Jump to content

एफ-३५ लाईटनिंग २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एफ-३५ लाईटनिंग २

एफ-३५ए लाईटनिंग २

प्रकार स्टेल्थ बहुउद्देशीय लढाऊ विमान
उत्पादक देश युनायटेड स्टेट्स
उत्पादक लॉकहीड मार्टिन
पहिले उड्डाण १५ डिसेंबर २००६ (एफ-५३ए)[१]
समावेश एफ-३५बी: ३१ जुलै २०१५
एफ-३५ए: २ ऑगस्ट २०१६
एफ-३५सी: २०१८
सद्यस्थिती सेवेत आहे
मुख्य उपभोक्ता युनायटेड स्टेट्स वायुदल
उत्पादन काळ २००६ - आता
उत्पादित संख्या २०० (जानेवारी २०१७ पर्यंत)[२]
एकूण कार्यक्रमखर्च $१,५०८ अब्ज (२०७० पर्यंत)
प्रति एककी किंमत एफ-३५ए: $९.४६ कोटी[३]

एफ-३५बी: $१२.२८ कोटी[३]
एफ-३५सी: $१२.१८ कोटी[३]

मूळ प्रकार लॉकहीड एक्स-३५

एफ-३५ लाईटनिंग २ हे अमेरिकन बनावटीचे, एक चालक दलाचे, पाचव्या पिढीचे अत्याधुनिक बहुउद्देशीय स्टेल्थ लढाऊ विमान आहे. अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन, या कंपनीने याची निर्मिती केली आहे. या पाचव्या पिढीच्या विमानाची निर्मिती जमिनीवरील हल्ला आणि हवाई सुरक्षेसाठी करण्यात आली आहे. याचे तीन प्रमुख प्रकार आहेत: एफ-३५ए: पारंपारिक उड्डाण आणि लॅंडिंग, एफ-३५बी: छोट्या धावपट्टीवरून उड्डाण आणि उभे लॅंडिंग, एफ-३५सी: विमानवाहू नौकांसाठीची विमाने.

हा कार्यक्रम जगाच्या इतिहासातील सर्वात महाग लष्करी शस्त्रास्त्र प्रणाली आहे.

वैशिष्ट्ये[संपादन]

माहिती स्रोत: लॉकहीड मार्टिन तपशील[४][५][६]

 • चालक दल : १
 • लांबी : १५.६७ मी (५०.५ फुट)
 • पंखांची लांबी : १०.७ मीटर (३५ फुट)
 • उंची : ४.३३ मी (१४.२ फुट)
 • पंखांचे क्षेत्रफ़ळ : ४२.७ चौरस मी (४६० चौरस फुट)
 • निव्वळ वजन : १३,१९९ कि.ग्रॅ.
 • सर्व भारासहित वजन : २२,४७० कि.ग्रॅ.
 • कमाल वजन क्षमता : ३१,८०० किलो
 • इंधन क्षमता : ८,३८२ कि.ग्रॅ. आंतरिक
 • कमाल वेगः
  • अति उंचीवर : माख १.६+ (१,९३० किमी/तास)
 • पल्ला : >२,२२० किमी (आंतरिक इंधनावर)
 • प्रभाव क्षेत्र : १,१५८ किमी
 • बंदुक : २५ मिमी, १८० गोळ्या

संदर्भ[संपादन]

 1. ^ "यु.एस. मरीन कॉर्प्सने एफ-३५बी कार्यरत घोषित केले". www.marines.mil (इंग्रजी भाषेत). 31 July 2015 रोजी पाहिले.
 2. ^ "लॉकहीड मार्टिनने २००वे एफ-३५ लढाऊ विमान वितरीत केले" (इंग्रजी भाषेत). 10 April 2014 रोजी पाहिले.
 3. ^ a b c "एफ-३५ कर्यक्रमाच्या इतिहासात विमानांच्या सर्वात कमी किंमतीचा करार ठरला" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-06-08. 2016-10-16 रोजी पाहिले.
 4. ^ "एफ-३५ए पारंपारिक उड्डाण आणि लॅंडिंग आवृत्ती" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2011-03-17. 23 August 2016 रोजी पाहिले.
 5. ^ "एफ-३५बी लहान उड्डाण आणि उभी लॅंडिंग आवृत्ती" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2011-03-17. 23 August 2016 रोजी पाहिले.
 6. ^ "एफ-३५सी विमानवाहू नौकांसाठीची आवृत्ती" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2011-03-17. 23 August 2016 रोजी पाहिले.