मुरली देवडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुरली देवरा या पानावरून पुनर्निर्देशित)
मुरली देवडा

कार्यकाळ
१९८४ – १९९६
मागील रतनसिंह राजदा
पुढील जयवंतीबेन मेहता
मतदारसंघ दक्षिण मुंबई
कार्यकाळ
१९९८ – १९९९
मागील जयवंतीबेन मेहता
पुढील जयवंतीबेन मेहता

राज्यसभा सदस्य
कार्यकाळ
एप्रिल २००८ – २०१४

जन्म १० जानेवारी १९३७ (1937-01-10)
मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू २४ नोव्हेंबर, २०१४ (वय ७७)
मुंबई, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अपत्ये मिलिंद मुरली देवडा
निवास मुंबई

मुरली देवरा (१० जानेवारी, १९३७ - २४ नोव्हेंबर, २०१४) हे एक उद्योजक, समाजसेवक आणि भारतीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे नेते होते.[१]

२००१ मध्ये, देवरा यांनी सर्वोच्च न्यायालयातील एक ऐतिहासिक खटला जिंकला ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घातली गेली. त्या वेळी वैधानिक तरतुदी नसताना, न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी जसे की सभागृह, रुग्णालयाच्या इमारती, आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, न्यायालयीन इमारती, सार्वजनिक कार्यालये आणि रेल्वेसह सार्वजनिक वाहने या ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई केली.[१]

"तंबाखूला सार्वत्रिकरित्या सार्वजनिक आरोग्याच्या प्रमुख धोक्यांपैकी एक मानले जाते आणि देशात दरवर्षी अंदाजे आठ लाख मृत्यूंसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तंबाखू जबाबदार आहे. असेही आढळून आले आहे की तंबाखूशी संबंधित रोगांवर उपचार करणे आणि त्यामुळे उद्भवणारे उत्पादनक्षमतेचे नुकसान दरवर्षी जवळपास रु. १३,५०० कोटी आहे, जे की तंबाखू उद्योगाद्वारे उत्पन्न आणि रोजगाराच्या रूपात जमा होणार्‍या एकूण फायद्यापेक्षा अधिक आहे."

— भारताचे सर्वोच्च न्यायालय, मुरली एस. देवरा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि इतर, २ नोव्हेंबर २००१

राजकीय कारकीर्द[संपादन]

  • १९६८ मध्ये मुंबई महापालिका निवडणूक जिंकून राजकारणात दणक्यात प्रवेश.
  • १९७७ मध्ये देवरा शिवसेनेच्या पाठिंब्यावर मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाले. ते वर्षभर महापौर होते.
  • १९८० मध्ये त्यांनी प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. जनता पार्टीच्या रतनसिंह राजदा यांनी त्यांचा पराभव केला. पण त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देवरा यांनी अपयशावर मात केली. भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांचा त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला.
  • देवरा हे १९८१ ते २००३ असे तब्बल २२ वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. देवरा यांच्यामुळेच दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता.
  • पुढे १९८९ आणि १९९१ अशा दोन्ही लोकसभेच्या निवडणुका देवरा यांनी जिंकल्या.
  • १९९६ आणि १९९९ च्या निवडणुकांमध्ये मात्र देवरा यांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. जयवंतीबेन यांनी देवरांच्या साम्राज्याला हादरे दिले.
  • याच दरम्यान देवरा यांनी त्यांचा मुलगा मिलिंद याला राजकारणात उतरवले. त्यानंतर मिलिंद यांनी २००४ च्या निवडणुकीत देवरांच्या पराभवाचा वचपा काढत पुन्हा एकदा दक्षिण मुंबईवर काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध केले. मुलगा लोकसभेत निवडून गेला असताना मुरली देवरा यांना पक्षाने राज्यसभेत स्थान दिले. (एप्रिल २००८)
  • २००६ मध्ये देवरा यांची मनमोहन सरकारमध्ये मंत्री झाले. ते .... सालपर्यंत पेट्रोलियम मंत्री होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Environment and Health by Adv. Vijay Hiremath on Page 116" (PDF). Archived from the original (PDF) on 23 सप्टेंबर 2015. 1 जून 2014 रोजी पाहिले.