रूण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रुण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे.

  ?रूण

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर लांजा
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान[संपादन]

लांजा बस स्थानकापासून साटवलीला जाणाऱ्या रस्त्यावर वडदहसोळ बस थांब्यापासून पुढे उजवीकडे जाणाऱ्या वळणावर आतमध्ये २ किमीवर हे वसलेले आहे. लांजा बस स्थानकावरून इसवली, साटवली गावाकडे जाणाऱ्या एसटी बसेस रुण तिठ्यावर थांबतात.तेथून चालत किंवा सायकलीने गावात जाता येते.

लोकजीवन[संपादन]

मुख्यतः मराठा, कुणबी, ब्राह्मण, बौद्ध समाजातील लोक येथे राहतात.भातशेती,सुपारी पोफळीच्या बागा, नारळबागा,तसेच काजू, फणस, आंबा, कोकम ह्यांचे येथे मुबलक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. वर्षभर आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे काही पालेभाज्या,फळभाज्या,फुलभाज्यासुद्धा येथे पिकविल्या जातात. बकरीपालन, दुग्धव्यवसाय,कोकमसरबत,फणसाच्या साट बनविणे असे शेतीपूरक जोडधंदेही केले जातात.लोक मेहनती, कष्टाळू, भोळे, पापभिरू,आनंदी, धार्मिक प्रवृत्तीचे आणि एकमेकांना सहाय्य करून गुण्यागोविंदाने व सलोख्याने राहतात.

कातळ खोदशिल्प[संपादन]

ह्या गावात कातळ खोदशिल्पे आढळली आहेत.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.