विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विकिपीडियाची मासिक पत्रिका[संपादन]

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार ह्यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामाची सर्वाना माहित व्हावी, जेणेकरून आपल्या आवडीच्या कामात सदस्यांना भाग घेऊन योगदान देता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान सर्वांसमोर यावे. संख्याकी, लक्ष, धेय्य आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार नेटवर्क आदी गेष्टींचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन मराठी विकिपीडियाची मासिक पत्रिका सुरु करावी असे वाटते. सदर पत्रिका हि संघटनात्मक बांधणीच्या कामी मराठी विकिपीडियाचे मुखपत्र म्हणून वापरता येईल. पत्रिका इलेक्ट्रोनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चा पानावर पोहचवण्यात येईल.

सादर पत्रिकेसाठी नाव काय ठेवावे ह्यासाठी आणि इतर सूचना/कल्पना/माहिती/प्रतिक्रिया/मते/अपेक्षाचे स्वागत आहे.

धन्यवाद

राहुल देशमुख ०७:००, ४ डिसेंबर २०११ (UTC)

राहुल, (1)मला वाटते विकिपीडिया समाज, व्हिलेज पंप (चावडी), मदतकेंद्र अशा तीन तीन एन्टीटीज विकीपीडियावर आहेतच. त्यांच्या स्वरूपात पूर्ण किंवा अंशतः बदल करून अपेक्षित ते साध्य करता येणे शक्य आहे. (चावडीच्या उर्ध्वभागात आपण स्वतः काही चांगला बदल केला आहे) मग या पत्रिकेचे काय प्रय़ोजन? (2)आणि पत्रिका सुरु करायची तर समाज, चावडी मोडीत काढायची का, हेही स्पष्ट झाले पाहिजे. (3) खरेतर पत्रिका, हाऊसजर्नल हा प्रकार विसाव्या शतकात संघटनांच्या बांधणीसाठी उपयोगी होता. विपीसारख्या प्लॅटफॉर्मवर दिवाळी अंक किंवा पत्रिका अशा पद्धती जुनाट, हास्यास्पद वाटतात. स्पष्ट बोलतो माफ करा.-मनोज २०:२८, ७ डिसेंबर २०११ (UTC)

शीर्षकासाठी उमेदवार सुचवा[संपादन]

सांगकामे, शुद्धलेखन, सदस्य चर्चा पाने[संपादन]

ही चर्चा विकिपीडिया:चावडी/वादनिवारण येथे हलवली आहे.

शहर नावांच्या व्यूत्पत्तींचे संदर्भासहीत अजब फंडे[संपादन]

महारष्ट्रातील स्थलनामे हा लेख बनवताना मी नेर हा प्रत्यय असलेल्या गावांचा शोध इंटरनेटावरून घेतला. केंद्र सरकारच्या एका वेब साईटवर भारतातल्या सर्व गावांची नावे मिळाली महाराष्ट्रातच नेर प्रत्यय असलेली नावाची २५०-३०० गावे आहेत तर बाकी भारतात अगदी काश्मीर ते तामिळनाडू आणि आसाम ते गुजराथ नेर शब्द मागे असेली कित्येक खेडी गावे आढळतात अगदी आपल्या शिवनेरी किल्ला या शब्दाकडे लक्ष द्या त्यात पण नेरी आहे, तर त्याच वेळी बिकानेर या गावाच्या नावाच्या उत्पत्तीबद्दल बिका आणि नेहरा या मित्रांच्या नावावरून नेर शब्द आल्याचा फंडा छान जुन्या नोंदवलेल्या संदर्भा सहीत आहे पण तर्कावर टीकणार नाही.

तसेच अकाहीसे अकोला शब्दाच्या व्यूत्पत्ती विषयी अकोला लेखात अकोलासींह नावाच्या व्यक्ती नामावरुन आकोला हे नाव आल्याचा फंडा आला आहे ते जर खरे असेल तर अहमद नगर जिल्ह्यातही एक अकोला आहे तेथेही कुणी अकोलासिंह नावाचा राजा होऊन गेल्याचा योगा योग स्विकारावा लागेल. प्रत्यक्षात संस्कृत शब्द कोशात कोल शब्दाचे बरेच अर्थ दिसत आहेत. आता विकिपीडियाची अडचण अशी की आपण स्वत:चे तर्क मांडू शकत नाही आणि आधीचे नोंदवलेले मत संदर्भ आहेत म्हणून स्विकारता जाईल पण उपलब्ध सामान्य ज्ञानावर टिकणारे नसेल तर अशा वेळी नेमके काय करावे ? माहितगार १४:१२, ५ डिसेंबर २०११ (UTC)

इंग्रजी विकिपीडियातही आकोला लेखातील इतिहासात वेगळाच फंडा दिला आहे In 1903, Berar was leased to the Nizam of Hyderabad by the British East India Company in return of the debt. जेव्हाकी वस्तुस्थिती पुन्हा तपासण्याची आवश्यकता असावी.अशा परिस्थितीत संदर्भ पडताळण्याचे महत्व लक्षात यावेमाहितगार १४:२८, ५ डिसेंबर २०११ (UTC)

मराठी विकिपीडिया ऑक्टोबर इ.स. २०११ सांख्यिकीचे वैशिष्ट्य[संपादन]

मराठी विकिपीडियाच्या येथील सांख्यिकीनुसार ऑक्टोबर इ.स. २०११ या महिन्यामध्ये ५+ लेखांमध्ये संपादने केलेले ४० सदस्य (सांगकाम्ये वगळून) व १००+ लेखांमध्ये संपादने केलेले १३ सदस्य आढळले. ही सांख्यिकी केवळ मुख्य नामविश्वातल्या (म्हणजेच लेखांच्या) संपादनांविषयी असून, यात बॉट-फ्लॅग नसलेले (म्हणजेच सांगकाम्ये नसलेले) सदस्य गणले गेले आहेत. मराठी विकिपीडियाच्या इतिहासातील सदस्य-सक्रियता दर्शवणारी ही आजवरची विक्रमी आकडेवारी आहे. सक्रियतेतील या वाढीस नुकत्याच मुंबईत झालेल्या "विकिपरिषद भारत इ.स. २०११" या परिषदेचा फार मोठा वाटा असावा (परिषद नोव्हेंबरात झाली असली, तरीही परिषदेपूर्वीच्या माध्यमप्रसिद्धीचा या आकडेवारीशी संबंध असावा, असा कयास बांधता येऊ शकतो). या परिषदेत मराठी विकिपीडिया समुदायाने "मराठी ट्रॅक" नावाचा उपक्रम केला व त्यास कार्यक्रमस्थळी भरघोस प्रतिसाद लाभला.

येथील सर्वभाषक विकिपीडियांच्या सांख्यिकीनुसार अन्य काही निवडक विकिपीडियांशी तुलना केल्यास, खालील आकडेवारी आढळली (* सर्व माहिती ऑक्टोबर, इ.स. २०११मधील सांख्यिकीनुसार; **एकूण सदस्यसंख्येत खाते काढल्या वेळेपासून १०+ संपादने केलेलेच सदस्य अंतर्भूत) :

भाषक विकिपीडिया जागतिक भाषक संख्येनुसार क्रमांक जागतिक भाषक संख्या एकूण सदस्यसंख्या
(खाते काढल्यापासून १०+ संपादने केलेलेच सदस्य अंतर्भूत)
५+ लेखांमध्ये संपादने केलेले सदस्य
(सांगकाम्ये वगळून)
५+ संपादने केलेल्या सदस्यांची एकूण** सदस्यसंख्येतील टक्केवारी १००+ लेखांमध्ये संपादने केलेले सदस्य
(सांगकाम्ये वगळून)
१००+ संपादने केलेल्या सदस्यांची एकूण** सदस्यसंख्येतील टक्केवारी
मराठी १६ ९ कोटी ३३१ ४० १२.०८ % १३ ३.९ %
इंग्लिश १५० कोटी ७,३०,२१४ ३५,०२८ ४.८ % ३४३७ ०.४७ %
चिनी १३० कोटी २६,४२७ १७५६ ६.६ % २५२ ०.९५ %
फ्रेंच ११ २० कोटी ७,३०,२१४ ४,८८३ ६.८ % ७५८ १ %
मल्याळम ३१ ३.७ कोटी ७१७ ८६ १२ % २० २.८ %
बांग्ला १० २३ कोटी ४९७ ४७ ९.५ % १.६ %
तमिळ २० ६.६ कोटी ६५९ ८२ १२.४ % २३ ३.५ %
व्हियेतनामी १७ ८ कोटी ४,११२ २७७ ६.७ % ४१ १ %
तागालोग (फिलिपिनो) १५ ९ कोटी ४२३ ३२ ७.६ % १.४२ %
थाई २४ ७.३ कोटी ३८७३ २९४ ७.६ % ३७ १ %
हिंदी ५५ कोटी ६९४ ५१ ७.३ % ०.९ %
तेलुगू १९ ८ कोटी ४६४ ३२ ६.९ % १.३ %

मल्याळम, तमिळ, बांग्ला इत्यादी चढत्या-वाढत्या आणि दर्जामध्ये तुलनेने उजव्या असलेल्या भारतीय भाषी विकिपीडियांची आकडेवारी न्याहाळल्यास, दरमहिना ५+ संपादने असलेले ७०-८० सदस्य आणि दरमहिना १००+ संपादने असलेले २०-२५ सदस्य घडवल्यास मराठी विकिपीडियादेखील दर्जाच्या दृष्टिकोनातून बळकट बनू शकेल, असे वाटते. ऑक्टोबरातली मराठी विकिपीडीयाची वाटचाल याच गतीने वाढवत नेणे हे आपल्या समुदायापुढील उद्दिष्ट असायला हवे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १९:०६, ६ डिसेंबर २०११ (UTC)

मराठी विकीस्रोत म्हणजे काय ?[संपादन]

मराठी विकीस्रोत काय आहे तिथे काय काम करायचे आहे ? रायबा १५:२१, ७ डिसेंबर २०११ (UTC)

साईट नोटीसवर दिलेल्या दुवा पानांवर आपणास अपेक्षीत माहिती उपलब्ध केली आहे. माहितगार १३:५६, ९ डिसेंबर २०११ (UTC)

विकिस्रोत प्रकल्पाकरिता खालील वाक्यांचा अनुवाद करून हवा आहे[संपादन]

 • Welcome to Wikisource
  • the free library that anyone can improve.
 • Wikisource is an online library of free content publications, collected and maintained by our community.
 • Source texts [मराठी शब्द सुचवा]

माहितगार १३:५६, ९ डिसेंबर २०११ (UTC)

अनुवाद-उमेदवार #१[संपादन]

 • विकिस्रोतावर आपले स्वागत असो.
  • वाङ्मयाची भर घालून कुणालाही समृद्ध करता येईल असे एक खुले ग्रंथालय!
 • विकिस्रोत म्हणजे सामुदायिक प्रयत्नांतून जमवलेल्या व देखभाल केल्या गेलेल्या मुक्तस्रोत प्रकाशनांचे ऑनलाइन ग्रंथालय होय.
 • स्रोत दस्तऐवज

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:३८, ९ डिसेंबर २०११ (UTC)


Spreading the wings of Marathi community[संपादन]

Dear Marathi wikipedians,

Over the past few weeks we have discussed the current state and the future of Indic wiki projects - and quite a few of you have helped me get a richer understanding of Marathi community and projects. And I have provided the summary of discussions and my ideas about taking Indic wiki projects forward here. During our discussion many of you have asked for clear ideas to improve the strength of the community and quality of projects. I have been thinking about what would be most appropriate for Marathi community and I want to share some specific suggestions for Marathi wikipedia. I am recommending these based on ideas from Marathi editors as well as learnings from other communities which have relevance for Marathi.

As of now we have around 40 active wikipedians for Marathi wikipedia and we have close to 35,000 articles. I think the single most powerful way of achieving the huge potential for Marathi wiki projects is to build the community. Increase communication and collaboration between editors is one way of doing this since that will retain existing editors and attract more users to Marathi wiki. Marathi community may consider working on more frequent interaction (online and face-to-face), increasing the spirit of common purpose and bonding amongst editors and last, but not least, attracting newbies.

Below are some points that I request Marathi wiki community to consider.

Outreach


To encourage users to start editing in wiki some of us need to take initiative for some outreach activities. Outreach can be of 3 types - offline, online, and using media.

Offline Outreach: Wiki workshops

Wiki workshop is the best way to attract more users to wikipedia. We should start doing more workshops to attract more users to wiki editing. Again in Delhi, we have the required space and infrastructure so please feel free to use it whenever Marathi wikipedians require it. For other locations if any one is interested to conduct wiki workshops please let us all know and we will work out some way of supporting for this. More important is community members need to come forward.

Online Outreach: Social Networking

Use social networking sites to reach out to people (Facebook, Twitter, and many others.) You can publicise your workshops through these sites or you can invite people to join the community or you can announce major achievements (like the creation of Marathi wikisource, crossing the 35,000 article count, and so on). Already many Indic wiki communities are doing this. We shall think about start using Social Networking sites for Marathi wiki projects also.

Online Outreach: Marathi Blogs

Use Marathi blogs to reach out to the Marathi online community. Marathi blogs are massive and increasing in popularity. It would be very useful to get in touch with popular bloggers and ask them to inform their readers about Marathi Wikipedia and other wiki projects, encourage more people to consider editing and point interested people


Marathi Newspapers & TV Channels

Marathi newspapers and TV channels have mass outreach among Marathi people. Can we establish contacts with journalists and ask for their support in covering Marathi Wikipedia. Journalists alway look for news items that are directly relevant to their audience and something like Marathi Wikipedia crossing 35,000 articles is a perfect story. Any further achievement of Marathi community like when you cross the 100 active editor mark, and the 500 editor mark, when you do an offline release etc. - will all get you good media coverage. This will help in building the community, increasing motivation of existing editors and attract new editors.


Community Building

Wiki meetups

Physical meetings between wikipedians is a really strong way to help the growth of Indic wikipedias. And I am glad that marathi wiki community understood the importance of this and already started doing wiki meetups in Pune. As you know meetups connect us with like-minded people, build friendships, help share ideas and plan initiatives. For small communities, there is always the feeling that we are all alone - and meetups help to correct this perception and this is a source of inspiration. We should have meetups of Marathi wikipedians anywhere and everywhere in the world where there 2-3 of you in the same town. In the NCR area (Delhi/Gurgaon/Noida/Faridabad), please feel free to use the office in Hauz Khas for meetups. I am not sure whether there is any Marathi wikipedian in the NCR area. If there is please let me know so that we can meet up and try to build a Marathi wiki community in Delhi also. For other areas please plan and meetup. Physical meetings between wikipedians is very much required to grow a healthy wiki community in any indic langauge wikipedia. I will help in every possible way to support all the initiatives regarding this.

WikiProjects

As most of you know WikiProjects are informal groups of wiki editors who work work together as a team to improve Wikipedia. These groups often focus on a specific topic area (for example, articles related to Marathi language or a interest area like Marathi movies or regional politics or Marathi literature or global topics like medicine) or a specific kind of task (for example, expanding stub articles). It allows editors to work with other editors - all of whom share a passion for the subject or task. It has worked really well in many languages across India. (For example, Odia wikipeida has a project on "Odia Literature", “Ollywood" and so on. Group of 2 or 3 Odia wiki community members interested in these projects are actively collabrating on these articles to enhance it.). The idea I want to emphasis is, along with working on articles on our interest it will be nice if we could start collabrating with other community members. That will enhance our wiki editing experince and is good for the growth of community. That will help more existing users to continue in wiki for a long time.

Some suggestions for wiki projects are:

 • Start a wiki project to create/expand all articles related to Marathi language
 • Start a wiki project to create/expand articles about districts/villages of Maharashtra and other states of India.
 • Start a wiki project to expand the stubs
 • Start a wiki project to identify and remove potential copyright violated images and move the rest of the free images to commons
 • Start a project on an area which 2-3 editors feel passionate about - whatever the subject might be.

In fact if we could get to know the interest of users we could easily design various small wiki projects as is happening in English wikipedia. The point I want to emphasis is that collaboration between editors will ensure a healthy community so that we can do more programs. The best way of collaboration is doing what we all love best - editing. So let us collaborate on what we love doing most.


Can I request as many Marathi wikipedians to share you thoughts about these ideas. Do you think they are the right ideas for Marathi? If so and if not, why? Would you suggest any alternate ideas? If you like these ideas, which ones would you like to work on? Is there any help you need? Would you be interested in getting connected to other community members who might also be interested? Please share your ideas.

The reason I am asking everyone to participate is it will help us all as a community to identify people who have similar interests and to start interacting and working closely on these interests. The ideal outcome of this post is for the community to start planning some of these activities as a group. There are two ways of doing this. One is, if community members start discussing on this page and form groups interested in particular ideas. Another way, if you don’t know who to contact or would prefer to reach out separately is to email me at shiju@wikimedia.org and I will help connect you with the right people.

I am really excited by the potential of Marathi wiki community. I want you all to know that I am here to help you. Please feel free to reach out for any help you might need. Please also engage with me in this discussion as it will help you connect with other community members. --Shiju १२:१७, २३ डिसेंबर २०११ (UTC)

मराठी विकिस्त्रोत[संपादन]

मराठी विकिस्त्रोतासंबंधी एक विचार विकिस्त्रोताच्या चर्चापानावर इथे मांडला आहे. आपली मते कळवावीत. गणेश धामोडकर (चर्चा) १७:०१, ३१ डिसेंबर २०११ (UTC)

इ.स. २०१२निमित्त शुभेच्छा व येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी[संपादन]

नमस्कार मंडळी!

ग्रेगोरियन दिनदर्शिकेतील इ.स. २०१२ हे नवीन वर्ष सुरू झाल्यानिमित्त सर्व विकिकर सदस्यांना मनापासून शुभेच्छा ! येत्या वर्षभराच्या कालावधीत आपल्या सर्वांकडून भरपूर दर्जेदार संपादने घडोत आणि मराठी विकिपीडिया उत्तरोत्तर समृद्ध होवो.

या दिवसाचे प्रयोजन साधून येत्या मराठी भाषा दिवसाच्या (सोमवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१२) निमिताने मराठी विकिपीडिया समुदायाने गेल्या वर्षीप्रमाणे उपक्रमाचे आयोजन करावे, अशी सूचना मांडत आहे. गेल्या वर्षी मराठी भाषा दिवसाच्या वीकेंडाला विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १ आयोजित करण्यात आली होती व त्यास खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. याही वर्षी हा उपक्रम (व जमल्यास आणखी काही उपक्रम) अंमलात आणावा अशी विनंती आहे.

माझ्या डोक्यात या निमित्ताने आलेले संभाव्य कार्यक्रम व त्यामागची मीमांसा थोडक्यात येथे मांडतो :

कार्यक्रम उद्दिष्ट आवश्यकता/ अवलंबित्व
संपादनेथॉन (ऑनलाइन) मराठी विकिपीडिया समुदायाला सहजपणे करता येईल, अशी संपादनेथॉन (संपादनांची मॅरेथॉन). ही मराठी भाषा दिवसाच्या वीकेंडाला किंवा पूर्ण आठवडाभर अश्या स्वरूपात करता येईल. जगभरात कुठल्याही ठिकाणी इंटरनेट जोडणी असलेल्या सर्व सदस्यांना यात सहभागी होता येईल. -
मराठी विकिपीडिया फोटो स्पर्धा मराठी विकिपीडियावरील लेखांस हव्या असलेल्या/ पूरक ठरू शकणार्‍या चित्रांची गरज भागवण्यासाठी सदस्यांनी स्वतः फोटो काढून ते विकिमीडिया कॉमन्स येथे जमा करणे. आखणी व संयोजनाच्या जबाबदार्‍या सांभाळणे
विकिअकादम्या (महाराष्ट्रात व जमल्यास महाराष्ट्राबाहेरही) मराठी विकिपीडियाविषयी लोकांमध्ये माहिती/जागृती पसरवणे. नवीन सदस्य मिळवणे. नवख्या/मध्यम अनुभवाच्या सदस्यांना संपादनपद्धतींविषयी साहाय्य करणे. आखणी, संयोजन, व्यवस्थापन
Dead link परत मिळवणे(ऑनलाईन) मराठी विकिपीडियावरील ९६,५१८ लेखांपैकी जमेल तेवढ्या लेखातील Dead link (External) शोधून वेबॅक मशिनद्वारे वा इतर मार्गांनी परत मिळवून पुन:स्थापित करणे. जगभरात कुठल्याही ठिकाणी इंटरनेट जोडणी असलेल्या सर्व सदस्यांना यात सहभागी होता येईल. आखणी, संयोजन, व्यवस्थापन
भिमपिडिया (ऑनलाईन) आपण सर्वांनी मिळून भिमपिडिया सुरू करावा. भिमसेना, भिमगिते, भिमसाहित्य, भिमसैनिक, भिमशाहीर, भिमकवी, भिम चळवळ यांच्या बाबत महिति. आखणी, संयोजन, व्यवस्थापन


या संभाव्य कार्यक्रमांपैकी कोणते कार्यक्रम आपल्याला राबवता येतील, कसे राबवता येतील व त्यासाठी कार्यगट उभारून कामांचे व्यवस्थापन कसे करावयाचे याविषयी सदस्यांनी कृपया कल्पना मांडाव्यात. शिवाय वरील कार्यक्रमांव्यतिरिक्त अन्य कल्पना/उपक्रम सुचल्यास, त्यांचीही वरील तक्त्याच्या शेवटी भर घालावी.

धन्यवाद!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५०, १ जानेवारी २०१२ (UTC)

संपादनेथॉन आणि फोटोस्पर्धा या दोन्ही कल्पना राबवण्यायोग्य आहेत. जरूर विचार व्हावा. -मनोज ०५:१६, २ जानेवारी २०१२ (UTC)

संकल्पना उत्तमच आहे. मागच्या वर्षी बरेच यशही आले होते. सध्या मी मराठी विकिस्त्रोतावर काम करत आहे, त्यामुळे माझे संपादनेथॉन तिकडे सुरूच राहील. इकडेही काही करता आले तर बरेच आहे. फोटोस्पर्धेबाबत थोडी जागृती आवश्यक आहे, विशेषतः फोटो कॉमन्सवर चढवणे याचे महत्व नवीन सदस्यांना सांगणे आवश्यक आहे. नागपूर संबंधी कुठल्या लेखात चित्राची अडचण आल्यास कळवावे. विकिस्त्रोतःसमस्त लेखक येथे ज्यांचे लिखाण Public Domain मध्ये आहे अशा लेखकांची एक यादी आहे, यापैकी एखाद्या लेखकाचे एखादे पुस्तक स्कॅन करून कुणाला Commons वर चढवता येत असेल तर अवश्य करावे व तसे कळवावे, म्हणजे प्रायोगिक तत्त्वावर तरी collaboration द्वारा मराठी विकिस्त्रोतावर कसे काम करता येईल ते पाहता येईल. सध्या एक पान दररोज टाईप करू शकणारे कुणी इच्छुक असतील तर सुरुवात करायला बरे! गणेश धामोडकर (चर्चा) १६:२२, २ जानेवारी २०१२ (UTC)

नमस्कार, लेखांतील लाल दुवे कमी करणे असे उद्दिष्टही ठेवता येईल का? जेणेकरुन लेखांसाठी विषयही सहज उपलब्ध असतील व संपादनेथॉन ची कामगिरीही आपसुकच पार पडेल. Vishal1306 ०९:५१, ३ जानेवारी २०१२ (UTC)

आणखी थोडी भर[संपादन]

संतोष, मनोज, विशाल, गणेश : उत्साहवर्धक दुजोर्‍यांबद्दल धन्यवाद. वरच्या विवरणात आणि तुम्ही नोंदवलेल्या काही मुद्द्यांच्या अनुषंगाने अजून काही भर घालतो -

@संतोष : मृत दुव्यांबद्दलचे तुम्ही म्हटलेले काम आपण ठरवू त्या संपादनेथॉन/संबंधित ऑनलाइन उपक्रमात एक कार्यप्रस्ताव म्हणून जरूर घेता येईल. पण पहिल्यांदा आपण आपल्याला यशस्वीपणे राबवता येईल व उद्दिष्टे साधली जातील अश्या ऑनलाइन आणि मुख्य म्हणजे ऑफलाइन उपक्रमांचे स्वरूप निश्चित करणे इष्ट ठरेल. ही रूपरेषा ठरल्यावर आपल्याला कामांचे तपशीलवार प्रस्ताव मांदताना अधिक खोलात शिरावे लागेल.
@गणेश : तुम्ही म्हणता, तसे फोटोस्पर्धेबद्दल मुख्युपक्रमाआधी पूर्वतयारी म्हणून प्रताधिकार वगैरे गोष्टींवर आपल्याला सहाय्य पाने/मार्गदर्शक पाने बनवावी लागतील. पण मी वर म्हटले तसे कार्यक्रमांची रूपरेषा ठरवताना त्या खोलात शिरावे लागेल.

२७ फेब्रुवारीला अजून पावणेदोन महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे आपण साधारणपणे जानेवारी मध्यापर्यंत आपल्या क्षमतेनुसार कोणते उपक्रम राबवता येतील, हे ठरवायला हवे; म्हणजे मग पुढील कार्यवाहीसाठी पुरेसा वेळ हाताशी राहील.

आता मूळ मुद्द्याकडे वळतो : मुळात मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून काही उपक्रम करण्याची प्रयोजने पुढीलप्रमाणे आहेत :

 1. गेल्या काही वर्षांत मराठी भाषकांमध्ये स्वभाषेबद्दल (फार डोळस आणि भक्कम नसला, तरीही दृश्यमान असा) अभिमान जागा होत आहे. आधुनिक काळातल्या जगतिकीकरणाच्या व मुक्त अर्थव्यवस्थेच्या रेट्यापुढे जात-धर्म इत्यादी पारंपरिक अस्मितांपेक्षा भाषेस प्रधान मानून कल्पिलेल्या राष्ट्रीयत्वाची/ उपराष्ट्रीयत्वाची अस्मिता/ आत्माभिमान लोकांमध्ये अधिक मूळ धरताना आढळत आहे. या प्रक्रियेत अनेक समाजशास्त्रीय पैलू अंतर्भूत असल्याने, त्याची सखोल चर्चा हा स्वतंत्र चर्चेचा विषय ठरू शकेल.. मात्र समाजातले आणि प्रसारमाध्यमांतले उत्क्रमण "दिसण्याइतपत" ठळक झाल्याचे जाणवते. या पार्श्वभूमीवर लोकांमधील या जाणिवांचा सकारात्मक उपयोग मराठी विकिपीडियाच्या (व मराठीतील अन्य विकिप्रकल्पांच्या) वाढीसाठी घडवून आणणे, हे या सर्व कल्पनेमागचे प्रधान प्रयोजन आहे.
 2. १ मे, इ.स. २००३ रोजी स्थापना झाल्यापासून सुमारे ८ वर्षांत मराठी विकिपीडिया रांगत रांगत का होईना आता काहीसा पायांवर उभा राहात आहे. परंतु जागतिकीकरणाच्या आणि माहितीकेंद्रित अर्थकारणाच्या पार्श्वभूमीवर प्रगतीचा हा वेग मंद वाटतो. अर्थात ही केवळ मराठी विकिपीडियापुढीलच समस्या आहे, असे नाही; अन्य भारतीय भाषी विकिपीडिया/विकिप्रकल्प व तिसर्‍या जगातील भाषक समाजांपुढची सामायिक समस्या आहे. गेल्या वर्षा-दोन वर्षांमध्ये मल्याळम, तमिळ, बांग्ला वगैरे विकिपीडियांनी मात्र आपापल्या परीने विविध उपक्रम राबवून प्रगतीस चालना दिली आहे (अधिक वाचन: इंग्लिश: [Wikimediaindia-l Summary and perspectives from Discussions with Indic language wikimedians - 2011 - शीजू अ‍ॅलेक्स @ विकिमीडिया इंडिया मेलिंग सूचीवरील उद्बोधक ईमेल]). या सर्वांत सामायिक सूत्र असे की, या विकिपीडियांनी त्यांचा समुदाय वाढेल, महिन्याकाठी किमान दहा-वीस संपादने करणारे नियमित आणि सक्रिय सदस्य मिळतील, या उद्दिष्टास केंद्रस्थानी ठेवले (अधिक वाचन : मराठी विकिपीडिया ऑक्टोबर इ.स. २०११ सांख्यिकीचे वैशिष्ट्य. यावरून मराठी विकिपीडियासही मल्याळम व तमिळ विकिपीडियांप्रमाणे महिन्याकाठी पाचाहून अधिक संपादने करणारे ८०+ सदस्य लाभल्यास लेखांची गुणवत्ता आणि एकंदरीत सर्वांगीण वाढ अधिक वेगाने घडवून आणणे शक्य होईल असे दिसते. सध्याच्या आकडेवारीनुसार मराठी विकिपीडियावर महिन्याकाठी ५+ संपादने करणारे ३५-४० सदस्य असून महिन्याकाठी १००+ संपादने करणारे जेमतेम ७-८ सदस्य आढळतात. त्यात वाढ घडवून आणायची असल्यास, आपल्याला लोकांपर्यंत मराठी विकिपीडिया हा ब्रँड पोचवला पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर्क - म्हणजे महाराष्ट्रातल्या शक्य तितक्या शहरा-गावांमध्ये, तसेच जमल्यास महाराष्ट्राबाहेर देशा-परदेशांतल्या ठिकाणी कार्यशाळा / थेट-संपादनाचे )लाइव्ह एडिटंग) कार्यक्रम/ दरमहा विकिभेटी वगैरे उपक्रम - करावे लागेल.
 3. वर लिहिलेल्या दोन्ही मुद्द्यांचा योग जुळवून आणल्यास २७ फेब्रुवारीच्या मराठी भाषा दिनानिमित्त केलेले उपक्रम मराठी विकिपीडियाचा समुदाय वाढवण्यासाठी विशेष फलदायी ठरतील. त्यासाठीच या दिवसानिमित्त काही कार्यक्रम फील्डवर्क' स्वरूपाचे, तर काही कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपाचे ठरवून अमलात आणणे इष्ट ठरेल. म्हणूनच फोटोस्पर्धा व विकिकार्यशाळा हे फील्डवर्क स्वरूपाचे व संपादनेथॉन हा ऑनलाइन स्वरूपाचा, असे कार्यक्रम राबवण्याचे प्रस्ताव सुचवले आहेत.
 4. फोटोस्पर्धेविषयीअजून काही : फोटोस्पर्धा केवळ आपल्याला हवे असलेल्या फोटोंची गरज भागवायलाच फायदेशीर ठरेल असे नव्हे, तर यासाठी आपापल्या शहरांतून फोटो काढायची टूर काढता-काढता बॅनर/स्टीकर/आर्मबँड वगैरे प्रमोशनल गुडीज वापरून मराठी विकिपीडियाचा ब्रँड लोकांपुढे व्हिजुअली ठसवता येईल. काहीवेळा लोकांपुढे आलेल्या नुसत्या फलकांमुळे/लोगो/दृक्-माध्यमातील जाहिरातींमुळे तुम्हांला काय सांगयचे आहे, ते लोकांना ताबडतोब समजते. त्याचा छान वापर आपापल्या शहरांतून फोटो काढण्यासाठी भटकतेवेळी करता येईल. काही महिन्यांपूर्वी तमिळ विकिपीडियाने आणि मल्याळम विकिपीडियाने महिन्याभराच्या अश्या फोटोथॉन घेतल्या होत्या व त्याची वृत्तपत्र/टीव्ही माध्यमांतून प्रसिद्धीही केली होती. समजा, आपणदेखील अख्खा फेब्रुवारी महिनाभर फोटोथॉन आयोजित केली व पुण्यातून, नागपुरातून, नगर जिल्ह्यातून (जिथे आपले सध्याचे सक्रिय सदस्य आहेत, तिथून तिथून) दर वीकेंडाला/ठराविक दिवशी गटागटाने आर्मबँड लावून/बॅनर घेऊन/टीशर्ट-टोप्या घालून हिंडलो, तर लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकू. यासाठी कदाचित आपल्याला विकिमीडिया इंडिया प्रतिष्ठान-अध्यायाकडून काही प्रमाणात अनुदानदेखील मिळू शकेल. किंबहुना पुण्यात विकिपुणेरी हा बर्‍यापैकी मनुष्यबळ असलेला सक्रिय गट आहेच, त्यांचा या कामी प्रमोशन करायला उपयोग होऊ शकेल. नरसीकर, गणेश धामोडकर, मोहनकर इत्यादी नागपुरात/विदर्भात असलेल्या मंडळींनी नागपुरात अशी फोटोथॉन घडवून मराठी विकिपीडियाविषयी लोकजागृती घडवली, तर आपल्याला कालौघात तेथूनही अनेक सक्रिय सदस्य मिळवता येतील. डॉ. सचिन, संतोष दहिवळ यांच्यसारख्या नगर जिल्ह्यात राहणार्‍या लोकांनी अहमदनगर शहरात आणि राहुल देशमुख, सागर मार्कळ वगैरे मुंबईकर सदस्यांनी मुंबईत फोटोथॉन घडवून आणली, तर महिनाभर आपण जाहिरातबाजी करू शकू.
 5. फेब्रुवारी अखेरीस २७ फेब्रुवारीनजीकच्या वीकेंडाला शनिवार-रविवार अख्खे दोन दिवस जगभरातून विविध कालविभागातल्या लोकांना अहोरात्र सामील होता येईल अशी संपादनेथॉन आपण भरवू शकतो. त्यासाठी विविध कार्यप्रस्ताव आणि त्यांत पुढाकार घेणारे कार्यगट ठरवून आपण संपादने घडवून आणू शकतो. हा वीकेंडभर आपण संपादनांचा धडाका उडवून दिला, तर (सध्याचे ३०-४० सक्रिय सभासद जरी जमेस धरले, तरीही) तो मराठी विकिपीडियावरील अनेक लेख घडवायला, त्यातील माहिती/दर्जा वाढवायला मोठ्ठा रेटा थरू शकतो. शिवाय, याआधी फेब्रुवारी महिनाभर केलेल्या फोटोथॉन उपक्रमातून मराठी विकिपीडियाविषयी जे प्रमोशन घडेल, ते संपादनेथॉनेच्या दिवसांमध्ये आपल्या उपयोगीच पडेल. कदाचित महिन्याभरातल्या ओळखीतून/संपर्कातून अनेक नवीन सदस्य मिळतील. त्यांचा आपल्या उद्दिष्टप्राप्तीसाठी उपयोगच होईल.

त्यामुळे मला उपक्रमांची खालील रूपरेषा सुचवावीशी वाटते :

 1. फोटोथॉन : मराठी विकिपीडियनांनी आपल्याला शक्य असेल त्या गावा-शहरांत अख्खा फेब्रुवारी महिनाभर फोटोथॉन भरवावी. यात बॅनर/टीशर्ट/आर्मबँड/स्टीकर वगैरे प्रमोशनल साहित्य वापरावे. जमल्यास स्थानिक वृत्तपत्रांमधून व टीव्हीवरून आपल्या स्थानिक उपक्रमांचा डंका पिटवून घ्यावा. याच काळात उत्स्फूर्तपणे विकिअकादम्या/कार्यशाळा किंवा लाइव्ह-एडिटिंग सत्रे भरवता येऊ शकल्यास, तीही फायदेशीर ठरतील.
 2. वीकेंडभराची संपादनेथॉन : जगभरात कुठेही, एगदी एकाट ठिकाणी असलेल्या मराठी भाषकालाही सहभाग घेता येईल, अशी ही खुली संपादन-मॅरेथॉन असेल. लेखांतील माहितीची गुणवत्ता वाढवणे व नवीन सदस्यांना विकिपीडियावरील संपादन-संस्कृतीची ओळख करवून देणे, ही दोन्ही उद्दिष्टे यात साधली जातील.

सुचलेल्या कल्पना त्वरित सर्वांसमोर मांडायच्या होत्या, म्हणून हे खंडिभर पोस्ट लिहिले. याबद्दल सदस्यांनी त्यांची मते कळवावीत. विशेषकरून फील्डवर्क करण्यासाठी मी वर उल्लेखलेल्या सदस्यांनी आणि अनवधानाने माझ्याकडून उल्लेख न घडलेल्या अन्य उत्सुक सदस्यांनीही या उपक्रमांत आपण काय काय करू शकतो या शक्याशक्यतांचे विश्लेषण (फीजिबिलिटी अ‍ॅनालिसिस) लिहावे ही विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:११, ४ जानेवारी २०१२ (UTC)

फील्डवर्कला मी अनुकूल नाही. एकतर वेळ आणि खर्च या दोन्ही बाबींनुसार ते मुळीच परिणामकारक नाही. दुसरी गोष्ट इंटरनेट या माध्यमाच्या निर्मितीपासून आजपर्यंतची सगळी प्रगती (त्यात विकिपीडिया नावाचे आश्यर्यही आहेच) फारशा फील्डवर्कविनाच झाली आहे कारण हे माध्यमच मुळी फील्डवर्कवर अजिबातच अवलंबून नाही. (उलट सगळ्या फील्डवर्कला, प्रत्यक्ष भेटीना पर्याय म्हणूनच त्याचा वापर अधिक होतोय) सबब सर्वांनाच नम्र विनंती आहे की हे फील्डवर्कचे खूळ मनातून दूर करावे. उदाहरण घ्यायचा मोह आवरत नाही. पण विकिपीडियासाठी फील्डवर्क म्हणजे विमानप्रवासाची जाहिरात टांग्यावर अडकवून फिरवण्यासारखा प्रकार वाटतो.

बाकी सगळे उपाय करून पाहण्यासारखे आहेत.- मनोज १९:१७, ६ जानेवारी २०१२ (UTC)

>>पण विकिपीडियासाठी फील्डवर्क म्हणजे विमानप्रवासाची जाहिरात टांग्यावर अडकवून फिरवण्यासारखा प्रकार वाटतो.

उदाहरण मनापासून आवडले :) याहू गूगल इत्यादी कमर्शीयल कधी कधी रियल वर्ल्डमधून जाहिराती टाकताना दिसतातच त्यांचा उद्देश टांग्यातल्या प्रवाशांना विमान प्रवासाची स्वप्ने दाखवण्याचा असू शकतो.पण विकिमीडिया चळवळीने आपल्या ध्येय वाक्यातील प्रत्येक शब्द विचारपूर्वक निवडला आहे अशा विश्वाचे स्वप्न पहा, की ज्यात, प्रत्येक मनुष्यमात्र .... 'मुक्तपणे देवाणघेवाण' करू शकेल.तशी आमची बांधिलकी आहे.आपल ज्ञान विमानप्रवाशांपर्यंत मर्यादीत ठेवण्यापलिकडे आपण बघतोच.विकिस्रोत आणि विक्शनरी हे प्रकल्प विमानाकरता इंधन आणणारे प्रकल्प आहेत.विकिस्रोत,विकिबुक्स प्रक्ल्प मोठ्याप्रमाणावर फिल्डवर्कवर अवलंबून असणार आहे.
मग विमान प्रवासात तयार झालेल ज्ञान वितरीत करण्या साठी विमान कधी कधी विमानतळावर उतरले तर बिघडले कुठे शिवाय विमानांची तांत्रीक देखभाल तांत्रिक सुधारणांबद्दल अभ्यास नवागत वैमानिकांची पूर्वतयारी जमिनीवर चांगली होऊ शकते. विमानप्रवास न झेपणारे विवीध विषयाचे तज्ञ मंडळी जमिनीवरून रसद पुरवठा करू शकतील किंवा कसे ?
बाकी टांग्यावरून जाहिरात करण्याचे महत्व त्या जाहिराती पाहून विमानप्रवासाला आलेली मंडळी सांगत रहातीलच
माहितगार ०५:३९, ७ जानेवारी २०१२ (UTC)


पुढाकार घेउन वरील कल्पना/सूचना मांडल्याबद्दल संकल्प आणि इतर सगळ्यांना धन्यवाद. यात एक-दोन गोष्टींची माझी भर --
१. संपादनेथॉनमध्ये किंवा स्वतंत्र उपक्रम म्हणून विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी येथे असलेले लेख वाढवून घ्यावे.
२. आत्तापासून २७ फेब्रुवारीपर्यंत प्रत्येकाने किमान एक तरी नवीन सक्रीय सदस्य मिळवून द्यावा. यासाठी काका, मामा, आजी, भाऊ, बहीण, मित्र, ओळखपाळख असलेले/नसलेले कोणीही चालेल.
३. प्रत्येकाने मेटा वर सदस्यत्व नोंदवावे व मराठी विकिपीडियातर्फे तेथे मांडल्या जाणार्‍या मदतीच्या हाकेला अनुमोदन द्यावे.
४. फेसबूक, गूगल प्लस, ट्विटर, यूट्यूब, ब्लॉग/अनुदिनीवर २७ फेब्रुवारीपर्यंत एकदा तरी विकिपीडियावरील एखाद्या (चांगल्या) लेखाचा दुवा द्यावा.
अभय नातू २२:१४, ६ जानेवारी २०१२ (UTC)
कल्पना निश्चितच स्तुत्य आणि चांगल्या आहेत. फील्डवर्क कसे करता येईल या विषयी अजून थोडी फील्डवर (!) चर्चा करून ठरवावे म्हणतो. तसेच येत्या काही दिवसात / आठवड्यात होणाऱ्या विकी अकादमी मधून याची योग्य ती प्रसिद्धी होईलच...... मंदार कुलकर्णी ०२:४५, ७ जानेवारी २०१२ (UTC)
नमस्कार मंडळी ! एकुणात पाहता संपादनेथॉन उपक्रम पक्का होणे दिसत आहे. फोटोथॉन या उपक्रमाबद्दल महाराष्ट्रातल्या विकिपीडिया सदस्यांना एकत्रितपणे काही करता येईल का, हे लवकरात लवकर कळवा.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १५:४२, १७ जानेवारी २०१२ (UTC)
संकल्प, काल फोन वर कळवले आहेच. सध्या तरी मराठी विकिपीडियाची माहिती देणे, प्रेसेन्तेशन करणे,. विकी अकादमी घेणे याच गोष्टी कार्यकर्त्यांच्या अभावी करता येणे शक्य आहेत आणि त्या करीत आहोत. On Line अजून काही गोष्टी करता येतील का ते पाहावे कारण आपले On Line कार्यकर्ते जगभर जास्त आहेत. मंदार कुलकर्णी १३:५४, २२ जानेवारी २०१२ (UTC)

भिमपिडिया[संपादन]

जयभीम, संकल्प द्रविड आपण पुढाकार घ्यावा आणि मराठी भाषादिवस हा भीमपिडिया साठी राबवावा. सर्वांनी मिळून भिमपिडिया सुरू करावा. भिमसेना, भिमगिते, भिमसाहित्य, भिमसैनिक, भिमशाहीर, भिमकवी, भिम चळवळ यांच्या बाबत महिति भरावि. Meshram ०५:३४, ८ जानेवारी २०१२ (UTC)

Template:Listen[संपादन]

en:Template:Listen याप्रमाणे एखादा साचा मराठी विकिपीडियावर बनवता येईल का? उदाहरणार्थ बालकवी यांच्या संबंधी इंग्रजी विकिपीडिया पृष्ठ en:Balkavi इथे पहा. धन्यवाद! गणेश धामोडकर (चर्चा) १८:१६, २ जानेवारी २०१२ (UTC)

साचा:ऐका उपलब्ध आहे. संतोष दहिवळ १९:२६, २ जानेवारी २०१२ (UTC)

स्थानांतरण[संपादन]

एखादे नवे पान स्थानांतरित करण्यापूर्वी चर्चा पानावर आपले मत नोंदवावे काय? माझ्या मते असे करणे शिष्टाचाराला धरून आहे. अनेक नवीन सदस्य येथे येऊन लेख तयार करतात व हे लेख स्थानांतरित केले गेलेले पाहुन त्यांचा गैरसमज होऊ शकतो. जुन्या पानांचे स्थानांतरण करण्यासाठी हा संकेत लागू नसला तरी चालेल. - अभिजीत साठे १४:००, ११ जानेवारी २०१२ (UTC)

स्वागत साचा[संपादन]

मराठी विकिपीडिया वर अनेक संपादक नवीन सदस्यांच्या पानावर "स्वागत साचा" लावत असतात. पाहिला गेलं तर हे खूप सोपे पण नियमित करायचे काम आहे. शंतनू (सदस्य:निनावी) याने प्रोग्राम करून संगणकाच्या मदतीने हा साचा लावायची सोय केली आहे. अशा प्रकारे गेल्या आठवड्यात त्याने जवळ जवळ १८००० खात्यांना (नवीन सदस्य तसेच आपोआप जी खाती तयार झाली आहेत अशा सर्व खात्यांना हा साचा काही मिनिटात लावला. लवकरच तो सर्व्हर वर हा प्रोग्राम टाकून ही कृती रियल टाईम करणार आहे. म्हणजे असे की नवीन सदस्याने खाते उघडता क्षणी त्याला त्याच्या सदस्य पानावर हा साचा दिसेल. मला असे वाटते की अशी बरीच कामे संगणकाच्या मदतीने चुटकी सरशी झाली तर आपण आपला बहुमूल्य वेळ लेखात भर घालण्यासाठी वापरू शकू. मला आशा आहे की अजून अशी काही कामे आपण या पानावर नोंदवली तर संकल्प, राहुल आणि शंतनू यांच्या मदतीने तसे प्रोग्राम करून घेता येतील.... मंदार कुलकर्णी २०:३७, १३ जानेवारी २०१२ (UTC)

मंदार जी ,

पर यह सुविधा कबसे स्वयंचलित होनेवाली है ? अभी नये लोगोंका स्वागत केनेके लिए क्या विकल्प है, शिवाय खुद ये कम करने के आलावा कुपया बताये | --लकी ०९:१७, १७ जानेवारी २०१२ (UTC)

लकी जी,

ये सुविधा शंतनुने काम्पुटर के मदत से एक प्रोग्राम रन करने से कार्यान्वित कि है, जीससे अपने आप "स्वागत साचा" नये सदस्योन्को लागता है | थोडे हि दिनो मे स्वयंचलित होनेवाली है, इसलिये खुद जाके "स्वागत साचा" नये सदस्योन्को लगाने कि तकलीफ न उठाये तो बेहतर है| - मंदार कुलकर्णी १४:३८, १७ जानेवारी २०१२ (UTC)

 • मंदर जी,

आप हमें कन्फ्यूज कर रहे हो | आप हमें स्वागत करनेसे रोक रहे हो और खुद ही वैसा करते नजर आते हो | ये क्या हो रहा है ???? -- लकी ०७:४८, २४ जानेवारी २०१२ (UTC)

मराठी भाषादिनानिमित्त उपक्रम करण्याविषयी आव्हाना मागे काय आहे ?[संपादन]

चर्चा वादनिवारण चावडीवर हलवली. --- कोल्हापुरी ०३:४४, १६ जानेवारी २०१२ (UTC)


मराठी विकिपीडिया गौरव समिती[संपादन]

मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करते आहे. काही नवीन आहेत म्हणून तर काही जुनी झाली म्हणून दुर्लक्षित आहेत (जाणून बुजून नाही ). कामे करण्याच्या नादात/कामात, कामची कदर करण्यासच आम्हाला बरेचदा वेळ मिळत नाही. काम करणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौर्वासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापा बरोबरच त्यची योग्य रीतीने कदरपण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपिडीयावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समितीची " स्थपना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सम्पादन योगदानाचे गौरव जसे १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारीस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवहि प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून हि समिती कार्य करेल.

मराठी विकिपीडिया गौरव समितीत सामील होऊन गौरव प्रक्रियेत योगदान देऊ इच्छिणाऱ्या सदस्यांनी आपले नाव खाली नोंदवावे. आपल्या भरीव सहकार्याची अपेक्षा.

धन्यवाद राहुल देशमुख १३:१३, १७ जानेवारी २०१२ (UTC)


 1. राहुल देशमुखउपक्रम चांगला आहे याबद्दल वादच नाही पण यातून त्यांना गौरव मिळाला मला मिळाला नाही, हे लोक गटबाजी करतात, आपल्याच माणसांना गौरवतात वगैरे आरोप-प्रत्यारोप होतील. गौरव पात्रता स्पष्ट शब्दात लिहावी. मग त्यावरून कोण लोक त्यासाठी पात्र झाले आहेत हे काम करण्यासाठी सांगकाम्या वापरावा आणि त्यात कमीत कमी चुका होतील हे पाहावे एवढी विनंती. आपल्या पुढाकाराबद्दल धन्यवाद आणि उपक्रमासाठी शुभेच्छा! - कोल्हापुरी ०३:५७, १८ जानेवारी २०१२ (UTC)


काय भौ, तुमास्नी नावडता प्रश्न विचारला म्हून काम आमास्नी ब्यान करुन टाकायचे काय? तुमच्या ब्यानाच्या म्येसेजात अटरफटर लिवतो म्हंता, पन तुमी माज्या प्रस्नाच उत्तर दिलत कि राव. म्हंजे तुमास्नी प्रस्न कल्ला तर. मग अटरफटर कस? का तुमास्नी आमची गावरान भासा आवडत न्हाय? आता सगलेच कसे पुन्यामुंबइकडले गावनार तुमास्नी? आमच्यासारक्या जांभुळवाडीतल्या लोकास्नी पन आवाज हाय का न्हाय हित? का फक्सत शुद मराठी बोलनार्यांनाच हित लिवता येतो?

आता पुन्ना येकदा ईचारतो पघा. हित तुमी देनार गौरव का काय ते आशा लोकास्नी ज्येनी ५००० येळा संपदने केली. मग येकांद्यानी त्येचा कुत्रा (म्हंजे सांगकाम्या, भौ) सोडून केली ही ५००० संपादने, आन ही संपादने केली आपल्याच नावानी तर मग त्यास्नी कसा देनार हा गौरव? ह्यो तर चिटींग झालं न्हाय का? आन पघा माज्यासारक्या गावरान मानसाकड न्हई सांगकाम्या आन केली मी दोनपाचशे संपादन. पन चिटींग करनारा म्होटा कारन त्याने सोताच्याच नावावर कुत्रा सोडून आपली तुंबडी भरली. ह्यो गनित काय जमल न्हाय आपल्याला. आन ह्यो विचारल तर ब्यान आला कि तेज्या आवशीचा

आन आख्खे तीन दिवस ब्यान करुन टाकल काय कारनास्नी ह्यो कलवा. ब्यान केल तर केल पर आमचा पत्ता का काय ते बी अडवून टाकला. आता तुम्ही हितले मालक म्हून काय वाटेत ते करायचा का काय?

आन आता हे लिवल म्हून आजून ३ म्हिने ब्यान डोस्क्यावर घालू नगा म्हंजे ईटोबा पावला

tipya

अहो टिप्या भाऊ, तुमच्या अशुद्ध भाषेसाठी तुम्हाला बॅन केलं असं तुम्हाला का वाटावं? आणि खाली सचिननी लिहिल्याप्रमाणे सांगकाम्यांना हा पुरस्कार मिळणार नाही. राहिली गोष्ट आपल्या संपादनांची - अहो दोनपाचशे जाऊ देत, तुम्ही एखादं तरी संपादन करा, तुम्हाली मी पुरस्कार देतो. तुम्ही आजवर इथेतिथे टिप्पणी करण्याव्यतिरिक्त फार काही केलय असं दिसत नाहीये. जरा आपली शिलेदारी पळवून तरी बघा काय होतं ते. - अभिजीत साठे ००:२४, २१ जानेवारी २०१२ (UTC)

आर म्हंजे आता पघा दोनतीन धनगरानी त्येंची कुत्री म्हंजे ते सांगकामे का काय ते सोडली आन केलं धा हजार बदल म्हंजे मग त्ये लय हुशार पन येकांदा शिलेदार मरमर मरुन करतो पाचपन्नास बदल तरी तो न्हाय हुशार. मग आता ह्यो गनित कसा सोडवयाचा ते सांगा की राव

tipya

टिप्याजी नावात चुकला नाहीनां म्या? कुत्री म्हंजे ते सांगकामे यात पकडले जाणार नाय्, त्या मुळ् आप्ल्यानी चानस हाय. आपली शिलेदारी प्जळवा आता. सचिन १७:२९, १७ जानेवारी २०१२ (UTC)
 • सांगकाम्यांना गौरवण्या साठी वेगळी श्रेणी निर्माण करता येईल त्यात सांगकाम्या साठीचे निकष ठरवता येतील. राहुल देशमुख १९:००, १७ जानेवारी २०१२ (UTC)

प्रार्थना कुणा करावी ?[संपादन]

आकडे आणि अर्थ यांचा संबंध असतो, आकड्यात अर्थ शोधणारे असामान्य असतात.सामान्यांना आकड्यांचे सर्व अर्थ समजत नाहीत, सामान्य मतीस काम बेरजेचे व्हावे वाटते, वजाबाकीचे नव्हे .पण येथील परिस्थिती विपरीत नाही ना ? परमहंस २३:४०, १८ जानेवारी २०१२ (UTC)

नाट्य संमेलनातील खंत[संपादन]

अमोल पालेकर यांनी मराठी नाटक आणि सबंधित कोणतेही लिखाण विकिपिडीयावर नाही असे भाषणात जाहीर करून सर्व पत्रकार मंडळींना "बातमी" दिली आहे. या संदर्भात "संपादने थोन" च्या निमित्ताने मराठी भाषा दिवसा पर्यंत आणि विशेषत: त्या २ दिवसात आपण काम करायला हवे असे वाटते. यासाठी पुढील गोष्टी करता येतील.

 1. मराठी नाटक, मराठी नाटकाचा इतिहास, मराठी रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, समांतर रंगभूमी, अनेक रंगकर्मी अशा अनेकविध विषय तयार करून त्यावर मराठी विपी वर विपुल लिखाण करता येईल.
 2. विविध नवीन साचे आणि वर्ग बनवायला लागतील.
 3. विविध लायब्ररी मधील पुस्तके धुंडाळून त्यातील योग्य मजकूर संदर्भ सहित आंत येईल.
 4. माजी संमेलनांचे फोटो मिळवून ते लेखात चढवणे

या बाबत आपली मते कळवावीत त्याप्रमाणे प्रोजेक्ट करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने कार्य सिद्धीस नेता येईल. J यांनी यावर त्यांच्याकडून आजच काम सुरु केलेले दिसले.....मंदार कुलकर्णी १२:५०, २२ जानेवारी २०१२ (UTC)

मराठी भाषा दिवसानिमित्त संपादनेथॉन[संपादन]

नमस्कार मंडळी!

दरवर्षी २७ फेब्रुवारीला जगभर पाळल्या जाणार्‍या मराठी भाषा दिवसानिमित्त त्याआधीच्या सप्ताहांतास - म्हणजे शनिवार २५ फेब्रुवारी व रविवार २६ फेब्रुवारीस - मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित करावी असा प्रस्ताव मी मांडत आहे. या संपादनेथॉनेत आपण एका दिवसात मराठी विकिपीडियावर शक्य तितकी संपादने करायची व यातून एका दिवसात आपण मराठी विकिपीडियाच्या प्रगतीला आपल्या सर्व ताकदीनिशी शक्य तितका मोठ्ठा रेटा द्यायचा हा मुख्य हेतू आहे. आपण या संपादनेथॉनेत कोणकोणत्या कार्यक्रम आराखड्यांनुसार संपादने करू शकतो याबद्दल विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन २ येथे प्रस्ताव मांडावेत.

या दिवशी आपण मोठ्ठा रेटा देऊन दिवसभरात घडलेल्या संपादनांची संख्या व अन्य आकडेवारी मोजून आपल्या (सध्याच्या क्षमतेनुसार) कमाल कामगिरीचे मूल्यमापन करू शकतो. त्यावरून आपल्याला पुढील वाटचालीसाठी काही मोलाची माहिती उपलब्ध होऊ शकेलच; पण त्याचबरोबर आपण विविध ऑनलाइन व छापील माध्यमांमधून याबद्दल वार्तांकन घडवून आणून मराठी विकिपीडिया प्रकल्पाची जाहिरात करण्यासाठी हा उपक्रम वापरू शकू.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १३:५४, २३ जानेवारी २०१२ (UTC)

भीमपिडियाला टाळता ?[संपादन]

चर्चा विकिपीडिया:चावडी/वादनिवारण येथे हलवली. - कोल्हापुरी १३:२२, २४ जानेवारी २०१२ (UTC)

मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा प्रस्ताव[संपादन]

विकिपीडिया:मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा :

विक्शनरी, विकिस्रोत या प्रकल्पात प्रताधिकार मुक्तीचा प्रश्न नसेलतर साधारणत: कमीत कमी अडथळ्यांनी वेगाने टायपिंग करता येऊ शकते त्या दृष्टीने मराठी विकिपीडियाचे बंधूप्रकल्प विक्शनरी, विकिस्रोत मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा घेणे प्रस्तावित आहे.या स्पर्धेचे स्वरूप कसे ठेवता येईल व संबधीत प्रकल्पांच्या मुलभूत संकल्पनांशी तडजोड नकरता मराठी भाषेच्या विकासात रचनात्मक काम करणार्‍या संस्थांना युनिकोडस्पर्धेत कशा रितीने सहभागी करून घेता येईल या संबंधाने हा चर्चा प्रस्ताव आहे. अशाच पद्धतीने मराठी विकिपीडिया,विकिस्रोत,विकिबुक्स,कॉमन्स, ट्रांसलेट विकि, इत्यादी करीता भाषांतर स्पर्धा सुद्धा कशा भरवता येतील या संबधाने सुद्धा चर्चेचे स्वागत आहे. माहितगार ०५:५३, २४ जानेवारी २०१२ (UTC)

नवा प्रकल्प[संपादन]

बाबासाहेब आंबेडकर प्रकल्प या प्रकल्प पानास दिलेले हे अंतीम नाव नाही.हे किंवा ते नाव असावे असा माझा कोणताही पुर्वग्रह नाही. आधी काम करू मग मराठी विकिपीडियाच्या या प्रकल्पास अनुलक्षून अधिकाधीक चपखल नाव काळाच्या ओघात ठरवू असे माझे व्यक्तीगत मत आहे .तर चला आधी कामाला लागूया.

या प्रकल्पाचा उद्देश बाबासाहेब आंबेडकर आणि संबंधीत चळवळी संबधाने मराठी विकिपीडिया व मराठी विकिस्रोत प्रकल्पात विश्वकोशीय परिघातील भर घालण्याच्या कामाचे सुसूत्रिकरण आहे. माहितगार १५:५१, २४ जानेवारी २०१२ (UTC)


मराठी विकी स्त्रोत और अभयजी, संकल्पजी[संपादन]

नमस्ते,

मराठी विकी स्त्रोत और अभयजी, संकल्पजी को लेकर काफी सदस्योने अनेक विवाद और प्रश्न उपस्थित कर आम विकिपिडियनस के दिमाग में काफी कान्फुजन क्रियेट किया है| किस प्रकल्प पर काम करना यह उस सदस्यकी अपनी पसंद है; फिर भी क्यू की इस विषय में असहयोग, गुटबाजी, राजनीती, जैसे बहोत सारे गंभीर आरोप हो चुके है और ये दोनोही व्यक्ति प्रचालक भी है, इसे मद्दे नजर रखते हुवे मै अभयजी और संकल्पजी से अनुरोध करना चाहूँगा की वो खुदही इस विषय पर यदि रौशनी डाले तो आम आदमीको काफी रहत मिल सकेंगी.

कुपया इसे छबि बचनेकी कोशिश या सफाई ना समजे. लकी १०:११, २६ जानेवारी २०१२ (UTC)

सन्दर्भ :- (नवीन लेख कसे घडवावेत, याचा वस्तुपाठ म्हणून प्रचालकांनी/जाणत्या सदस्यांनी बनवलेल्या लेखांकडे नवे सदस्य पाहत असतात......... विषयाची प्रस्तावना मांडण्याची नैतिक जबाबदारी येऊन पडते. --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०३:१२, २४ जानेवारी २०१२ (UTC) )

मी विकिस्रोतावर काम करावे कि नाही हा माझा चॉइस आहे. मला जितका वेळ मिळतो तो मी येथे घालवतो. अजून एका प्रकल्पाला कमिट करण्याची माझी तयारी नाही.
फालतू आरोप करणाऱ्यांचा मनस्ताप इतका व्हायला लागला आहे की हे काम तरी करावे कि नाही याचा प्रश्न पडलेला आहे.
अभय नातू ०६:२१, २७ जानेवारी २०१२ (UTC)
 • बाकी गोष्टींबद्दल मी टिप्पणी करणार नाही, पण जिवामहाला हे खाते त्याच्या योगदानावरून संदेहास्पद वाटते, त्याची चौकशी व्हावी. Sockpuppet असेल तर संबंधीत सदस्यावर कडक कारवाई व्हावी. गणेश धामोडकर (चर्चा)
जिवामहाला अथवा अभय नातु किंवा कोणत्याही प्रचालकाचे खाते माझे नाही.याची जाहीर नोंद घ्यावी.माझे काम प्रचालकांचे किंवा इतर कुणाचीही पुजा बांधण्याचे नाही. अगदी प्रचालकांनी मराठी विकिपीडिया नितीस अनुसरून नसलेले चुकीचे लेखन लक्षात आणून द्या आणि मीते वगळून दाखवतो नाही अत्यंत आवडीने वगळेन. रायबा ०८:५६, २७ जानेवारी २०१२ (UTC)
रायबा, यावर चर्चा न करता हे पान मिटवणे free speech ला धरून वाटत नाही. किमान तीन दिवस तरी हे पान चर्चेसाठी खुले ठेवावे. मेश्राम यांनी अजून पुरावे दिले नाहीत. जिवामहाला यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. चर्चाच करायची नसेल तर मग ठीक आहे. पर्यायी रूपात ही चर्चा वादनिवारण चावडीवर हलवता येईल, पण तशी नो‌ंद इथे करून मग स्थलांतर केल्या जावे. गणेश धामोडकर (चर्चा) ११:५२, २७ जानेवारी २०१२ (UTC)
प्रचालकांच्या विनंतीवरून विवादातून अंग काढून घेत आहे.रायबा ०५:०६, २८ जानेवारी २०१२ (UTC)

Please ban the id creating nuisance to community[संपादन]

Editor "Meshram" is creating lot of disturbance in wiki community here and is particularly targetting some of the prolific editors here with personal attacks. It is observed that the id is misconstruing many things to just bring himself in limelight every now and then. He has been flaming verbal warfare under cover of casteism and is behaving against the "5 pillars" principle of Wikipedia even after several warnings have been issued by various community members.

This user should be banned indefinitely ASAP.

सदर लिखाण हे स्पष्टपणे कुणीतरी मुद्दामहून अनामिक आय.पी. एड्रेसने केले आहे. हा sockpuppetery चाच एक चोरटा प्रकार आहे व त्याचा निषेध केला गेला पाहिजेत. Who-is च्या माहितीप्रमाणे हा आय. डी. सिंगापूर येथून संचालित होत आहे संदर्भ. प्रस्तुत महाशयांनी समोर येऊन आपल्या ख-या नावाने आपला मुद्दा का मांडू नये? गणेश धामोडकर (चर्चा) ०९:४०, २७ जानेवारी २०१२ (UTC)
चित्र:IP.JPG
We know who is he !!!

मुखपृष्ठ सदर निवडा....[संपादन]

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मराठी विकिपीडिया च्या साईट वर गेले की पहिले दिसते ते "मुखपृष्ठ सदर". मराठी विकिपिडीयावरील सर्वात चांगले झालेले लेख आपण मुखपृष्ठ सदर येथे प्रदर्शित करतो. दर महिन्याच्या ३० / ३१ तारखेला आपण हे सदर बदलतो. आता वेळ आहे ती पुढील महिन्याचे मुखपृष्ठ सदर निवडायची. विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन येथे आपले आवडते मुखपृष्ठ सदर निवडावे.... मंदार कुलकर्णी ०४:३८, २८ जानेवारी २०१२ (UTC)

हे लकी कोण[संपादन]

लकी नावाने या पानावर गेले काही दिवस पोस्ट केल्या जात आहेत. इथले सक्रीय सदस्यही त्यांना, तत्परतेने, त्यांनी विचारलेल्या भाषेत माहिती देताना, त्यांनी सांगितल्यानुसार पोस्ट करताना दिसतात. मात्र स्वतःच्या सिग्नेचरमध्ये लकी हायपरलिंक देण्याचे कष्ट घेताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीच माहिती मिळत नाही. ते मराठी खेरीज अन्य भाषेत का लिहीतात, मराठी येत नसेल तर अधिक व्यापकतेसाठी त्यांना इंग्रजी सोयीची वाटत नाही का आणि सर्वात महत्वाचे हे कुणी पदाधिकारी वैगरे आहेत काय, माहिती असलेल्या इतर सदस्यांनी तरी माहिती द्यावी ही विनंती. -¬ मनोज ०९:३३, २९ जानेवारी २०१२ (UTC)

मी येथे सक्रीय असलो तरी लकी यांनी चुकीच्या केलेल्या संपादनासाठी (माझ्या मताप्रमाणे) मी त्यांच्या चर्चा पानावर त्यासंबंधीचा एकच संदेश टाकला आणि तोही माझ्या भाषेत (येथे पहा). संतोष दहिवळ १०:११, २९ जानेवारी २०१२ (UTC)
संतोष माहितीबद्दल धन्यवाद पण 1) एकतर त्यांचे संदेश मराठी इंग्रजी या दोन भाषांत दिसले नाहीत, त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली. त्यांच्या सिग्नेचरमध्ये लिंक नसल्याने ती पूर्ण होत नव्हती, हा एक भाग. 2) माझ्या पूर्वानुभवामुळे, समोरचा कोण याची काही माहिती आधी असावी हीदेखील अपेक्षा होती 3) इतर विकीपीडियावरची मंडळी, पदाधिकारी वैगरे येथे अधूनमधून येत असतात असेही कळले होते. या तिन्ही गोष्टींमुळे मी हा प्रश्न केला. तुम्ही किंवा कुणीही गैरसमज करून घेऊ नये.- मनोज १६:०८, २९ जानेवारी २०१२ (UTC)

राष्ट्रभाषा[संपादन]

>>>>ते मराठी खेरीज अन्य भाषेत का लिहीतात, मराठी येत नसेल तर अधिक व्यापकतेसाठी त्यांना इंग्रजी सोयीची वाटत नाही का

नमस्ते मनोज जी ,

मै तहे दिल से आपका इस्तकबाल करता हु |

मै किसी अन्य भाषामे नहीं राष्ट्र भाषामे लिखता हु | और आप एक भारतीय (?) होनेके नाते हमारी राष्ट्र भाषा हिंदी है ये तो जनतेही होंगे | राष्ट्र भाषा हिन्दीको अन्य भाषा कहेना और अंगेजी भाषाकी पैरवी हमें आपसे अपेक्षित नहीं थी | यहाँ चर्च्या पृष्ट पर राष्ट्रभाषा में लिखने को श्रीमान अभय नातू और संकल्प द्रविड़ जी ने इसके पाहिले हरकत जताई थी; उनकी बात और है वो विदेशी नमक खाते है | बहोत से सदस्योने उनकी हरकत पे एतराज जताया था जिस करणवश आज राष्ट्रभाषा को प्रतिबंधित करना इन लोगोंको अशक्य हुवा है| आपभी राष्ट्रभाषा हिंदीका गर्व करे ...जय हिंद ! --लकी १९:५१, ३० जानेवारी २०१२ (UTC)

मराठी ही पण एक राष्ट्रभाषा आहे! भारतीय या नात्याने आम्ही त्याच भाषेत लिहितो. हा मराठी विकिपिडिया आहे, येथे इतर भाषातले लिखाण करणे उचित नाही. हिंदी भाषेसाठी हिंदी विकिपिडियावर लिखाण करावे. मी प्रचालकांना निवेदन करतो की इतर भाषिक लिखाण येथून काढून टाकले जावे. हे लिखाण काढले गेले नाही तर उद्या मी येथे तमीळ/गुजराती आणि बांग्ला भाषेतून लेख लिहिन आणि त्यावरही कुणी आक्षेप घेऊ नये! ;) निनाद २२:२८, ३१ जानेवारी २०१२ (UTC)
लकी, फंडे मारणे बंद करा व जर काही करायचेच असेल तर जरा लेखांमध्ये भर टाका (विस्तार विनंतीशिवाय). उगाच येथील जुन्या व कार्यरत सदस्यांना उपदेश पाजत बसू नका.


दिन विशेष समर्पक चित्रे संकलन, संवर्धन आणि विकास केंद्र[संपादन]

आजचे छायाचित्र हे मराठी विकिपीडिया च्या मुखापृष्टावरील सदर रोज नवीन चित्र दाखवात असत. हि चित्रे सर्व सर्वसाधारण पणे विकिपीडिया कॉमन्स येथून घेतलेली असतात आणि बरेचदा आजशी संबंधित नसतात. मुखपृष्ट सदरातील आजचे छायाचित्र हे आजच्या तारखेशी संबंधित असल्यास जसे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीचे चित्र, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी/दिवे आदींचे चित्र, १ मे ला महाराष्ट्रा बाबत वैगरे तर अधिक समर्पक वाटेल असे वाटते. करिता मराठी विकिपीडिया दिन विशेष समर्पक चित्रे संकलन, संवर्धन आणि विकास केंद्र सुरु करीत आहोत. ह्या उपक्रमा अंतर्गत मराठी विकिपीडिया मुखापृष्टावर मराठमोळी अधिक समर्पक चित्रे उपलब्ध करण्याचा आमचा मानस असेल. फोटो थोन -२०१२ च्या प्रचंड यशा नंतर ह्या उपक्रमास हि उत्तम प्रतिसाद लाभेलच ह्यात शंका नाही. दिन विशेष समर्पक चित्रे संकलन, संवर्धन आणि विकास केंद्रात सक्रीय सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या सदस्यांनी आपली नवे येथे नोंदवावीत.

राहुल देशमुख १२:३६, ३ मार्च २०१२ (IST)[reply]

 1. राहुल देशमुख

विकिस्रोतावरील प्रचालकपदाकरिता विनंती[संपादन]

नमस्कार,

मी मराठी विकिस्रोतावर येथे मराठी विकिस्रोत प्रचालकपदाकरिता विनंती नोंदवली आहे. आपणास योग्य वाटल्यास संबधीत पानावर आपला कौल नोंदवावाही नम्र विन्ंती माहितगार (चर्चा)

विकिप्रकल्प:मराठी रंगभूमी[संपादन]

अमोल पालेकर यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी बरीच माहिती मराठी विकिपीडियासाठी मिळवून देवू असे भरीव आश्वासन दिले आहे. मराठी रंगभूमी इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे विष्णू अमृत भावे यांनी सीता स्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीकरांच्या प्रेरणेने केला. हा 150 वर्षाचा रंजक इतिहास मराठी विकिपीडिया वर आणायच्या निमित्ताने विकिप्रकल्प: मराठी रंगभूमी सुरू करावा अशी कल्पना येथे मांडायची आहे. या प्रकल्पात मध्ये अनेक जण आपल्या परीने काम करू शकतील. यात करायच्या ढोबळ गोष्टी येथे नमूद करीत आहे -

 1. मराठी रंगभूमी, मराठी रंगभूमीचा इतिहास, मराठी रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, समांतर रंगभूमी, अनेक रंगकर्मी अशा अनेकविध विषय तयार करून त्यावर मराठी विपी वर विपुल लिखाण करता येईल.
 2. विविध नवीन साचे आणि वर्ग बनवायला लागतील.
 3. विविध लायब्ररी मधील पुस्तके धुंडाळून त्यातील योग्य मजकूर संदर्भ सहित आंत येईल.
 4. माजी नाट्य संमेलनांची संपूर्ण माहिती आणि फोटो मिळवून ते लेखात चढवणे
 5. नाट्य परिषद आणि अनेक संस्थांकडून मिळालेली माहिती सुसूत्र पाने मराठी विकिपीडिया टाकणे
 6. मराठी रंगभूमीवर योगदान देणार्‍या व्यक्तींचे लेख बनवणे
 7. हा प्रकल्प पुढच्या नाट्य संमेलनापर्यंत पूर्ण करून त्याची माहिती सुयोग्य पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचवणे.

या बाबत आपली मते कळवावीत. विकिप्रकल्प:मराठी रंगभूमी चे प्रकल्प पान बनवून आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरुवात करता येईल.मंदार कुलकर्णी (चर्चा) ००:५८, ७ मार्च २०१२ (IST)[reply]

हरी नारायण आपटे आणि नारायण हरी आपटे[संपादन]

मराठी विकिपीडियावर हरी नारायण आपटे आणि नारायण हरी आपटे असे दोन लेख आहेत प्रथम दर्शनी या दोन वेगेवेगळ्या व्यक्ति आहेत असे दिसते पण जाणकारांपैकी कुणी दुजोरा देऊ शकेल काय ? सोबतच लिहिलेल्या ग्रंथांची नावे चुकीच्या नावाच्या लेखात गेली नाहीत याची खातर जमा करून हवी माहितगार (चर्चा) १९:३३, ७ मार्च २०१२ (IST)[reply]

ह.ना. आपटे(८-३-१८६४ ते२-३-१९१९) आणि ना.ह. आपटे ही दोन वेगळी माणसे होती, आणि ती एकमेकांची नातेवाईकही नव्हती. ह.ना.आपट्यांनी दहा ऐतिहासिक आणि दहा सामाजिक कादंबर्‍या लिहिल्या. ते मराठीचे युगप्रवर्तक कादंबरीकार समजले जातात. सतत २५-३० वर्षे मराठीत गुणवत्तापूर्ण साहित्य निर्माण करणारे ह.ना.आपटे हे पहिले प्रसिद्ध मराठी कादंबरीकार. त्या मानाने, ना.ह.आपटे हे खूप अलीकडचे. त्यांनी ऐतिहासिक कादंबर्‍या बहुधा लिहिल्या नसाव्यात....J (चर्चा) १४:५७, ८ मार्च २०१२ (IST)[reply]

विक्शनरी, विकिस्रोत या प्रकल्पात प्रताधिकार मुक्तीचा प्रश्न नसेलतर साधारणत: कमीत कमी अडथळ्यांनी वेगाने टायपिंग करता येऊ शकते त्या दृष्टीने मराठी विकिपीडियाचे बंधूप्रकल्प विक्शनरी, विकिस्रोत मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा घेणे प्रस्तावित आहे.या स्पर्धेचे स्वरूप कसे ठेवता येईल व संबधीत प्रकल्पांच्या मुलभूत संकल्पनांशी तडजोड नकरता मराठी भाषेच्या विकासात रचनात्मक काम करणार्‍या संस्थांना युनिकोडस्पर्धेत कशा रितीने सहभागी करून घेता येईल या संबंधाने हा चर्चा प्रस्ताव आहे.माहितगार (चर्चा) ११:५७, ११ मार्च २०१२ (IST)[reply]

विकिस्रोत साठी भरपूर टायपिंग करून हवे आहे.... +1 ..मंदार कुलकर्णी (चर्चा) १३:०६, ११ मार्च २०१२ (IST)[reply]

Updates from India Program Team[संपादन]

This is the first post from the India Program team regarding the team. I have been posting updates on the various mailing lists - but am acutely aware that the majority of our community is on village pumps or project pages and hence this post. Do excuse me for posting something which is not solely focused on this project, but the work we are doing has learnings that you might find useful for your project. Here are 5 important links that you might find useful

 • There is an India Program page on meta - which has links to a number of important workstreams (on the right of the page)
 • Here is your India Program team. Feel free to reach out for any help or to provide any suggestion - or just to say hello!
 • I submitted the following mid-year report to the community on January 15th 2011 - outlining the activities for 2011 and the priorities for 2012. Strictly speaking, this wasn't a mid-year report because it covered all of 2011, but going forward, I intend to make it a half-yearly affair. Please add your comments or suggestions here, or below this post.
 • I have recently started monthly updates. The monthly update for February is available here. Please add your comments or suggestion here. The areas of emphasis for March are here. Please add your comments or here. This is really useful for us to ensure that we are doing what you need most.
 • I have also started a new tab on the India Program page for Learnings, called Gyan. I think it is going to be a pretty cool place for us to put together a whole host of learnings, lessons, heartbreaks, Eureka moments and inspirations - gathered from all over the community. Stay tuned for more!
 • One of the essential things that India Program needs to constantly work out is keeping our community informed of the work that we are doing - so that this work is clearer but also to help cross-pollinate ideas amongst a wider set of community members who might not have been engaged on specific village pump / talk page discussion or involved in particular activities (e.g. outreach events) or wikiprojects. I propose to have a fortnightly IRC for the community with India Program. (For those who are not familiar with IRC, it is an Internet messaging system similar to a regular chat room. It's very simple to use and you can join in by clicking on the following link. This would be done on the 1st and 3rd Thursdays of every month at 9pm IST (which is GMT + 0530) - THOUGH NOT THIS MONTH - BECAUSE I HAVE MISSED THE TIMELINE. Just for March, we will do it on March 15th and March 29th (both at 9pm IST which is GMT + 0530). I suggest that these chats are focused on specific work streams. As with many community meet-ups - folks will give time to attend a meet-up or participate in an IRC only if there is a topic of relevance to them. Therefore, we will do one IRC on Indic languages and one on Outreach & Communications. The March 15th one will be focused on Indic Languages and the one on March 29th will be on Outreach & Communications. (All IRCs will start with a re-cap of India Programs activities.) There is quite a bit of overlap on these topics - so feel free to join both. Please do also invite anyone who is interested to know more about India Program or - even more importantly - interact with fellow Wikimedians. As always, the logs will be put up on meta for the benefit of those who can't attend and for the record.

Please feel free to translate this post for the benefit of the larger audience. In fact, I'd be really grateful if you did!

Hisham (चर्चा) ०९:१५, १२ मार्च २०१२ (IST)[reply]


आपल्याकडे बरेचदा गंभीर भाषिक विवाद उदभवताना दिसतात,एखादा मराठी विकिपीडियन या म्ंडळींशी संपर्कात आल्यास आधून मधून नसतेच प्रवादही होताना आढळतात,बर या विवाद आणि प्रवादांची या बाहेरून येणाऱ्या मंडळींना कल्पना नसते आपल्या पैकी काहीजण त्यांना जाऊन डायरेक्ट भिडतात आणि हि गेस्ट मंड्ंळी गोंधळून जाताना दिसतात, प्रोग्राम मंडळींना आणि त्यांच्या चर्चेकरिता वेगळे उपचावडी पान द्दावे ?; चावडी/प्रगतीवर जाण्यास सांगावे विकिपीडिया दुतावासाचे उपपान बनवून द्यावे किंवा या पेक्षा वेगळा प्रस्ताव मांडावा ; किंवा आमच्यात अजिबात येऊ नका ढवळा ढवळ करू नका असे कळवावे . सदस्यांनी आपापली मते कृपया नोंदवावीत. मते नोंदवताना कोणत्याही कारणाने इतर सदस्यांचे नामोल्लेख खासकरून व्यक्तिगत टिका मूळीच करू नयेत.
माहितगार (चर्चा) १२:१७, १२ मार्च २०१२ (IST)[reply]

इंग्रजी विकिपीडियावर मराठी विकिपीडीया बद्दल लेख[संपादन]

नमस्कार, सध्या इंग्रजी विकिपीडियावर हिंदी मल्याळम इत्यादी विकिपीडीयांबद्दल लेख आहेत पण मराठी विकिपीडीया बद्दल लेख उपलब्ध नाही, तो चालू करण्याच्या दृष्टीने इंग्रजी विकिपीडियाच्या नियमास अनुसरून आपण तो Marathi Wikipediaया धूळपाटी सँडबॉक्सवर चालू करत आहोत. १ मे ह्या मराठी विकिपीडीया वाढदिवसापूर्वी त्याची निर्मिती पूर्ण होण्याच्या दृष्टीने योगदान करावे हि नम्र विनंती.माहितगार (चर्चा) २१:०१, १५ मार्च २०१२ (IST)[reply]

सांगकाम्या झेंडा विनंती[संपादन]

<--मागे आपल्याला इमेल वर कळवले होते-->

<--Reminder १...............-->

माझे सदस्य खाते अववृद्ध (Block) होण्याच्या भीतीने सांगकाम्याला झेंडा मिळवण्यासाठी विकिपीडिया:Bot येथे विनंती टाकली आहे. आपली सहमती वा विरोध तिथे नोंदवावा.

<--त्यासाठी बॉट वापरावे-->

कसा वापरावा याची माहिती मराठी विकिपीडियावर घेण्याचा प्रयत्न केला सहाय्य पान उपलब्ध झाले नाही. असे सहाय्य पान सूचना करणांपैकी कुणी उपलब्ध करून दिल्यास फार बरे होईल नाही का?

<--नुसती संपादने संख्या AWB ने वाढवण्यात काही हशील नाही-->

पुन्हा पुन्हा करावी लागणारी संपादने मी AWB ने वेळ वाचवण्यासाठी करतो. माझ्या संपादनांचा कुठल्याही गौरव, बार्नस्टार यासाठी विचार केला जाऊ नये. माझी संपादने ही फक्त मराठी विकिपीडिया विश्वासार्ह आणि अद्ययावत बनवण्यासाठी आहेत कुठल्याही गौरव वा बार्नस्टारसाठी नाहीत. असे गौरव वा बार्नस्टार मला दिले जाऊ नयेत मी ते नम्रपणे नाकारतो. -संतोष दहिवळ (चर्चा) २३:४१, १७ मार्च २०१२ (IST)[reply]