विकिपीडिया:गौरव समिती/मुखपृष्ठ
मुखपृष्ठ | गौरव | गौरव समिती | गौरव शिफारस | गौरव समिती चावडी | आभार | गौरव समिती संपर्क |
गौरव समितीमध्ये आपले स्वागत आहे[संपादन]चांदणे शिंपीत जा ...![संपादन]मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत, तर काही जुनी झाली आहे. काम करणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदरही करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी, ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती"ची स्थापना करण्यात येत आहे. सदर समितीतर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन-योगदानाचे गौरव, उदा. १००० संपादने, २००० संपादने, ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील. तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल. "मराठी विकिपीडिया गौरव समिती" स्थापना होताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा बाळगतो, की भविष्यात सदर समिती मराठी विकिपीडियाच्या भवितव्य उज्ज्वल करण्यात मोलाची कामगिरी बजावेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच, ही अपेक्षा. बार्नस्टार हा विकिपीडियासाठी नवीन नाही. काही वर्षापूर्वी, विकिवरील गटाने, त्यांच्या वापरकर्त्यास मोबदल्यादाखल, बार्नस्टार देणे सुरू केले. त्यांनी स्टार अँकर याचा वापर कामाच्या सहभागास दर्शविण्यास जणू काही बार्न रेझिंग सुरू केले. विकि मोबदल्याबद्दलचा बार्नस्टार देण्याची कल्पना सुनीर शाह यांनी मीटबॉलविकी यांनी सुरू केली. ईस्टर अंड्यांसाठी त्यासदृष्य बार्नस्टार बनविण्यासाठी वेब डिझायनरांना आमंत्रित करण्यात आले. विकि बार्नस्टारचे पदार्पण डिसेंबर, इ.स. २००३मध्ये झाले. तेव्हापासून, विकिपीडिया संस्कृतीत हा पायंडा पाडला गेला. हे पुरस्कार सौहार्द-प्रचाराचा भाग आहे व ते सभ्यपणा आणि विकिप्रेम यांच्या संवर्धनार्थ आहेत. ते वार्म फझ्झीचाच एक प्रकार आहेत: ते मिळविणार्यास आनंद देतात. |