हेमचंद्र विक्रमादित्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हेमचंद्र विक्रमादित्य

हेमू उर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य ऊर्फ हेमचंद्र भार्गव (इ.स. १५०१ - इ.स. १५५६) हा इ.स.च्या १६ व्या शतकातील उत्तर भारतातला एकमेव हिंदू सम्राट होता. तो राजस्थानातल्या अलवार जिल्ह्यामधील एका लहान गावातील ब्राह्मण पुरोहिताचा मुलगा होता. एक मीठ विक्रेता म्हणून जीवनाला सुरुवात केलेला हेमू, आपल्या कर्तबगारीने सूरी वंशाच्य़ा आदिल शाह सूरी चा सेनापती व प्रधानमंत्री या पदांपर्यंत पोहोचला.

उत्तर हिंदुस्तानात पंजाबपासून बंगालपर्यंत त्याने अफगाण बंडखोर, हुमायूँअकबराच्या मुघल फौजा यांच्याशी सुमारे २२ लढाया एकदाही पराभूत न होता जिंकल्या. ऑक्टोबर ७ इ.स. १५५६ साली त्याचा ’सम्राट विक्रमादित्य’ या पदवीसहित दिल्लीच्या सिंहासनावर राज्याभिषेक करण्यात आला. सुमारे ३५० वर्षांनंतर त्याने हिंदू साम्राज्याची थोड्या काळासाठी का होईना, पुनःस्थापना केली. त्याने आपल्या नावाने नाणीही प्रचारात आणली होती. मध्ययुगीन भारताचा नेपोलियन अशीही पदवी त्याला देण्यात येते[ संदर्भ हवा ].

मात्र त्यानंतर लगेचच झालेल्या पानिपतच्या दुसर्‍या लढाईत केवळ दुर्दैवाने अकबराच्या मुघल सैन्याकडून हेमूच्या सैन्याचा पराभव झाला. हेमूला पकडून त्याचा शिरच्छेद करण्यात आला[१]. हेमूचे समर्थक व हजारो हिंदूंची कत्तल अकबराच्या मुघल सैन्याकडून करण्यात आली[ संदर्भ हवा ].


अधिक वाचन[संपादन]

  • भारद्वाज, के.के., "हेमू - नेपोलियन ऑफ मेडिएव्हल इंडिया, मित्तल पब्लिकेशन्स, नवी दिल्ली, पृ. ५९-६० (इंग्लिश मजकूर)
  • "हिमू - अ फरगॉटन हिंदू हीरो", भारतीय विद्या भवन, पृ. १०० (इंग्लिश मजकूर)
  • जे.एन. सरकार, "मिलिटरी हिस्टरी ऑफ इंडिया", पृ. ६७ (इंग्लिश मजकूर)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ Mythak, Tv. "Last Hindu King Of Delhi". https://www.mythaktvindia.in. 30 जानेवारी 2019 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)