Jump to content

र्‍होड आयलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऱ्होड आयलंड या पानावरून पुनर्निर्देशित)
ऱ्होड आयलंड
Rhode Island
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द ओशन स्टेट (The Ocean State)
ब्रीदवाक्य: आशा (Hope)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी प्रॉव्हिडन्स
मोठे शहर प्रॉव्हिडन्स
क्षेत्रफळ  अमेरिकेत ५०वा क्रमांक
 - एकूण ३,१४० किमी² 
  - रुंदी ७१० किमी 
  - लांबी १९५ किमी 
 - % पाणी १३.९
लोकसंख्या  अमेरिकेत ४३वा क्रमांक
 - एकूण १०,५३,२०९ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ३९०.८/किमी² (अमेरिकेत २वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $५४,६१९
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २९ मे १७९० (१३वा क्रमांक)
संक्षेप   US-RI
संकेतस्थळ www.ri.gov

ऱ्होड आयलंड (इंग्लिश: Rhode Island; En-us-Rhode Island.ogg उच्चार ) हे अमेरिका देशामधील आकाराने सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले ऱ्होड आयलंड लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४३व्या क्रमांकाचे व दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.

ऱ्होड आयलंडच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला कनेटिकट, उत्तरेला व पूर्वेला मॅसेच्युसेट्स ही राज्ये आहेत. राज्याच्या नैऋत्येला खाडीपलिकडे न्यू यॉर्क शहराचे लाँग आयलंड हे बेट आहे. प्रॉव्हिडन्स ही ऱ्होड आयलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ऱ्होड आयलंडच्या एकूण क्षेत्रफळाच्या १४ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.

मोठी शहरे

[संपादन]


गॅलरी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: