लिथुएनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिथुएनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
Lietuvos Tarybų Socialistinė Respublika
Литовская Советская Социалистическая Республика

Flag of Lithuania (1918-1940).svg १९४०१९९० Flag of Lithuania.svg
Flag of Lithuanian SSR.svgध्वज Emblem of Lithuanian SSR.svgचिन्ह
Soviet Union - Lithuania.svg
राजधानी व्हिल्नियस
शासनप्रकार सोव्हियेत संघाचे गणराज्य
अधिकृत भाषा लिथुएनियन, रशियन
क्षेत्रफळ ६५,२०० चौरस किमी
लोकसंख्या ३६,८९,७७९
–घनता ५६.६ प्रती चौरस किमी

लिथुएनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (रशियन: Литовская Советская Социалистическая Республика; लिथुएनियन: Lietuvos Tarybų Socialistinė Respublika) हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते.

१९१८ पर्यंत रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या लिथुएनियाने ह्याच साली स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४० साली रशियाने लिथुएनियावर केलेल्या यशस्वी आक्रमणानंतर हे राष्ट्र पुन्हा रशियाच्या अधिपत्याखाली आले व सोव्हियेत संघाचे गणराज्य बनवण्यात आले. ११ मार्च १९९० रोजी सोव्हियेत संघाचे विघटन झाले व सोव्हियेत लिथुएनियाचे पुन्हा स्वतंत्र लिथुएनिया देशामध्ये रुपांतर झाले.