लव्ह ॲक्चुअली
2003 film directed by Richard Curtis | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| Spoken text audio | ⓘ | ||||
|---|---|---|---|---|---|
| प्रकार | |||||
| मुख्य विषय | |||||
| Depicts |
| ||||
| गट-प्रकार |
| ||||
| मूळ देश | |||||
| संगीतकार |
| ||||
| पटकथा |
| ||||
| निर्माता |
| ||||
| वितरण |
| ||||
| दिग्दर्शक |
| ||||
| प्रमुख कलाकार |
| ||||
| प्रकाशन तारीख |
| ||||
| कालावधी |
| ||||
| मूल्य |
| ||||
| |||||
लव्ह ॲक्चूअली हा रिचर्ड कर्टिस यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला २००३ चा प्रणय-हास्य चित्रपट आहे. ह्या ख्रिसमस चित्रपटात मुख्यत्वे ब्रिटीश अभिनेत्यांचा समावेश आहे, ज्यापैकी अनेकांनी पूर्वी कर्टिससोबत काम केले होते.[१] युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि फ्रान्सची आंतरराष्ट्रीय सह-निर्मिती आहे व बहुतेक लंडनमध्ये चित्रीकरण करण्यात आले आहे. हा चित्रपट प्रेमाच्या विविध पैलूंचा शोध घेतो, ज्यामध्ये विविध व्यक्तींचा समावेश असलेल्या १० वेगळ्या कथांद्वारे दाखविण्यात आले आहे, ज्यांपैकी अनेक कथानक पुढे जात असताना एकमेकांशी जोडलेले आहेत. ही कथा ख्रिसमसच्या पाच आठवडे आधी सुरू होते आणि त्यानंतर नवीन वर्षात संपते.[२][३]
चित्रपटात प्रमुख कलाकार आहेत: कॉलिन फर्थ, ह्यू ग्रँट, कीरा नाइटली, अँड्रु लिंकन, लियाम नीसन, बिल नाय, ॲलन रिकमन, रॉड्रिगो सँटोरो, एम्मा थॉम्पसन, मायकेल पार्किन्सन, मार्टिन फ्रीमन, बिली बॉब थॉर्न्टन, क्लॉडिया शिफर, रोवन ॲटकिन्सन, डेनिस रिचर्ड्स, इत्यादी.
हा चित्रपट १४ नोव्हेंबर २००३ रोजी अमेरिकेमध्ये प्रदर्शित झाला आणि एक आठवड्यानंतर यूकेमध्ये प्रदर्शित झाला. लव्ह ॲक्चूअली बॉक्स ऑफिसवर २४८ दशकक्ष डॉलरची कमाई करत यशस्वी ठरला जो फकत ४० दशकक्ष डॉलरच्या बजेटवर बनवला होता.[४] चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर - म्युझिकल किंवा कॉमेडीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.
संदर्भ
[संपादन]- ↑ "WATCH: Richard Curtis & Vanessa Kirby in Conversation – AH / JW3 Speaker Series". London: Alan Howard/JW3 Speaker Series. 28 February 2018. रोजी मूळ पानापासून संग्रहित2024-07-31. 18 March 2021 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ↑ Perier, Maries (13 December 2019). ""Love Actually" in 20 cult scenes". Vogue France (फ्रेंच भाषेत). 13 December 2023 रोजी पाहिले.
- ↑ Asmelash, Leah (6 December 2023). "'Love Actually' is a holiday must-watch for many". CNN (इंग्रजी भाषेत). 25 December 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Love Actually | Domestic Weekly". Box Office Mojo. IMDb. 8 December 2023 रोजी पाहिले.