रशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक
Jump to navigation
Jump to search
|
||||
| राजधानी | सेंट पीटर्सबर्ग (इ.स. १९१७ ते इ.स. १९१८) मॉस्को (मार्च १९१८ पासून)[१] |
|||
| अधिकृत भाषा | रशियन (इ.स. १९३७ पासून[२]) | |||
| क्षेत्रफळ | १,७०,७५,२०० चौरस किमी | |||
| लोकसंख्या | १४,७३,८६,००० | |||
रशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक किंवा सोव्हियेत रशिया (अन्य मराठी नामभेद: रशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय गणराज्य ; रशियन: Российская Советская Федеративная Социалистическая Республика) हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ प्रजासत्ताकांपैकी आकाराने, लोकसंख्येने व अर्थव्यवस्थेनुसार सर्वात मोठे प्रजासत्ताक होते.
७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ऑक्टोबर क्रांतीमधून रशियन साम्राज्याचा पाडाव व सोव्हियेत संघाचा उदय झाला. सोव्हियेत रशिया हे ह्या साम्यवादी संघातील सर्वांत बलाढ्य प्रजासत्ताक होते.
२५ डिसेंबर, इ.स. १९९१ रोजी सोव्हियेत संघाचे विघटन झाले व सोव्हियेत रशियाचे रशिया ह्या स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर झाले.
संदर्भ[संपादन]
- ↑ "लेनिन्स मायग्रेशन अ क्वीअर सीन" (इंग्लिश मजकूर). न्यू यॉर्क टाइम्स. १६ मार्च, इ.स. १९१८.
- ↑ "इ.स. १९३७च्या राज्यघटनेतील ११४वे कलम" (रशियन मजकूर). रशियन विकिस्रोत., "इ.स. १९७८च्या राज्यघटनेतील ११७वे कलम" (रशियन मजकूर). रशियन विकिस्रोत.