानांना मिळणार्‍या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचे निरीक्षण समितीने मांडले आहे.
सकाळ

दि. २३.१०.२००८

[संपादन]

दि. २२.१०.२००८

[संपादन]

दि. २१.१०.२००८

[संपादन]

दि. २०.१०.२००८

[संपादन]

दि. १९.१०.२००८

[संपादन]

दि. १८.१०.२००८

[संपादन]

दि. १७.१०.२००८

[संपादन]

दि. १६.१०.२००८

[संपादन]

दि. १५.१०.२००८

[संपादन]

दि. १४.१०.२००८

[संपादन]

दि. १३.१०.२००८

[संपादन]

दि. १२.१०.२००८

[संपादन]

दि. ११.१०.२००८

[संपादन]

दि. १०.१०.२००८

[संपादन]

दि. ०९.१०.२००८

[संपादन]

दि. ०८.१०.२००८

[संपादन]

दि. ०७.१०.२००८

[संपादन]

दि. ०७.१०.२००८

[संपादन]

दि. ०६.१०.२००८

[संपादन]

दि. ०५.१०.२००८

[संपादन]

दि. ०४.१०.२००८

[संपादन]

दि. ०३.१०.२००८

[संपादन]
अणुऊर्जा कराराला सिनेटची मंजुरी
भारत-अमेरिका अणुकराराला अमेरिकी सिनेटने गुरुवारी मंजुरी दिली आणि भारत अण्वस्त्रधारी देशांच्या पंगतीत दाखल झाला. ८६ विरुद्ध १३ मतांनी अणुकरारावर शिक्कामोर्तब करताना सिनेटने त्यात सुचविण्यात आलेल्या दोन दुरुस्त्या आवाजी मतदानाने फेटाळून लावल्या. सिनेटच्या मंजुरीमुळे भारताला अण्वस्त्रधारी देशाचा दर्जा मिळाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांनी व्यक्त केली.
सकाळ


सेझबाबत सार्वमताचा अवलंब नाही
रायगडमधील विशेष आर्थिक क्षेत्रातून (सेझ) हेटवणे धरणाच्या लाभ क्षेत्रातील जमिनी वगळण्यासाठी राज्य सरकारने शेतकर्‍यांकडून हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेला सार्वमत किंवा मतदान म्हणणे चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज येथे सांगितले. सेझसाठी सक्तीने जमिनी घ्यायच्या नाहीत असे सरकारचे स्पष्ट धोरण आहे; परंतु हेटवणे क्षेत्राचा अपवाद वगळता, राज्यात इतर कुठेही सेझ जमिनीच्या संदर्भात या पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ


अमोनियम नायट्रेट निष्प्रभ होणार?
दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनविण्यासाठी अमोनियम नायट्रेटचा वारंवार होणारा वापर विचारात घेऊन, या रसायनातील स्फोटक गुणधर्म विक्रीपूर्वी नष्ट करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी अमोनियम नायट्रेट निष्प्रभ करण्याच्या प्रक्रियेचे स्वामित्व हक्क असणार्‍या अमेरिकी कंपनीशी संपर्क साधण्याचे सरकारने ठरविले आहे.
सकाळ


स्टिंग ऑपरेशनसाठी वृत्तवाहिन्यांना मनाई
बातम्या आणि चालू घडामोडींवर आधारित कार्यक्रम दाखविणार्‍या दूरचित्रवाहिन्यांवरील आक्षेपार्ह दृश्‍ये आणि सादरीकरणाबद्दल निर्णय घेण्यासाठी गुरुवारी स्वयंनियामक प्राधिकरणाची स्थापना केली. सार्वजनिक हितासाठी सत्य बाहेर काढायचे असेल, तर स्टिंग ऑपरेशन हा शेवटचा पर्याय असावा, असे नव्या नियमांत स्पष्ट करण्यात आले आहे. न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅंडर्डस (डिस्प्यूट रिड्रेसल) ऑथॉरिटी, असे या नऊ सदस्यीय प्राधिकरणाचे नाव असून, माजी सरन्यायाधीश जे. एस. वर्मा त्याचे अध्यक्ष आहेत. वर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत वृत्तवाहिन्यांसाठी नवी आचारसंहिता जाहीर केली.
सकाळ

दि. ०२.१०.२००८

[संपादन]
जमशेदपूर न्यायालयाचे राजविरुद्ध वॉरंट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध जमशेदपूरच्या प्रथम वर्ग न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बुधवारी बजावले. १७ नोव्हेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी ए. के. तिवारी यांनी राज यांना दिले. अजामीनपात्र वॉरंटची प्रत मुंबई पोलिस आयुक्तांना पाठविण्यात आली असून, त्यांनी ते राज यांच्याविरुद्ध बजवायचे आहे. राज ठाकरे समाजात धार्मिक वैमनस्य पसरवतात, असा आरोप हमीद रजा खान या वकिलाने करीत न्यायालयात अर्ज केला आहे, त्यावर न्यायालयाने वरील आदेश दिला आहे.
सकाळ


चित्रपट-मालिकांचे चित्रीकरण बंद
तांत्रिक कामगारांच्या न्याय्य-हक्कांसाठी झगडणारी "फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज" ही संघटना आणि निर्मात्यांच्या चार संघटना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे मुंबईसह अन्य ठिकाणचे चित्रीकरण आता अनिश्‍चित कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. निर्मात्यांकडून लाईटमन, मेकअपमन, इस्त्रीवाला, ड्रेसवाला; तसेच ज्युनियर कलाकार यांच्याकडून होत असलेल्या कथित शोषणाविरुद्ध फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्प्लॉईज ही संघटना आणि त्या संघटनेअंतर्गत येणार्‍या २२ संघटनांनी आज चित्रीकरण बंद ठेवण्याची हाक दिली होती. त्यामुळे मुंबईसह अन्य काही ठिकाणचे चित्रीकरण बंद ठेवण्यात आले होते. मात्र याबाबतीत निर्मात्यांच्या कोणत्याही संघटनेने चर्चेसाठी आज पुढाकार घेतला नसल्यामुळे आता हा वाद आणखी चिघळला आहे.
सकाळ

दि. ०१.१०.२००८

[संपादन]
त्रिपुरात पाच स्फोट; दोन ठार
दिल्ली, अहमदाबाद, बंगळूरपाठोपाठ अतिरेक्‍यांनी आता ईशान्य भारताकडे मोर्चा वळविला आहे. अतिरेक्‍यांनी एक ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी अगरताळा येथे पाच स्फोट घडवून आणले. त्यात दोघांना प्राण गमवावा लागला असून, ५० हून अधिक जखमी झाले आहेत. सायंकाळी साडेसातच्या सुमारास हे स्फोट झाले. गोविंद वल्लभ पंत मार्केट, महाराज गंज मार्केट, अभयनगर, राधानगर बसस्थानक, अगरताळा मोटारस्थानक येथे हे स्फोट झाले आहेत. राधानगर बसस्थानकाच्या परिसरात पहिला स्फोट झाला. त्यानंतर काही मिनिटांत अन्य ठिकाणी बॉंम्बचे स्फोट झाले. राधानगर बसस्थानक परिसरातील स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने दिली. राधानगर भागात मोटारसायकलवरून आलेल्या दोघांच्या हालचाली संशयास्पद होत्या, असेही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. या स्फोटांमध्ये ५० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी बॉम्बशोधक पथक व न्यायवैद्यक तज्ज्ञ तपासासाठी पोचले आहेत. स्फोटांनंतर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सकाळ


भारत-फ्रान्सचे अणुकरारावर शिक्कामोर्तब
आण्विक तंत्रज्ञानाचा नागरी क्षेत्रात वापर करण्याच्या दृष्टीने भारत आणि फ्रान्सदरम्यान मंगळवारी नागरी अणुसहकार्याच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. फ्रान्सचे अध्यक्ष निकोलास सारकोझी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यात एलिसी पॅलेसमध्ये झालेल्या शिखर परिषदेनंतर या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भारताच्या वतीने अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आणि फ्रान्सतर्फे परराष्ट्रमंत्री बर्नार्ड कोन्चर यांनी करारावर स्वाक्षरी केली. अणुपुरवठादार गटाने (एनएसजी) जगाशी अणुव्यापार करण्यास भारताला सवलत दिल्यानंतर भारताने आण्विक अस्पृश्‍यता संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले होते. आज फ्रान्सशी झालेल्या करारामुळे त्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल भारताने टाकले आहे.
सकाळ


कुख्यात बबलू श्रीवास्तवला जन्मठेप
सीमाशुल्क अधिकार्‍याच्या खुनाबद्दल टाडा न्यायालयाने कुख्यात गुंड बबलू श्रीवास्तव आणि त्याच्या दोन सहकार्‍यांना मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अलाहाबाद येथे १५ वर्षांपूर्वी सीमाशुल्क अधिकारी एल. डी. अरोरा यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. टाडा न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष चंद्र यांनी हा निर्णय दिला. आपल्या १०१ पानी निकालपत्रात अरोरा यांच्या खूनप्रकरणी बबलू व त्याचे सहकारी के. के. सैनी आणि मांगे यांना दोषी ठरविले आणि जन्मठेपेबरोबरच न्यायाधीशांनी या तिघांनाही दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
सकाळ

हे सुद्धा पहा

[संपादन]