मिग-२७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मिकोयान गुरेविच २७ तथा मिग-२७ (रशियन: Микоян МиГ-27)हे रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतीय कंपनी या विमानाचे उत्पादन बहादुर या नावाने करते. या विमानाला नाटोच्या सैन्याने फ्लॉगर डी/जे असे संकेतनाव दिलेले आहे.

या विमानाची रचना मिग-२३ या विमानाच्या रचनेवर आधारित आहे. मिग-२७मध्ये आकाशातून जमिनीवर मारा करण्याची यंत्रणा जास्त विकसित केली गेली. मिग-२७चा वापर मिग-२३ इतका झाला नाही. अनेक राष्ट्रांनी मिग-२७च्या ऐवजी मिग-२३बीएन किंवा सुखोई एसयू-२५ विकत घेणे जास्त पसंत केले. सध्या फक्त भारतीय वायुसेना, श्रीलंकी वायुसेना आणि कझाक वायुसेना या विमानाचा वापर करतात. रशिया आणि युक्रेनच्या वायुसेनांनी ही विमाने निवृत्त केली आहेत.

Mig27 he retaid zale ahe Date 27 Dec 2019