आर्मेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्मेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
Армя́нская Сове́тская Социалисти́ческая Респу́блика
Հայաստանի Սովետական Սոցիալիստական Հանրապետություն

Flag of the First Republic of Armenia.svg १९२०१९९१ Flag of Armenia.svg
Flag of Armenian SSR.svgध्वज Emblem of the Armenian SSR.svgचिन्ह
Soviet Union - Armenia.svg
राजधानी येरेव्हान
अधिकृत भाषा आर्मेनियन, रशियन
क्षेत्रफळ २९,८०० चौरस किमी
लोकसंख्या ३२,८७,७००
–घनता ११०.३ प्रती चौरस किमी

आर्मेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (रशियन: Армя́нская Сове́тская Социалисти́ческая Респу́блика; आर्मेनियन: Հայաստանի Սովետական Սոցիալիստական Հանրապետություն) हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस रशियन साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर १९१८ साली आर्मेनियाचे प्रजासत्ताक नावाचे राष्ट्र स्थापन केले गेले. परंतु केवळ दोन वर्षातच रशियन बोल्शेविकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये आर्मेनियाने शरणागती पत्कारली व आर्मेनियाला सोव्हियेत संघामध्ये विलिन करण्यात आले.

२१ सप्टेंबर १९९१ रोजी सोव्हियेत संघाचे विघटन झाले व सोव्हियेत आर्मेनियाचे आर्मेनिया देशामध्ये रुपांतर झाले.

संदर्भ[संपादन]