लोकशिल्पकला
Appearance
लोककलांची परंपरा अश्मयुगीन काळापासून चालू आहे. हडप्पा संस्कृतीत मातीची शिल्पे,देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत.आजही बंगाल,बिहार,गुजरात, महाराष्ट्र,राजस्थान अशा अनेक राज्यांत मातीच्या गणेशाच्या,गौरींच्या मूर्ती तयार केल्या जातात.मातीची खेळणी आणि बैल तयार करण्याची पद्धत हडप्पा संस्कृतीत होती.पूर्वजांच्या स्मरणार्थ उभे केलेले लाकडी खांब आणि वीरगळ यांवर शिल्पे कोरली गेलेली पहावयास मिळतात.अशा रितीने धार्मिक कारणांतून व मनोरंजनासाठी तयार केल्या जाणाऱ्या कारागिरितून लोकशिल्पकला टिकून राहिली व तिचा विकासही झाला.