विकिपीडिया चर्चा:चावडी/ध्येय आणि धोरणे/निष्क्रीय प्रचालक
Appearance
@V.narsikar, अभय नातू, आणि Tiven2240:, सदर धोरणावर सखोल चर्चा झाली. सर्व प्रक्रिया पार पडून अंतिम निर्णयही झाला. निष्क्रिय प्रचालकांचे काहीही प्रतिसादही आले नाहीत. याचा अर्थ त्यांना यावर आक्षेप नाही असा होत नाही का? या धोरणानुसार निष्क्रिय प्रचालकांच्या संदर्भात पुढील कारवाईविषयी कृपया माहिती द्यावी.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:०३, ९ ऑगस्ट २०१८ (IST)
- माझे मते, हा प्रस्ताव येथे (प्रतिपालकांच्या नोटिसबोर्डवर) प्रतिपालकांच्या कार्यवाहीसाठी मांडावा लागेल त्यानुसार ते कार्यवाही करतील.हा प्रस्ताव अभय नातूंनी मांडावा असे वाटते.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:४५, ९ ऑगस्ट २०१८ (IST)
- निष्क्रिय प्रचालकांना चावडीवर साद दिला जातो, त्यांना त्यांचे चर्चापानावर संदेश टाकला जातो व ई-मेल द्वारे सूचित केले जाते हे काम प्रशासक करतात. हे सर्व झाल्यानंतर ७ दिवस वेळ दिला जातो. त्यानंतर प्रतिपालकांना सूचना दिली जाते. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:५७, ९ ऑगस्ट २०१८ (IST)
- @Tiven2240 आणि V.narsikar:
- टायवीन यांनी लिहिलेली प्रक्रिया सुरू केली जावी.
- अभय नातू (चर्चा) २३:१०, १० ऑगस्ट २०१८ (IST)