Jump to content

रेवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख रेवाडी शहराविषयी आहे. रेवाडी जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?रेवाडी

हरियाणा • भारत
—  शहर  —
Map

२८° ११′ ००″ N, ७६° ३७′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• २४५ मी
जिल्हा रेवाडी
तालुका/के रेवाडी तालुका
लोकसंख्या
घनता
१,४०,८६४ (2011)
• ४८३/किमी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 123401
• +त्रुटि: "+91-1274" अयोग्य अंक आहे
• HR

रेवाडी भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे. हे शहर रेवाडी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

भूगोल[संपादन]

रेवाडीचे अक्षांश २८.१८° उत्तर आणि रेखांश ७६.६२° पूर्व असे आहेत. ते समुद्रसपाटीपासून २४५ मी. (८०३ फूट) उंचीवर वसले आहे.

इतिहास[संपादन]

सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य (इ.स. 1501–इ.स. 1556)

सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य (इ.स. १५०१–इ.स. १५५६) त्यांचे शिक्षण रेवाडीमध्ये झाले. रेवाडी त्यांची कर्मभूमी होती. ७ ऑक्टोबर, इ.स. १५५६ ते ५ नोव्हेंबर, इ.स. २५५६ या कालखंडात ते दिल्लीच्या सिंहासनाचे अधिपती होते. मुघल सम्राट/बादशहा अकबराने त्याला हरवून मुघल साम्राज्याच्या विस्तारास मार्ग मोकळा केला.

रेवाडीचा शासक राव तुलाराम (इ.स. १८२५ – इ.स. १८६३) याने ब्रिटिश वसाहतवादाविरोधातल्या इ.स. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धात सहभागी होऊन लढा दिला.

वाहतूक व्यवस्था[संपादन]

हवाई वाहतूक[संपादन]

दिल्ली विमानतळ येथून सर्वांत जवळचा विमानतळ आहे.

रेल्वे वाहतूक[संपादन]

हे शहर एक महत्त्वाची रेल्वे स्थानक आहे. रेवाडी स्थानकावर सर्व रेल्वेगाड्या थांबतात. रेवाडी शहर भारताच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी रेल्वे चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे.

रस्ते वाहतूक[संपादन]

राष्ट्रीय महामार्ग क्र. ८, ७१ व ८१ब यांवर हे शहर पडते. शासकीय व खाजगी बससेवा रेवाडीला दिल्ली, हरियाणाच्या, पंजाबच्याराजस्थानच्या शहरांशी जोडतात. हरियाणा राज्य परिवहन मंडळाचे बससेवा रेवाडीला हरियाणाच्या अन्य शहरांशी व ग्रामीण भागाशी जोडते.

रेवाडी व दिल्ली दोन्ही शहरांदरम्यान केवळ दोन तासांचे अंतर (८१ किमी) आहे.

हवामान[संपादन]

रेवाडीचे वार्षिक पर्जन्यमान 553 मिलिमीटर इतके आहे. वर्षभरातील तापमान 3°-46° सेल्सियस या पल्ल्यात राहते. मोसमी पावसानंतर नोव्हेंबर महिन्यात रात्री थंड असतात. हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत असतो. या काळात रात्रीचे तापमान 3° सेल्सियसांच्या खाली असते.

अर्थव्यवस्था[संपादन]

शिक्षण[संपादन]

केंद्रीय विद्यालय (सीबीएसई), इतर अनेक शासकीय व खाजगी शाळा, आय.टी.आय., (अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधि, कॉमर्स, सामाजिक शास्त्रे व इतर अनेक) महाविद्यालय, वणस्पती संशोधन केंद्र इत्यादी शैक्षणिक संस्था येथे आहेत.

बाह्य सूत्र[संपादन]