Jump to content

एफ/ए-१८ हॉर्नेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एफ-१८ या पानावरून पुनर्निर्देशित)
एफ/ए-१८ हॉर्नेट

अमेरिकन मरिन कॉर्प्सचे एक एफ/ए-१८सी विमान २००३ साली दक्षिण चीन समुद्रावरून उडताना

प्रकार बहुउद्देशीय विमान
उत्पादक देश युनायटेड स्टेट्स
उत्पादक मॅकडॉनेल डगलस/बोइंग
नॉर्‌थ्रॉप
पहिले उड्डाण १८ नोव्हेंबर १९७८
समावेश नोव्हेंबर १९८३
सद्यस्थिती सेवेत आहे
मुख्य उपभोक्ता युनायटेड स्टेट्स नौदल
युनायटेड स्टेट्स मरिन कॉर्प्स
रॉयल ऑस्ट्रेलियन वायुसेना
स्पॅनिश वायुसेना
उत्पादन काळ १९७८ - आता
उत्पादित संख्या १,४८०
प्रति एककी किंमत $२.९ कोटी (२००६)[१] (एफ-१८सी/डी)
मूळ प्रकार नॉर्‌थ्रॉप वायएस-१७

एफ/ए-१८ हॉर्नेट हे दोन चालक दलाचे सुपरसॉनिक, सर्व वातावरणात काम करू शकणारे, विमानवाहू नौकांसाठी अनुकूल अमेरिकन बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. अमेरिकेच्या पूर्वीच्या मॅकडॉनेल डगलस (आत्ताची बोईंग) आणि नॉर्‌थ्रॉप या कंपन्यांनी युनायटेड स्टेट्स नौदल आणि युनायटेड स्टेट्स मरिन कॉर्प्ससाठी या विमानाची निर्मिती केली होती.

एफ/ए-१८चा कमाल वेग माख १.८ (१,९१५ किमी/तास) आहे. ही विमाने हवेतून हवेत मारा करणारी आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी अनेक प्रकारची क्षेपणास्त्रे घेऊन जाऊ शकतात. एफ/ए-१८ विमानवाहू नौकांसाठी उपयुक्त असले तरी कमी पल्ला आणि भार वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे त्याच्यावर टीका केली जाते.

१९८६ मधले अमेरिकेचे लिबियामधील बॉंबिंग, १९९१ चे आखाती युद्ध आणि २००३ च्या इराक युद्धामध्ये या विमानांनी सहभाग घेतला होता.

वैशिष्ट्ये

[संपादन]

संदर्भ: युएस नौदल तपशील फाईल[२]

  • चालक दल : एफ/ए-१८सी: १, एफ/ए-१८डी: २
  • लांबी : १७.१ मी (५६ फुट)
  • पंखांची लांबी : १२.३ मीटर (४० फुट)
  • उंची : ४.७ मी (१५ फुट ४ इंच)
  • पंखांचे क्षेत्रफ़ळ : ३८ चौरस मी (४०० चौरस फुट)
  • निव्वळ वजन : १०,४०० कि.ग्रॅ.
  • सर्व भारासहित वजन : १६,७७० कि.ग्रॅ.
  • कमाल वजन क्षमता : २३,५०० किलो
  • कमाल वेगः
    • कमी उंचीवर : माख १.२ (१,४७३ किमी/तास)
    • अति उंचीवर : माख १.८ (१,९१५ किमी/तास)
  • पल्ला : २,००० किमी
  • प्रभाव क्षेत्र : ७४० किमी
  • बंदुक : २० मिमी, ५७८ गोळ्या
  • उडताना समुद्रसपाटीपासुन कमाल उंची : १५,२४० मी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "एफ/ए-१८ हॉर्नेट स्ट्राइक फायटर" (इंग्रजी भाषेत). 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-16 रोजी पाहिले.
  2. ^ "एफ/ए-१८ हॉर्नेट स्ट्राईक फायटर फॅक्ट शीट" (इंग्रजी भाषेत). 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 August 2016 रोजी पाहिले.