विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/निष्क्रीय प्रचालक
मराठी विकिपीडिया आजकाल बऱ्याच प्रगतिशील बदलांमधून जात आहे. म्हणूनच या प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी एक मजबूत गरज आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण की पाहतोय की विकिपीडियाला बनवून ठेवण्यासाठी मराठी विकिपीडियाला प्रचालकांनी क्वचितच भेटी दिलेल्या आहेत. २८.०२.२०१८ ते २८.०३.२०१८ दरम्यानच्या [१] या आकडेवारीवरून हे स्पष्टपणे दिसून येते की, आपल्या प्रचालकांपैकी ८७.५% प्रचालक या प्रकल्पावर निष्क्रिय आहेत. मराठी विकिपीडियाने ३२२ पृष्ठे हटविण्याची विनंती केली आहे आणि ५००० पेक्षा अधिक चित्रे काढण्याची व ७० पेक्षा अधिक एकत्रीकरण करण्याची आवश्यकता आहे. अनेक महत्त्वपूर्ण पृष्ठे आणि साचे ज्यांना संरक्षणाची आवश्यक आहे. परंतु या सर्व गोष्टी सध्या एका व्यक्तीद्वारे हाताळल्या जात आहेत. म्हणूनच मी ५ ऑक्टोबर २०१४ रोजी मंजूर केलेल्या निष्क्रिय काळाबद्दल ६ वर्षांपर्यंतच्या प्रस्तावांची समिक्षा करण्यास आणि वर्षभरात किमान १० प्रशासकीय क्रियांसह १ वर्ष निष्क्रिय काळाबद्दल प्रस्ताव करत आहेत.--संदेश हिवाळेचर्चा १३:३४, २९ मार्च २०१८ (IST)
चर्चा
मुद्दा खुपच महत्त्वाचा आहे आणि यावर लवकरात लवकर काम व्हावे, आणि माझी अशी विनंती आहे की गेल्या एक महिन्याचेच नव्हे तर् गेल्या काही महिन्यांचे आकडे पहाता, निष्क्रीय प्रशासकांची पदमुक्ती होणे किती गरजेचे आहे हे कळते, आता नव्या फ़ळीने समोर् येण्याचीही गरज आहे तेव्हा कालावधी कमी करणे गरजेचे आहे, WikiSuresh (चर्चा) १३:५२, २९ मार्च २०१८ (IST)
- सद्या मराठी विकिपीडियावर ८ प्रचालक आहेत व त्यातील एक सक्रिय आहे
सदस्य:Abhijitsathe,सदस्य:Kaustubh, सदस्य:Rahuldeshmukh101, सदस्य:Sankalpdravid, सदस्य:V.narsikar ,सदस्य:अभय नातू, सदस्य:कोल्हापुरी, सदस्य:सुभाष राऊत
हा मुद्दा अतिशय गंभीर आहे आणि यावर उपाय असणे आवश्यक आहे. मराठी विकिपीडियावर ४ वर्ष पूर्वी ६ वर्ष कालावधी चालायची परंतु आता असे प्रस्तावाची खूप गरज दिसत आहे. विकिपीडिया स्वयंसेवक चालवतात परंतु विकिपीडियाला मोठ्या बॅकलोडकडे पहावे लागेल आणि ते साफ करण्यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. ६ वर्ष हे खूप मोठे होते व असे कुठल्याही विकिपीडियावर चालत नाही. जर आपण m:Admin activity review/Local inactivity policies पहिले त्यात दुसऱ्या विपीवर ६-१२ महिने निष्क्रिय कालावधी आहे. मराठी विकिपीडियावर सुद्धा असे धोरण असावे व आपणही प्रगती करू अशी अपेक्षा आहे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:५३, २९ मार्च २०१८ (IST)
@अभय नातू:, ही चर्चा प्रचालकीय कामाचे कामाचे मुल्यांकन येथे हलवावी. तसेच वर निर्देशित सर्व प्रचालाकांनी त्यांची भूमिका मांडावी ही विनंती.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:२०, २९ मार्च २०१८ (IST)
- निष्क्रीयता हा मुद्दा गौण मानला तरी सक्रीय प्रचालकांच्या कामचुकारपणा, चालबाजपणा यासाठीही मराठी विकिपीडियावर धोरणाची आवश्यकता आहे. (कुणाही प्रचालकाने हे विधान वैयक्तिक घेऊ नये.) -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:०१, २९ मार्च २०१८ (IST)
इतर भाषांतील धोरणांचा विचार करता एक वर्ष पण खूप मोठा काळ आहे. पण तेवढं जरी केले तरी खूप चांगलं. नवीन प्रचालकांना संधी मिळून त्यामुळे कामाची गती वाढली तर फारच बरं होईल. एकूणच तंत्रज्ञानाच्या बाबतीतला संथपणा कमी होईल आणि नवीन अॅॅप्लिकेशन मराठी भाषेत येण्यास मदत होईल. --Pushkar Ekbote (चर्चा) २३:५३, २९ मार्च २०१८ (IST)
- खाली पार्श्वभूमी विभागात निष्पक्ष तथ्ये मांडलेली आहेत. माझी (काही) मते येथे -
- या प्रस्तावात मूल्यांकन महत्वाचे नसून निष्क्रीयतेचा काळ ठरविणे महत्वाचे असल्याने प्रचालकांच्या कामाचे मूल्यांकन पेक्षा वेगळे पान करुन येथे मांडीत आहे.
- येथे फक्त निष्क्रीयतेच्या कालावधीबद्दल चर्चा करावी. धन्यवाद.
- बॅकलॉग साफ करण्यास इतर उपायांचा (फॅब्रिकेटर, सांगकामे, इ.) विचार करता करता येईल. अर्थात त्याचा नवीन प्रचालक असण्यावर किंवा असलेले निष्क्रीय प्रचालक पदमुक्त करण्यावर प्रभाव नाही.
- अमुक इतक्या प्रशासकीय क्रिया करणे असा निकष लावणे योग्य नाही असे वाटते. जर वर्षातून एकदा संपादन करणे पुरेसे असल्याचा प्रस्ताव आहे. त्या दिवशी काम करताना प्रचालकास कदाचित कोणतीही प्रशासकीय क्रिया करावी लागणार नाही हे शक्य आहे. असे असता हे दोन निकष विरोधाभासी वाटतात.
- महत्वाचे साचे आणि पृष्ठांची यादी कोठे आहे? हे लगेच सुरक्षित करणे सोपे आहे.
- अभय नातू (चर्चा) ०७:२७, ३० मार्च २०१८ (IST)
मला माहिती आहे की, हा प्रस्ताव मराठी विकिपीडिया समुदायाच्या एकमताद्वारे स्वीकारला गेला. म्हणून मी माझ्या प्रस्तावामध्ये तारखेचा उल्लेख केला आहे. आपले प्रशासकीय कामकाजाचे मुद्दे खरे आहे म्हणून मी ते मुद्दे मागे घेत आहे आणि फक्त ६ वर्षांवरून १ वर्षाचा कालावधी निश्चित करण्यासंबंधीचा प्रस्ताव ठेवत आहे.--संदेश हिवाळेचर्चा ०९:२१, ३ एप्रिल २०१८ (IST)
आशा चर्चा निकाली निघण्याचा वेगच मराठी विकिपीडियावर खूप मंद आहे. या चर्चांना प्रचालकांकडून कोणतीही कालमर्यादा घालून दिली जात नाही. ही चर्चाच साधारण दोन-तीन वर्षे चालेल असे दिसते. त्यामुळे खरच या चर्चेच्या बाबतीत कोणी गंभीर असेल तर निर्णय प्रक्रिया जलद करा आणि निर्णय घ्या.--Pushkar Ekbote (चर्चा) २३:१७, २५ एप्रिल २०१८ (IST)
- @Pushkar Ekbote:
- चर्चेत उलटसुलट मुद्दे मांडले गेल्यावर कौलाला मुदत दिली जाते.
- पूर्वी जेव्हा प्रचालकांनी कौल मांडल्यामांडल्या मुदत दिली तेव्हा प्रचालक चर्चा न होऊ देता कौल प्रक्रियेत घाई करीत आहेत असे ताशेरे ओढले गेले होते. आता चर्चा होईपर्यंत थांबले तर त्याउलट मत!
- प्रस्ताव मांडल्यापासून १४ दिवस चर्चा चालू राहून त्यानंतर ७ दिवसांची मुदत द्यावी. चर्चेदरम्यान प्रस्ताव मांडणाऱ्याने अधिक मुदत मागितल्यास प्रत्येकी ७ दिवसांची एक अशी मुदतवाढ देण्यात यावी. १४ दिवसांनी चर्चेत पूर्वी न मांडले गेलेले मूलभूत मुद्दे समोर आले असले तर प्रचालक अधिक चर्चेसाठी ७ दिवसांची एक मुदतवाढ देऊ शकतील.
- असे धोरण मी मांडीत आहे. याने बव्हंश कौल २१ दिवसांत मार्गी लागतील आणि जेथे गरज आहे तेथे दीर्घ चर्चाही होईल. हा कौल वेगळ्या विभागात घेतला जाईल. तेथे तुमचे मत आणि कौल द्या.
- अभय नातू (चर्चा) ०१:३५, २८ एप्रिल २०१८ (IST)
- ता.क. @Pushkar Ekbote:, हे पहा आणि इतरांनाही सांगा - ::विकिपीडिया:कौल#कौल_प्रक्रिया_मुदत
प्रचालक हे नेहमी सक्रीय संपादक असावेत यावर कोणाचेच दुमत होणार नाही. तथापि प्रचालक म्हणून भूमिका व जबाबदारी नियमितपणे पार पाडणे विकी समुदायाच्या दृष्टीने जास्त महत्वाचे आहे असे वाटते. या बाबतीत जर एखादी व्यक्ती ६ महिने कोणतीही सूचना किंवा कारणे न देता निष्क्रिय असेल तर प्रचालकपद आपोआप रद्द होईल असा नियम असावा. एखाद्या प्रचालकाने निष्क्रिय राहण्यासाठी योग्य कारणे देऊन काही कालावधी मागितला तर चर्चेद्वारे कौल घेवून तशी सूट देण्याची तरतूद असावी. पण हा कालावधी सहा महिन्यापेक्षा जास्त नसावा असे वाटते. सध्या सक्रीय असलेल्या प्रचालकांनी नेमके मुद्दे समोर ठेवून धोरण मांडावे व अंतिम कौल घ्यावा.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:००, २६ एप्रिल २०१८ (IST)
- @सुबोध कुलकर्णी: यांच्या मतांशी पूर्णपणे सहमत. (कृपया, कौल द्या) @Pushkar Ekbote: यांच्या मतांवर प्रचालकांनी विचार करावा.--संदेश हिवाळेचर्चा १९:२५, २६ एप्रिल २०१८ (IST)
- @सुबोध कुलकर्णी:,
- ही मुदत सहा वर्षांवरुन एक वर्षावर आणण्याचा हा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव तुम्हाला मंजूर आहे का? असल्यास तसा कौल द्यावा, नसल्यास तसा.
- जर मंजूर नसेल तर नाही कौल देऊन हा कौल संपल्यावर सहा महिन्यांसाठी नवीन कौल द्यावा.
- चर्चेदरम्यान प्रस्ताव बदलण्याचा प्रस्ताव घातल्याने चर्चेला नवीन (नको ते) फाटे फुटतील व चर्चा भरकटत जाईल.
- अभय नातू (चर्चा) ०१:३५, २८ एप्रिल २०१८ (IST)
या कौलासाठी ५ दिवसांची मुदत देत आहे. ५ मे, २०१८ला २३:५९:५९ पर्यंतचे कौल ग्राह्य धरण्यात येतील. @अभय नातू: कृपया याची नोंद घ्यावी --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:४०, ३० एप्रिल २०१८ (IST)
पार्श्वभूमी
- इतर विकिपीडियांच्या मानाने आणि मराठी विकिपीडियाचा वाढता पसारा पाहता सक्रीय प्रचालक कमी आहेत.
- सहा वर्षांचा कालावधी रीतसर कौल घेउन ठरविलेला होता (प्रचालकांनी मिळून ठरविलेला नाही.)
- नवीन प्रचालक आणण्यासाठी आधीचे प्रचालक पदमुक्त होण्याचे गरजेचे नाही. मराठी विकिसमाज प्रत्येक नवीन उमेदवाराला त्याच्या कामावरुन ज्ञानावरुन आणि इतर सदस्यांशी काम करण्याच्या आविर्भावाकडे पाहून कौल देतो.
कौल
- पूर्ण समर्थन --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:५३, २९ मार्च २०१८ (IST)
- पूर्ण समर्थन --संदेश हिवाळेचर्चा १७:५६, २९ मार्च २०१८ (IST)
- पूर्ण समर्थन --sureshkhole
- पूर्ण समर्थन -- प्रसाद साळवे (चर्चा) २३:२४, २९ मार्च २०१८ (IST)
- पूर्ण समर्थन --Pushkar Ekbote (चर्चा) २३:४२, २९ मार्च २०१८ (IST)
- पूर्ण समर्थन --सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:४७, २८ एप्रिल २०१८ (IST)
- पूर्ण समर्थन ----सुबोध पाठक (चर्चा) ०८:३९, २९ एप्रिल २०१८ (IST)
- पूर्ण समर्थन ------आर्या जोशी (चर्चा) १५:२२, ३० एप्रिल २०१८ (IST)
निकाल
या धोरणास ८ सक्रिय सदस्यांचे पूर्ण समर्थन भेटले आहेत. @अभय नातू: अंतिम निर्णय द्या --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०८:४९, ७ मे २०१८ (IST)
- या प्रस्तावावर २९ मार्च ते ५ मे, २०१८ दरम्यान ८-० अशी मते मिळून हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
- अभय नातू (चर्चा) २३:०३, ७ मे २०१८ (IST)