लॉकहीड सी-१३०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लॉकहीड सी-१३० हर्क्युलीस हे अमेरिकेच्या लॉकहीड कॉर्पोरेशन (आताची लॉकहीड मार्टिन)ने तयार केलेले चार टर्बोप्रॉप इंजिने असलेले सैनिकी मालवाहू विमान आहे. हे विमान सैनिक, सामान तसेच वैद्यकीय मदतीची ने-आण करणारे हे विमान असल्या-नसल्या धावपट्टीवरुन चढू-उतरू शकते.

या विमानाचे अनेक इतरही उपयोग करून घेण्यात आलेले आहेत. एक उपप्रकार, एसी-१३०, हा गनशिप[मराठी शब्द सुचवा] आहे तसेच छत्रीधारी सैनिकांनी सोडणे, शोधबचाव मोहीम, शास्त्रीय संशोधन, हवामान टेहळणी, हवेतल्या हवेत इंधन पुरवठा, समुद्री टेहळणी तसेच वणवे विझवण्यासाठीही हे विमान वापरले जाते. ४० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारांत तयार केलेले हे विमान ६० हून अधिक देश आपल्या सैनिकी वाहतूकीसाठी वापरतात. भारतीय वायुसेनेने सी-१३०जे प्रकारचे एक विमान २०११ मध्ये दाखल करून घेतले व अधिक पाच विमानांची मागणी नोंदवली आहे.

हेही पाहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.